३ जून, २००९

Wish List..

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत!
 1. कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे..
 2. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे.
 3. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे..
 4. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण!
 5. एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे..
 6. आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत! merajuk
 7. केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत.
 8. घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे!
 9. हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली!
 10. गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच..
 11. भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! ..
 12. बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे..
 13. जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे..
 14. साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे! xpasti
 15. इजिप्त,हवाई आणि बाली बेटं तसेच नॉर्दर्न लाईट्स किंवा aurora borealis इत्यादी ठिकाणं पाहायची आहेत..
 16. नॉर्दर्न लाईट्स वरून आठवले, मीना प्रभूंसारखा मनसोक्त जगभर प्रवास करायचाय! नाही, मी पुस्तकं नाही लिहीणार! sengihnampakgigi
 17. आत्ताच नाही, पण काही काळाने परत आणि भरपूर शिकायचे आहे! आणि पहील्या नंबरानेच पास व्हायचेय! sengihnampakgigi
 18. कुंभार काम करायचेय.. मातीची भांडी,कप्स,बोल्स इत्यादी इत्यादी!
 19. Paragliding, Parasailing, Snorkeling आणि Bungee Jumping.. (last one seems really difficult!)
 20. ..... अजुन खूप काही!
टिप्पणी पोस्ट करा

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...