फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.
मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..
पाऊस.. !
का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! )
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..
लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो!
वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता..
पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी, मानसी व विशाखा…
टिप्पण्या
मी नुकतीच मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी join केली आहे. तिथे काही ब्लॉग्ज चाळत होते.त्यात तुझा हा ब्लॉग पाहिला आणि आधी वाया घालवलेला वेळ सार्थकी लागला असं वाटलं!;))
मला orkut वर सुद्धा तुझ्याशी मैत्री करायला आवडेल.
भेटत राहू !!
माझाही ब्लॉग सवडीने पहा!
mi tujhahi blog pahila.. will start following it soon! :)