मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आश्चर्याचा सुखद धक्का..... !!

नेटवर असेच फिरताना, ९ मार्च २००८ च्‍या लोकसत्ता, रविवार वृत्तांत 'मर्‍हाटी नेट-भेट' मध्‍ये, निवडक वाचनीय blog मधे माझ्या ब्लॉगचे नाव पाहून, बसलेला धक्का अजुन गेलेला नाहीय !... :) http://loksatta.com/daily/20080309/ravi01.htm thanks alot loksatta !! :)

लायब्ररी !!

फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम वर तर, काहीच वाचावसं सापडत नाही आजकाल! म्हणजे वाचणेबल असतं बरच काय काय.. पण बहुधा मला नेट वर वाचायचा कंटाळा आलाय.. शेवटी नवर्‍याला लायब्ररीमधे घेऊन जाण्याचा तगादा लावला.. ( काय ना.. ड्रायव्हींग येत नसेल तर अमेरीकेत अगदी भजं होऊन जातं तुमचं!! :( माझी स्कुटी पाहीजे होती इथे... :D) एकदाचं लायब्ररी मधे आलो !! काय सुंदर आणि प्रचंड आहे इथली लायब्ररी.. ऐकुन होतेच पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं.. कार्ड घेण्यासाठी रांगेत उभी राहीले, तर १ मिनिटार सगळी प्रोसिजर खतम..! कार्ड हातात, आणि अन्लिमिटेड पुस्तकं , ३ आठवड्यांसाठी... wow !! घाईने पुस्तकांच्या सेक्शन मधे गेले, आणि लिटरली वेड लागलं.. आख्खा मजला भरून फक्त fiction.. त्याच्या वरच्या मजल्यावर non-fiction ...

तारे जमीन पर ! :)

काल नवऱ्याबरोबर बाहेर जाताना आकाशात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं.. विमानतळ जवळच आहे, त्यामुळे पहील्यांदा विमान वाटलं. पण तरी विमान काही इतक्या वेगानी जात नाही.. आणि त्या प्रकाराला धुमकेतू सारखी धुसर शेपुट पण होती..! लाईट ब्लु कलरचा तो प्रकार म्हणजे करण जोहर स्पेशल ’टुटता सितारा’ होता असा आम्ही निष्कर्श काढला!! आयुश्यात पाहील्यांदा असं काहीतरी पाहात होते! ( काही वर्षांपुर्वी पुण्यात उल्का वर्षाव पाहीलाय..ते पण भारी होतं).. पण हिंदी पिक्चरवाल्यांनी या falling star ला जरा जास्तच ग्लॅमर दिलं आहे.. आणि म्हणे तो पडताना पाहीला की मनात जी इच्छा घेऊ ती पुर्ण होते.. आता मला सांगा... तो तारा बिचारा इतका जोरात पडत असतो.. तो आपल्याला दिसायची मारामार.. आणि त्या एका क्षणात विश कसली करायची?? आणि ती विश केलीच, तर पुर्ण कोण करणार .. तो तारा?? :) ( मुव्ही मधे काहीही दाखवतात दुसरं काय... !) काहीही असो.. पण फार सुंदर द्रुश्य होतं ते.. इथे अमेरीकेमधे, निदान आमच्या गावात आकाश फार व्यवस्थीत दिसतं.. सगळी घरं बंगलेवजा आहेत, आणि झाडं पण काही आपल्या अशोकासारखी उंच नाहीत.. त्यामुळे सहज पाहीलं तरी आकाशाचा विस्तार दिस...

पुनश्च हरि ओम!

बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्लॉगवर काहीतरी लिहीतीय.. खरतर, परवा मराठीब्लॉग्स. नेट वर ब्लॉग वाचताना मला आठवलं की आपला पण एक ब्लॉग आहे.. आणि तिथे आपण काहीबाही खरडत असतो.. तुरळक कमेंट्स येतात्,त्या अर्थी काही लोकं तो ब्लॉग एकेकाळी वाचतही असत.. :) खरच, गेले काही महीने इतके धावपळीचे गेले की मी विसरून गेले होते ब्लॉग्-बिग.. (अर्थात, लग्न झाल्यावर कुणाला आठवेल ब्लॉग वगैरे! ) हे ब्लॉग म्हणजे ओढवून घेतलेलं संकटच आहे! आता बघा ना, रोज काय कमी कटकटी आणि प्रश्न आहेत का? पोळ्यांचा आकार कसा सुधरायचा? .. मीठाचा अंदाज कसा बरोबर येईल..तसेच, गाडी चालवताना समोरून गाडी आल्यावर हॉर्न मारू की ब्रेक मारू? ... समोरचा अमेरीकन काय बडबडतोय कधी कळेल? ..... याबरोबरच आता ब्लॉगवर काय लिहायचं हा प्रश्न आला.. बा़कीच्या प्रश्नांची उत्तरं कधी ना कधी तरी मिळतीलच( हो, मी इतकी वाईट नाहीय स्वयपाकात.. येईल हळू हळू.. ) पण ब्लॉगवर काय लिहायचं याचं उत्तर मला तरी कधीच मिळत नाही.. ( "मग लिहायचा कशाला?" म्हणू नका.. असं उगवत्या लेखिकेला नाऊमेद करू नये...!) असो.. तर दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.. निदान महीन्याकाठी त...

पेन-स्केच

(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )

नेनचिम!

काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... ! खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!) नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि ...

hmmm... nostalgia ! (कॉलनीचा गणेशोत्सव)

आज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले !! कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग ! बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे... :) दुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ! ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही! त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी व...