२४ जानेवारी, २००८

पुनश्च हरि ओम!

बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्लॉगवर काहीतरी लिहीतीय.. खरतर, परवा मराठीब्लॉग्स. नेट वर ब्लॉग वाचताना मला आठवलं की आपला पण एक ब्लॉग आहे.. आणि तिथे आपण काहीबाही खरडत असतो.. तुरळक कमेंट्स येतात्,त्या अर्थी काही लोकं तो ब्लॉग एकेकाळी वाचतही असत.. :) खरच, गेले काही महीने इतके धावपळीचे गेले की मी विसरून गेले होते ब्लॉग्-बिग.. (अर्थात, लग्न झाल्यावर कुणाला आठवेल ब्लॉग वगैरे! )
हे ब्लॉग म्हणजे ओढवून घेतलेलं संकटच आहे! आता बघा ना, रोज काय कमी कटकटी आणि प्रश्न आहेत का? पोळ्यांचा आकार कसा सुधरायचा? .. मीठाचा अंदाज कसा बरोबर येईल..तसेच, गाडी चालवताना समोरून गाडी आल्यावर हॉर्न मारू की ब्रेक मारू? ... समोरचा अमेरीकन काय बडबडतोय कधी कळेल? ..... याबरोबरच आता ब्लॉगवर काय लिहायचं हा प्रश्न आला.. बा़कीच्या प्रश्नांची उत्तरं कधी ना कधी तरी मिळतीलच( हो, मी इतकी वाईट नाहीय स्वयपाकात.. येईल हळू हळू.. ) पण ब्लॉगवर काय लिहायचं याचं उत्तर मला तरी कधीच मिळत नाही.. ( "मग लिहायचा कशाला?" म्हणू नका.. असं उगवत्या लेखिकेला नाऊमेद करू नये...!)
असो.. तर दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.. निदान महीन्याकाठी तरी काहीतरी(काहीतरी'च' नाही.. ) लिहीण्याचा संकल्प सोडला आहे मी... बघू किती फळाला येतोय.. निदान सुरवात तर झाली... अच्छा मंडळी...! भेटू परत...
टिप्पणी पोस्ट करा

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...