डबा ऐसपैस !!
आज एक मजाच सापडली!!!
पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच !
त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. !
हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy..
म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :)
चला बर्याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :)
( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :))

टिप्पण्या
ह्याच्यावरुन आठवले - काल विमानात शेजारी एक बडबडा अमेरिकन गृहस्थ बसला होता, त्याने मला सांगितले कि गिटार हा मूळ संस्कृत शब्द आहे: गीत+तार.
ase barech shabd astil.. :)
सिलींडर रजा- surrender leave
शिरोमणी परेड- ceremonial parade
Looking forward to interesting posts like this one,
Vivek
i miss playing it tho'! :(