"Flight" - Amazing movie!

परवा डेंझेल वॉशिंग्टनचा ’फ्लाईट’ पाहीला.आजकाल मी मुव्हीज पाहणे अगदी कमी केले आहे. मुद्दाम नाही. पण इतक्या वेळ ताटकळत बसणे अगदी बोर होते. पण नवर्‍याने हा मुव्ही लावला अन १५ मिनिटातच मी हातातला लॅपटॉप बाजूला ठेऊन मुव्ही बघितला. पूर्ण!

मला मुळातच डेंझेल वॉशिंग्टन हा अभिनेता आवडतो. आवडतो म्हणजे हृथिक रोशनसारखा नाही. की सगळे झाडून त्याचे मुव्हीज बघणार म्हणजे बघणार. मला खरंतर दुसरा कुठला मुव्ही आठवत पण नाही, डेंझेल वॉशिंग्टनचा. परंतू त्याचे जे मुव्हीज पाहीले आहेत ते आवडले आहेत. खूप संयत, सुंदर ॲक्टींग करतो तो..

मी जेव्हा बघायला लागले तेव्हा एक कळले की यात त्याने काम केले ’व्हिप’ नावाच्या पायलटची. तो विमानात जातो आणि चक्क दारू पितो! नंतर फ्लाईट अटेंडंटला ॲस्पिरीनच्या गोळ्या वगैरे मागतो. आणि .. झोपून जातो. :।

त्याचा कोपायलट आपला डोळे फिरवतो व विमान चालवायच्या कामाला लागतो. भरपूर पाऊस असतो, व अतिशय वाईट हवामान. प्रत्येक हॉलिवूडपटात होते तेच इथेही होते. संकट येते. अचानक विमानातील काही कंट्रोल्स काम करेनासे होतात. व क्षणार्धात विमानाला मोठा जर्क बसतो. झोपलेला व्हिप जागा होतो, आणि एका सेकंदात त्याने कंट्रोल्स जे हातात घेतले आहेत त्याला तोड नाही. विमानात दारू प्यायल्यामुळे माझे मत अगदी कलुषित झाले होते, परंतू डेंझेल वॉशिंग्टनने काय कमाल काम केले आहे. इतके फटाफट कंट्रोल्स हातात घेऊन समयोचित ऑडर्स सोडणे , त्या सगळ्या हॉरिबल प्रसंगीदेखील चेहर्‍यावरची घडी देखील न विस्कटवता जबाबदारीने काम पार पाडणे. सगळं फार मस्त दाखवले आहे. परंतू विमानावर वाईट वेळ आलेलीच असते. एक क्षण येतो, आणि विमान झपाट्याने नाक खाली करून जमिनीच्या दिशेने जाऊ लागते. oh my god !! काय घेतला आहे तो सीन. सरसरून काटा आला अंगावर. जमिन जवळ जवळ येत आहे तसं दोघांनाही कळून चुकते करता येण्यासारखे फार काही उरले नाहीये. परंतू त्याच वेळेस व्हिप, विमान उलटे करण्याच्या निर्णय घेतो. उ-ल-टे! म्हणजे खाली डोके वर पाय. इतकी ब्रिलिअंट व स्केरी आयडीया मी कुठेही पाहीली नाही., त्या बिचार्‍या विमानाप्रवाशांचा विचार करून माझ्या मनाचा थरकाप उडाला! आधीच इतक्या उंचीवर कुठेतरी अंतराळात, आणि खाली डोके वर पाय?! :O

हळूहळू विमान ग्लाईड होऊ लागते. घरांवरून जाते. एक जराशी मोकळी हिरवीगार जागा पाहून व्हिप विमान लॅंड करायचा प्रयत्न करतो, जमिनीवर आदळतोच. भयंकर मोठा धक्का बसतो, कोणीतरी  त्याला फरफटत नेतंय असे दिसते. विमानात असलेल्या १०६ पैकी सर्व लोकांचा मृत्यू ओढवलेला असताना केवळ व्हिपच्या हुषारीमुळे व स्किल्समुळे ६ व्यक्तींच्या मृत्यूपाशीच यम थांबतो.

तिथून पुढे चालू होतो न्याय, नैतिकता, ॲडीक्शन अशा विविध गर्तेमधूनचा व्हिपचा प्रवास. त्याने विमानात दारू पिऊन चुक केली आहे हे तर खरंच आहे, परंतू त्याच जागी दुसरा कोणी वैमानिक त्या विमानात असता तर सर्वच्या सर्व लोकांचा मृत्यू अटळ असता ही तितकंच खरे. मग काय होते शेवटी? व्हिपला विमानात दारू प्यायल्यामुळे शिक्षा होते की तरीही त्याने इतकी वैमानिकगिरी करून लोकांचे प्राण वाचवले त्यामुळे त्याला सोडतात? काय होते ते तुम्ही मुव्ही मध्येच बघा. मी ऑलरेडी बरीच स्टोरी सांगितली आहे. शेवटही लिहीला तर काय मजा.

सुंदर , खिळवून ठेवणार मुव्ही! आवडला!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives