मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

टॅग – टॅग ..

नमस्कार वाचकहो.. सद्ध्या भारतवारीवर असल्यामुळे ब्लॉगिंग अगदी बंदच आहे. तिथे अमेरिकेत केव्हढाल्ला रिकामा वेळ असतो आणि इथे कसा वेळ जातो हेच कळत नाही! असो.. आता भारत वारी संपतही आली त्यामुळे जिवश्च-कंठश्च मैत्रिणीची आठवण यावी तशी ब्लॉगची आठवण आली ! पेंडिंग कमेंट्स पाहताना लक्षात आले की , मंदार आणि अनिकेत* या दोघा ब्लॉगर्सनी मला एका प्रश्नावलीसाठी टॅग केलं आहे त्यामुळे ते कळल्याबरोबर व वेळ मिळाल्याबरोबर लगेचच ब्लॉग उघडला.. * एक छोटी मिस्टेकची दुरूस्ती .. मंदार आणि विरेंद्र या दोघांनि टॅग केले होते. कमेंट्स पाहून लेख लिहायला घेईपर्यंत नावांचा गोंधळ केला.. ८-१० दिवसांत नियमित ब्लॉगिंग सुरू होईलच असे दिसते आहे.. तेव्हा भेटू परत.. तोवर ही माझी उत्तरं ! 1.Where is your cell phone? माझ्या डाव्या हाता जवळ.. 2.Your hair? काळे-कुरळे… 3.Your mother? Defense employee. थोडक्यातच लिहीते – “माझा आदर्श” ! 4.Your father? M.com, L.L.B, C.A. Apart from being proud of my successful HR – Finance Director Dad, I always wondered how did Baba manage to conquer all these degrees...

अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !

माझ्या परवा लक्षात आले, मी डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे.. डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे.. ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे कलू लागला तसे आम्ही निघालो. आता व्हाईट हाऊस पाहून पटकन मेट्रो पकडायची असे ठरवले. जवळच आहे असे वाटणारे व्हाईट हाऊस चांगलंच लांब होते. कसे तरी लंगडत, थांबत थांबत गेलो एकदाचे तिकडे ! खरं म्हणजे मी आपले दिल्लीतले राष्ट्रपती भवन सुद्धा पाहीले नाहीये त्यामुळे व्हाईट हाऊस म्हटल्यावर मी कंटाळा टाकून परत फ्रेश झाले. चुकून माकून ओबामा दिसलाच तर बरंय ना? आत्ता तो सगळा प्रसंग आठवताना इतके हसू येतंय ना! ते लांबवर पसरलेले व्हाईट हाऊस, त्याच्यापुढे कारंजे, फुलझाडे – बाग वगैरे, त्यापुढे ही भली मोठी लॉन , त्यापुढे लोखंडी ग्रिलचे कुंपण .. आणि तिथून ही सगळी व्हीजिटर्स लोकं डोकं आत घालून घालून डोकावतायत! त्या बिचार्‍या ओबामाला तर झूमधल्या पिंजर्‍यातल्...

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ] अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा : मूळात या बांधकामाच्या प्रकाराला Obelisk म्हणतात, जे इजिप्त (Luxor temple , Heliopolis(city of sun) – Cairo) , रोम , USA ( Central Park – New York , Washington Monument – Washington DC) , इथिओपिया,अर्जेंटीना अशा बर्‍याच ठिकाणी आढळते. ओबेलिस्कचे बांधकाम म्हणजे एक सरळसोट उंच चौकोनी खांब, व वर छोटा, उंच पिरॅमिड. बर्‍याचदा म्हणजे पूर्वीच्या काळी obelisk हे monolith असायचे. मोनो(एक), लिथ(दगड). थोडक्यात एकाच दगडातून उभा राहीलेला चौकोनी उंच खांब. त्यावर पूर्वीच्या काळी असायचा सोन्या...

Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..

Szła dzieweczka आणि बरेच काही !? .. by BHAGYASHREE posted on OCTOBER 15, 2009 युट्युबवर फिरताना ही मजा सापडली! आधी हा व्हीडीओ पाहा.. ओळखली चाल? आपले दिल तडप तडप या पोलिश लोकगीतावरूनच आले आहे.. आजकाल प्रीतम वगैरे संगीतकार बिन्धास्त कोरिअन म्युझिक/चाली चोरतात तेव्हा चीडचीड होते. पण काही कारणाने मला हे साम्यस्थळ पाहून वैताग नाही झाला. कदाचित आपले दिल तडप तडप इतके सुंदर गाणे आहे, की ते कुठल्या दुसर्‍या गाण्यावर आधारीत असले तरी फरक पडत नाही. मजा वाटते,वैताग नाही याचे अजुन काय कारण आहे माहीत नाही. [ अजुन एक आठवण म्हणजे, हे गाणं माझा दादा गिटारवर फार भारी वाजवायचा! MITच्या ऑर्केस्ट्रामध्ये तोच असायचा गिटारला, त्याच्या गिटारमुळेच बरीच गाणी अशी ट्युनसकट लक्षात राहीली आहेत व बेहद्द आवडतात! ] तसं बघायला गेलं तर ही अशी प्रेरणा मिळणे काही कमी नाही आपल्याकडे! मेहबूबा - Demis Roussos – Say You Love Me [ अर्थात, मेहबूबा अशक्य सही आहे यापेक्षा!! ] नींद चुरायी मेरी - Sending all my love – Linear [ मला दोन्ही गाणी प्रचंड आवडतात!! ] हां हां ये प्यार है – Frankie Valli’s ‘Cant take my eyes off you’! [...