पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय..  ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला.. मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे ...

नीलरंगी रंगले…

वॉव !! किती दिवस झाले म्हणे ब्लॉग अपडेट करून?? दिवस कशाला मोजू? साधं माझ्या ब्लॉगला मला लॉगिन करता येईना, यावरूनच समजतंय! शेवटी गुगलला शरण गेले नेहेमीप्रमाणे..की बाबारे वर्डप्रेसच्या अ‍ॅडमिन पॅनेलची वाट दे शोधून.. अन त्याचा हात धरून आले.. असो ! एक न्युज तुम्हा वाचकांबरोबर वाटायची आहे.. मी आई झाले .. :O कसलं भारदस्त वाटतंय असं लिहायला! स्वत:लाच पिल्लू समजणार्‍या मला, आता आई म्हणणारे एक पिल्लू आले आहे! ’नील’ त्याचे नाव. ते साखरेचे पोते अलिकडेच २ महिन्याचे झाले. व मला थोडासा वेळ मिळू लागला. म्हटले काही नाही तर ब्लॉगवर पुनश्च हरि ओम, पुन्हा एकदा करावे..  मी आत्ताच्या घडीला तरी नीलरंगी रंगले आहे. गंमती जमती होत असतात रोज! उदा: पूर्वी नील रशियन परिकथेत गोष्ट आहे तसा एकच डोळा बंद करून झोपायचा! हाहा.. किंवा नीलला कपाळाला आठी , डोळे मोठे व चेहर्‍यावर हसू असा धमाल चेहरा करतो येतो! करून बघा! आठी व डोळे मोठे जमतच नाहीत. हसू तर लांबची गोष्ट! शीशी करताना तर स्वारी अफाट खुष असते! त्यामुळे बाळ व्हायच्या आधी ज्या गोष्टीचे जरा टेन्शनच होते ती एकदम मस्त होऊन गेलीय! हीही.. मी तर आता त्या मोमे...

थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Thai Veggie Stir Fry & Chicken Linguine Noodles]

इमेज
लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या : गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित ) थोडेसे भाजलेले दाणे (नवर्‍याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी मध्ये नव्हते) ५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून वाळलेली लाल मिरची कुटून कुकींग वाईन (असल्यास.) (माझ्याकडे नव्हती. मी थोडे व्हिनेगर+लिंबूरस घातले) सॉस : (तिखट) चिली सॉस, सोया सॉस ( मी कमी सॉल्ट असलेला आणि अगदी थोडाच वापरला) थाई स्वीट चिली सॉस १/३ कप व्हेजिटेबल अथवा चिकन स्टॉक. अर्ध्या लिंबाचा रस चमचाभर मध ( गोड हवं असल्यास अजुन जास्त घेता येईल) २ टीस्पून कॉर्न स्टार्च ४ टेबलस्पून पाण्यात मिसळून. (कॉर्न स्टार्च नसल्यास ४ टीस्पून मैदा घ्यावा) क्रमवार पाककृती: स्टर फ्राय सॉसः सर्वप्रथम कढईमध्ये व्हेज /चिकन स्टॉक , चिली सॉस, सॉय सॉस, थाई चिली सॉस, लिंबाचा रस घालून गरम करत ठेवणे. रेसीपीमध्ये मधही यातच घेण्यास सांगितला होता. परंतू तो गरम करू नये असे वाचले असल्याने मी तो शेवटीच मिक्स केला. या वरील मिश्रणाला थोडी उकळी आली की ठेचलेला ...

एक भन्नाट दुपार !

इमेज
शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं! बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला! सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा! ही काय नाहीतर ती काय.. १०१ वर प्रचंड ऊन व झळा बसत होत्या. वाटलं हे अवघड होणार आहे. इतक्या उन्हाचे बाहेर पडणे आजकाल नकोच वाटते. असं मनात म्हणतीय तोवर गाडीने व्हेन्च्युरा मागे टाकले व त्याच वेळेस ढगांनी सूर्याला ! जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला. अरे पण हे काय ! असे दृश्य मी खरंच कधी पाहीले नाही. नावाला जागणारा संथ प्रशांत महासागर, ढगा दाटून आल्याने सूर्यदेव व उजेड तात्पुरत्या ब्रेक वर गेलेले, जितके ढग आभाळात त्याहून जास्त खाली समुद्रावर उतरलेले. व त्या सर्व वातावरण निर्मितीमुळे समुद्र चक्क उभा दिसत होता. म्हणजे कळलं ना? समुद्र म्ह...

ल्हानपण देगा देवा !

इमेज
आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल. आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे!) असो. मला किती लहानपणचे आठवतंय असा खेळ करून पाहायची इच्छा झाली एकदम. बहुतेक बालवाडी. अभिनव शाळेत मी होते. तो मरूनीश लाल युनिफॉर्म, फुग्याच्या बाह्या, पांढरे मोजे, लाल वेल्क्रोचे शूज, भरपूर पावडर लावलेली चब्बी चब्बी गालांची मी व डोक्यावर पांढरा हेअरबॅंड व मोगर्‍याचा गजरा, हातात लालच प्लॅस्टीकची जाळीजाळीची डब्याची (स्टीलचा, डबलडेकर डब्बा! ) व वॉटरबॉटलची पिशवी.. हे तयार होणे, तो सगळा युनिफॉर्म, तो घ्यायला गेलो होतो ते डेक्कनवरचे पूर्ण पोषाख, शाळेत शूज घ्यायला गेलो असताना माझ्या अवाढव्य पाया...

आह.. साझ !

इमेज
Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली! आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या! किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक! खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता. तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे. शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये. झाकीर हुसेनचे संगीत !!!! झाकीर हुसेन ऍक्टर म्हणून! एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता. व नंतर अगणित वेळा पाहिला. कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व...

गुढी..

इमेज
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!! ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते!

तो पाऊस.. हा पाऊस..

इमेज
फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय. रवीवारपासून शुक्रवार पर्यंत. रस्त्यावर तळी साचली आहेत.. जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस.. पाऊस.. ! का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही! माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! ) आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद.. लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो! वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता.. पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी...