तारे जमीन पर ! :)


काल नवऱ्याबरोबर बाहेर जाताना आकाशात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं.. विमानतळ जवळच आहे, त्यामुळे पहील्यांदा विमान वाटलं. पण तरी विमान काही इतक्या वेगानी जात नाही.. आणि त्या प्रकाराला धुमकेतू सारखी धुसर शेपुट पण होती..! लाईट ब्लु कलरचा तो प्रकार म्हणजे करण जोहर स्पेशल ’टुटता सितारा’ होता असा आम्ही निष्कर्श काढला!! आयुश्यात पाहील्यांदा असं काहीतरी पाहात होते! ( काही वर्षांपुर्वी पुण्यात उल्का वर्षाव पाहीलाय..ते पण भारी होतं).. पण हिंदी पिक्चरवाल्यांनी या falling star ला जरा जास्तच ग्लॅमर दिलं आहे.. आणि म्हणे तो पडताना पाहीला की मनात जी इच्छा घेऊ ती पुर्ण होते.. आता मला सांगा... तो तारा बिचारा इतका जोरात पडत असतो.. तो आपल्याला दिसायची मारामार.. आणि त्या एका क्षणात विश कसली करायची?? आणि ती विश केलीच, तर पुर्ण कोण करणार .. तो तारा?? :) ( मुव्ही मधे काहीही दाखवतात दुसरं काय... !)
काहीही असो.. पण फार सुंदर द्रुश्य होतं ते.. इथे अमेरीकेमधे, निदान आमच्या गावात आकाश फार व्यवस्थीत दिसतं.. सगळी घरं बंगलेवजा आहेत, आणि झाडं पण काही आपल्या अशोकासारखी उंच नाहीत.. त्यामुळे सहज पाहीलं तरी आकाशाचा विस्तार दिसतो.. आणि म्हणूनच काल मला हा प्रकार दिसला.. माहीत नाहीय नक्की, की तो तुटणारा ताराच होता.. पण मी समजून चालले आहे.. नंतर विश पण बोलून घेतली, खोटं कशाला बोला.. झाली खरी तरी बरंच आहे ना!


( btw, वरचं लिखाण केवळ tp आहे.. तो तारा नसतो आणि meteoroid असतो हें लेखिकेला माहित आहे) :D
http://en.wikipedia.org/wiki/Falling_star

Signature2

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Nice one....
I liked it..
PS: Specially the last line..
-Rachana

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Archives

खेळ आणि मी

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !