मुख्य सामग्रीवर वगळा

Into the wild (चित्रपट)

Into the wild

खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव.
रूतून बसले होते अगदी.
इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात.

नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्‍याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही.

एक दुपार सापडली. सापडली म्हणजे शोधत नव्हतेच तिला. त्या दुपारच्या निवांत वेळेने मला गाठले. अन कोणत्यातरी अनामिक ओढीने मी इनटू द वाईल्ड सुरू केला.




लॉर्ड बायरनचे शब्द स्क्रीनवर आले, अन अक्षरशः पॉझ करून बसले एक मिनिट. परत एकदा वाचले नीट, मोठ्यांदा उच्चारले ते शब्द..

There is a pleasure in the pathless woods,
There is a rapture on the lonely shore,
There is society, where none intrudes,
By the deep sea, and music in its roar:
I love not man the less, but Nature more.

आणि सुरू झाला प्रवास, Into the wild..

Christopher McCandless ह्या मनस्वी तरूणाचा हा प्रवास लिखाणातून मांडणे कसे शक्य आहे? वेल, अगदीच ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी- ख्रिस, एक २२-२३ वर्षाचा मुलगा, अ‍ॅटलांटातील एका ख्यातनाम युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट होतो. पुढे हार्वर्डमधून लॉ करायचे आहे वगैरे आईबाबांना सांगतो. आणि आपल्याकडील सर्व मालमत्ता, पैसा, सर्व काही डोनेट करून गायब होतो. गायब कुठे होतो? तर तो निघतो भ्रमंतीला. आपल्या जुन्या कारमधून जातो जातो, फ्लॅश फ्लडमध्ये खराब झाल्यावर कार तशीच बेवारस सोडून देतो.. पैसे जाळतो.. चालत सुटतो.. नदीतून कनूइंग करत फिरतो.. रस्त्यावरच्या हिप्पीजना भेटतो.. त्यांच्याबरोबर समुद्रावर राहतो, गव्हाच्या शेतात काम करतो.. पुढील प्रवासाला लागेल इतपत पैसा मिळेल असेल लोइन्कम जॉब्स करतो.. भरपूर पुस्तके वाचत राहतो, लिहीत राहतो.. मोठ्या मोठ्या लेखकांचे शब्द/कोटस लोकांना ऐकवून दाखवतो..  कधी अकस्मात निघून जातो..  अर्थात तो त्याचे नाव ख्रिस नाही सांगत. अलेक्झांडर सुपरट्रॅम्प. फॅमिली? डोन्ट हॅव एनीमोअर. जो भेटेल त्याला ख्रिस आवडतो. ख्रिसला? त्याला तसं काही पडलेलं नसतं. त्याचे ध्येय एकच.. अलास्काला जाणे.

इतक्या एक्स्ट्रीम ठिकाणी राहायचा, हायकिंग करायचा अनुभव नसताना ख्रिस हे धाडस का करू पाहात आहे? हा निव्वळ वेडेपणा आहे का? मी एके ठिकाणी वाचले तसा, हा youthful innocence आहे की arrogant ignorance?
मुव्हीमध्ये खूप अंधुक असे रेफरन्सेस येतात, ख्रिसच्या आईबाबांच्या डॉमेस्टिक अ‍ॅब्युझ असलेल्या नात्याबद्दल, बाबांच्या अती डॉमिनेट करण्याच्या स्वभावाबद्दल, मटेरिअलिस्टीक - वस्तूंच्याच प्रेमात असल्याबद्दल... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणाजे वडिलांच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल - जे अजुनही टिकून आहे अशा. ह्या सर्वात संवेदनशील असलेला ख्रिस करपून निघतो. आपल्या पालकांबरोबरच्या ह्या आयुष्याला तो नाकारतो. पुढे वेनबरोबर पबमध्ये बसून जोरजोरात त्वेषाने केवळ 'सोसायटी', 'सोसायटी'... 'सो...सायटी' असे शिव्यांच्या आविर्भावात ओरडतो - नंतर कधीतरी म्हणतो, करीअर - हे तर २०व्या शतकातले फॅड आहे! - तेव्हा दिसते ती केवळ त्याला हवी असणारी ऑर्गॅनिक लाईफस्टाईल. स्वच्छंद आयुष्य - ज्यात पैसा, महागडे कपडे, गाड्या, डिग्र्या ह्यांचा अडसर नसून केवळ तुम्ही व निसर्ग आहात!



ख्रिस पुढे खरंच अलास्काला जातो. भर थंडीत! जिकडे तिकडे पांढरे बर्फाचे साम्राज्य असलेल्या अलास्कातील देनाली नॅशनल पार्कमध्ये. बरोबर केवळ एक हायकिंगची बॅगपॅक. असेच कोणीकोणी दिलेले काही उपयोगी पडेल असे सामान. जंगलातील कोणते झाडे व हर्ब्स खावीत्,न खावीत हे सांगणारे पुस्तक, १० पाउंड तांदूळ व डायरी अन पेन.

सोपं असेल असं राहणे? कितीही आईबाबांवर संतापून, त्या आयुष्याला वैतागून फिरतीवर निघाला असला तरी रोजच्या दिवसातील संकटं त्यानेच फेस केली. फळं, बेरीज खाऊन भूक भागवली.. हळूहळू शिकार करू लागला. मांस कसं टिकवायचे, शिजवायचे हे शिकला. आहे त्या परिस्थितीत टिकून राहणे, मार्गक्रमण करणे हे किती धैर्याचे काम आहे?



मी मुव्हीबद्दल काहीच न वाचल्याने, अगदी ही सत्यघटना आहे हेही मला काहीच माहित नसल्याने मुव्ही रूतून बसला खोल. आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला हा मुव्ही पाहून पण ख्रिस मध्येच समोर येतो. मला कणखर बनायला शिकवतो. परिस्थिती कितीही खराब असली तरी यु हॅव टू फील दॅट यु आर स्ट्राँग हे बजावतो. हॅपीनेस हा वस्तूंमध्ये नाही तर आजूबाजूला पसरला आहे हे शिकवतो. तो खूप फँटसीत रमणारा आहे का? सोसायटीला असं कोणी कसं फेकून देऊ शकतो? मी तर नाही करू शकणार असे. मुव्हीच्या कित्येक परीक्षणातून इतर लोकांनी लिहीले आहे, डॉमेस्टिक अ‍ॅब्युझ काय असतो माहित आहे का त्याला? त्याच्यातून पळून जाणं हे हिरोइक नसून त्या तसल्या परिस्थितीतही राहून राईज होणे हे हिरोईक आहे... इत्यादी. मला तसं नाही वाटले. ख्रिस मला पळपुटा नाही वाटला. त्याला त्याचे व्यक्तीमत्व आहे, त्याला तसे जगायचे होते म्हणून तो असा फिरला. त्याला त्याच्या पालकांचे आयुष्य अगदीच नकोसे झाले, पण जिथे जाईल तिथे त्याने स्वतःची फॅमिलीच तयार केली. ज्याला ज्याला भेटला, त्याला त्याला ख्रिस आपला वाटला, जवळचा वाटला.. इतका की तो निघाला की अगदी ओक्साबोक्शी रडू येईल इतपत जवळचा!

पूर्ण सिनेमात ख्रिस मला बर्‍यापैकी अलिप्त वाटला, परंतू मुव्ही संपता संपता ख्रिसलाही समजतेच की.. हॅपीनेस इज ओन्ली रिअल, व्हेन शेअर्ड!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??