मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मी टिपलेली काही फुले!

फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन.. Please go through my Flickr Link.. Created with Admarket's flickrSLiDR .

Wish List..

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत! कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे.. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे.. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण! एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे.. आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत! केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत. घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे! हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली! गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच.. भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! .. बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे.. जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे.. साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे...

१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!

ह्म्म.. सद्ध्या माझ्याकडे अफाट रिकामा वेळ आहे, हे तुम्हाला कळतच असेल.. माझ्या मे महीन्यातल्या (टाईमपास )पोस्टच्या संख्येवरून! किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे! रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट.. टेम्प्लेट बदललं.. आधीचे फार छान होते! पण फार क्लटर्ड वाटले.. आणि मुख्य म्हणजे मला सांभाळणे मुश्किल झाले होते ते! ऍक्चुअल पोस्ट बॉडी मधे काहीच कोडींग करता येईना! Duh.. याला काय अर्थ?? मग दिले फेकून! हे क्युट, सिंपल साधं सोप्पंच बरं.. (निदान काही दिवस तरी! ) अरे हो, स्मायलीज नोटीस केल्या का कोणी? आधीच्या जरा डेंजरच वाटत होत्या.. या याहूच्याच चांगल्या! शिवाय, कमेंट्स मधेही एनेबल्ड केल्या आहेत.. हसा लेको! कमेंट फॉर्मही एम्बेडेड केला.. Save as PDF , Button मी काढून टाकले परत.. ते काही काम होईना.. आणि तसंही कोण आवर्जून सेव्ह करून ठेवणार?? RSS Feeds चा Icon बदलला.. हा हत्ती जास्त क्युट आहे! प्रत्येक पोस्टखाली रिलेटेड पोस्टचे विजेट टाकले.. वाचकांना जरा जास्त वेळ गुंतवून ठेवायला ते बरं असतं! नंबर्ड पेजिनेशन - नंबर्ड पेज नेव्हीगेशन चालू केले.. होम पेजच्या पुढच्या(की मागच्या...

Zoo Zoo..!

तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!! :D हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. ! परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट नाही झाली! शेवटी काहीच नाही तर निदान एले झू पाहावे म्हणून निघालो.. तिथे पोचल्यावर कळले की अशा विचाराने आख्खी जनता लोटलीय तिथे! :)) मी प्रचंड खूष होते! किती वर्षांनी ते पण नाही आठवत आता.. पण नक्कीच लहानपणी पेशवे पार्क पाहीले, त्यानंतर आजच प्राणीसंग्रहालयात गेले.. जाम मजा! सुरवातीला पिटुकल्या प्राण्यांनी आणि पक्षांनी सुरवात झाली.. एक कुठलीतरी जंगली मांजर, Alligator (किती जवळची वाटली ती मगर! माझीच रास! :D), वाळवंटात राहणारे प्राणी इत्यादी पाहीले.. वाळवंटातले प्राणी तर अगदीच वेगळे होते.. काडीसारखा दिसणारा किडा, लिबलिबीत बेडूक, निवांत झोपलेल्या lizards, भला मोठा पाण्यात पहुडलेला अजगर! LA मधेही पुणेरी पाट्या असतात बरं! नेमका माझा कॅमेरा नव्हता माझ्या सोबत.. नाहीतर काढणारच होते फोटो! प्रवेशद्वारालाच पाटी लावली होती! हीट वेव्ह आल्यामुळे सगळे प्राणी सावलीत /शेड मधे झोपले आहेत....

दगडावर कोरलेले क्षण..

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! :) अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून राहायचे.. पण आपोआप एक हसू फुटायचे आणि मग आई बाबांना समजायचे की मी जागीय! :) तरीही मी पुढे लोळत पडायचे.. मग त्या लाडाची जागा आधी ४-४ दा हाका मारण्यात, नंतर ओरडण्यात .. क्वचित एखाद्या धपाट्यात व्हायची! :) काहीही असलं तरी तो क्षण मला खूप आवडायचा! तसेच दादा उठवायला आला की तो प्रथम माझ्याबरोबर झोपून टाकायचा, आणि मग १५ मिनिटांना उठून पायाला ओढून रेल्वे रेल्वे खेळून उठवायचा! ते ही भन्नाट! शाळेत असतानाची हिवाळ्यातली सकाळ.. ती कडाकडा दात वाजवणारी थंडी मला अजुनही आवडते.. (तिचा कितीही त्रास झाला तरी!) लहानपणी मामा अमेरिकेतून पेपरमेट्सची पेनं आणायचा ढीगभर! त्याचा तो गुळगुळीत आणि स्लीम स्पर्ष अजुन हातात आहे! परवा मुद्दाम जाऊन घेऊन आले पेपर...

कॉलेजचे भन्नाट दिवस!

ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले.. इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले! जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! :) , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! :) का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते! खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल.. "माझे इंजिनिअरिंगचे दिवस!" :) गाथा होईल याची लिटरली! अस्मादिक तसे डोक्याने बरे असण्यापेक्षा नशिब बलवत्तर असल्यानेच बर्‍याच गोष्टी मिळवू शकले.. त्यातली एक इंजिनिअरिंगची डिग्री! :D (मैत्रिणींना हे पटायचे नाही! त्यांना वाटायचे मी ’भयंकर’ अभ्यासू आहे! आणि त्यांना न सांगता मी रात्र रात्र अभ्यास करते वगैरे! lol.. ) खरं सांगायचे तर मी कधीच अभ्यास केला नाही!! नाही म्हणायला आई आवर्जून मी पहिलीत असताना कशी स्वत:हून अभ्यासाला बसायचे, कवीता म्हणायचे इत्यादी सांगते.. अर्थातच ती तिथेच थांबते.. बहुदा मी नंतर अभ्यास केला नसावा! हेहे.. शाळेत मी तशी बडबडी आणि शांत(किंवा शिष्ठ!) अशी दोन्ही अर्थांनी प्रसिद्ध.. म...

आईची कवीता.. संक्रांत..

अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता.. आली आली संक्रांत आली.. पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली... कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली? कशावर आली?? अहो, अमेरिकेवर संक्रांत आली, लेहमनच्या दिशेने आली.. Auto Industry वर संक्रांत आली.. शेअर मार्केटवर संक्रांत आली.. कित्येकांच्या नोकरीवर गदा आली.. ज्या घरांचा भक्कम आधार होता, त्या घरांवर गदा आली.. घर सोडून बाहेर राहायची वेळ त्यांच्यावर आली.. मोठी मोठी स्वप्नं त्यांची सत्यात नाही आली.. हा जय मग कोणाचा? श्रीमंतांचा की गरिबांचा? आम्हाला केक मिळत नाही, मग तुम्हीही खाऊ नका म्हणणार्‍यांचा.. ओ ! बा आणि मा च ठरवतील भविष्यकाळ तुमचा.. समृद्धीचा देश तुमचा Currency सतत फिरवणार्‍यांचा.. पार्टीसाठी सुद्धा कर्ज काढणारा, पण चैनीत कमी नाही पडणारा! सांभाळून रे बाबांनो.. एकवेळ जेवणाचे ताट द्या पण बसायचा पाट देऊ नका तुम्ही.. ४ पैसे गाठीला ठेवा, टुकीने तुम्ही संसार करा.. मने तुम्ही साफ ठेवा.. मनाची श्रीमंती सांभाळून ठेवा.. आपल्याकडे आपण संक्रांत म्हणजे संक्रमण समजतो.. वाईट विचार हेवे दावे कटुता विसरू...