मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पुनश्च हरि ओम!

बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्लॉगवर काहीतरी लिहीतीय.. खरतर, परवा मराठीब्लॉग्स. नेट वर ब्लॉग वाचताना मला आठवलं की आपला पण एक ब्लॉग आहे.. आणि तिथे आपण काहीबाही खरडत असतो.. तुरळक कमेंट्स येतात्,त्या अर्थी काही लोकं तो ब्लॉग एकेकाळी वाचतही असत.. :) खरच, गेले काही महीने इतके धावपळीचे गेले की मी विसरून गेले होते ब्लॉग्-बिग.. (अर्थात, लग्न झाल्यावर कुणाला आठवेल ब्लॉग वगैरे! ) हे ब्लॉग म्हणजे ओढवून घेतलेलं संकटच आहे! आता बघा ना, रोज काय कमी कटकटी आणि प्रश्न आहेत का? पोळ्यांचा आकार कसा सुधरायचा? .. मीठाचा अंदाज कसा बरोबर येईल..तसेच, गाडी चालवताना समोरून गाडी आल्यावर हॉर्न मारू की ब्रेक मारू? ... समोरचा अमेरीकन काय बडबडतोय कधी कळेल? ..... याबरोबरच आता ब्लॉगवर काय लिहायचं हा प्रश्न आला.. बा़कीच्या प्रश्नांची उत्तरं कधी ना कधी तरी मिळतीलच( हो, मी इतकी वाईट नाहीय स्वयपाकात.. येईल हळू हळू.. ) पण ब्लॉगवर काय लिहायचं याचं उत्तर मला तरी कधीच मिळत नाही.. ( "मग लिहायचा कशाला?" म्हणू नका.. असं उगवत्या लेखिकेला नाऊमेद करू नये...!) असो.. तर दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.. निदान महीन्याकाठी त...

पेन-स्केच

(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )

नेनचिम!

काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... ! खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!) नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि ...

hmmm... nostalgia ! (कॉलनीचा गणेशोत्सव)

आज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले !! कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग ! बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे... :) दुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ! ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही! त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी व...
काही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) पाहीले.. खूपच छान काढलं होतं, आणि ते पाहूनच आपणही try करावा असं वाटायला लागलं, साध्या वहीवर काढून पाहीले.... well.. अजुन सुधारणेला खूपच वाव आहे, पण पहीला प्रयत्न बर्‍यापैकी जमल्यामुळे छान वाटतंय.. :) ( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय! ) सद्ध्या डीजीटल कॅमेरा आल्यामुळे हेच चित्र फोटो काढून चिकटवत आहे.. आधीचं सेल्-फोन वरचं चित्र फारच गरीब आहे! :) आणि त्याची अशी फ्रेम करून स्वयपाकघरात लावलीय.. ** click on the images to view the enlarged image.
मागचा आठवडा फारच मस्त गेला! आठवड्याच्या सुरवातीलाच Junior College च्या Principal सत्यनारायण मॅडम भेटल्या.. खरंतरं, दिसल्या... पण चक्क चक्क त्यांनी मला ओळखलं.. आणि आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारल्या!! कॉलेज चालू असताना मी कधी बोलले नव्हते... तरी त्यांनी मला ओळखलं,बोलल्या... सही वाटलं.. (तेव्हा कधी वाटलं नव्हतं सत्तूला पाहून,बोलून मला एव्हढा कधी आनंद होईल... :D किती त्रास द्यायचो आम्ही त्यांना!!! ) फक्त एवढंच नाही.. तो आठवडाच वेगळा होता! Junior collegeचे एक सर, MIT मधले chemistry चे कोकाटे सर, आणि साठे मॅडम सुद्धा दिसल्या.. !! जबरी वाटलं.....आणि जबरी वाटलं म्हणून आश्चर्य सुद्धा ! मी कधीच फार sincere/fav student नव्हते.. (हम्म्म.. black list मधे पण नव्हते बरका...) पण तरी या शिक्षकांनी आपली आठवण ठेवली, मला त्यांना भेटून आनंद झाला(आणि त्यांना मला भेटून!) यामुळे मजा वाटली! एकंदरीतच जुन्या आठवणींमधे किती रमतो ना आपण? जुने दिवस, शाळा-कॉलेज मधले शिक्षक,मित्र-मैत्रिणी....त्यांना भेटल्यावर आपल्याला तो काळ आठवतो.. एकदम tension free,मस्त life होतं ते.. तेव्हा कदाचित तितकं जवळचे कुणी वाटत नसेलही, परंत...

I knew I loved you before I met you ...!!

हल्ली काही लिहायला सुचतच नाही... स्वस्थपणा मिळाला नाही तर ते सुचणे अवघड आहे.. सो, सद्ध्या फक्त एवढंच..माझ्या अतिशय आवडत्या गाण्याच्या ओळी! I knew I loved you before I met you ...!! ( savage garden) Maybe it's intuition but some things you just don't question Like in your eyes, I see my future in an instant And there it goes, I think I found my best friend I know that it might sound more than a little crazy but I believe... I knew I loved you before I met you I think I dreamed you into life I knew I loved you before I met you I have been waiting all my life There's just no rhyme or reason Only the sense of completion And in your eyes,I see the missing pieces I'm searching for I think I've found my way home I know that it might sound more than a little crazy but I believe... I knew I loved you before I met you I think I dreamed you into life I knew I loved you before I met you I have been waiting all my life ... A thousand angels dance around you I am complete now tha...