मुख्य सामग्रीवर वगळा

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !


गेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी.

सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द?) आला आणि आवडेनासे झाले लिखाण.

 नंतर कधीतरी अचानक सुनील सुकथनकरांची कुंडलकर ह्यांच्या लेखनावरची प्रतिक्रिया वाचनात आली. बाकी कशाही पेक्षा 'गृहिणी' ह्या लेखावर जास्त रोख दिसला म्हणून कुंडलकरांचा तो लेख आधी वाचला. पहिल्या वाक्यातच मी थक्क झाले.

  स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला.

एखाद्या प्रचंड मोठ्या सॅम्पल साईझबद्दल किती किती पूर्वग्रहदूषित वाक्य असावीत एका मोठ्या वाक्यात? तुम्हाला एक ५-१० स्त्रियांचा वाईट अनुभव येऊ शकतो. मलाही आहेच की. की किती त्या बायका सतत रडगाणी गात असतात वगैरे. पण जमात वगैरे शब्द वापरून निकालात काढू का आपण? मला तरी शक्य नाही. पुढे अशी बरीऽच वाक्यं आहेत. ती सगळी कोट करत बसणे मला शक्य व्हायचे नाही.

सुनिल सुकथनकर ह्यांची ही प्रतिक्रिया मला अगदी सर्वार्थाने पटली! मला कुंडलकरांच्या लेखातील एकांगीपणा, सरसकट जनरलायझेशन, बरीचशी झोंबेल अशी सरकास्टिक भाषा इत्यादी गोष्टी नाही आवडल्या. मला उगीचच दुसर्‍याला लागेलसं बोलणार्‍यांचे बोलणं आवडत नाही. म्हणजे तसं वागण्यामागचं कारणच समजत नाही. कुठल्या हक्काने असं एखादी व्यक्ती बोलते हे समजत नाही.

 एनीवे, मी गृहिणी आहे, मी फेसबुकवर पडीक असते (फेसबुकच काय, ट्विटर, इन्स्टा, रेडीट सगळीकडे पडीक असते), मी कर्कश आवाजात तक्रारीदेखील करत असते अधून मधून. पण त्याबद्दल बोलायचा हक्क माझे घरचे सोडून इतर कोणाला का असेल? मुळात तुम्हाला स्वयपाक व घरकाम येतं म्हणजे झालं का? तुमच्या घरी आजारी सासूसासरे, आजेसासूबाई, नणंदा दीरांच्या शिक्षणांपासून लग्नापर्यंतची जबाबदारी निभावणे व इतर हजार गोष्टी - आहेत का? ही परिस्थिती कित्येक घरांत आढळते. त्या बायका शक्य तितकं परिस्थितीला तोंड देत सगळं निभावून नेत असतात. कोणत्याही स्थरातील , घरातील बाई पाहिली तर तिची टूडू लिस्ट भयंकर प्रमाणात वाहून जात असते व तरी ती ते करत असते. तिच्या घरच्यांना तिच्या कष्टांची जाणिव असलीच तर तिचे आयुष्य थोडे तरी सुखकर म्हणायचे, पण नसेल तर तिने कोणत्या बळावर हे सतत वर्षानुवर्ष ओढून न्यायचं? आणि वर कुंडलकर सारख्या लोकांकडून सर्काझम सहन करायचा? आय मिन, हॅलो! तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच असेल, पण दुसर्याची स्पेस व एकंदरीतच दुसर्‍या व्यक्तीचा आदर करा हे बेसिक मूल्य माहित नाही काय? मला माहितीय की त्यापैकी काही गृहिणी स्वतःच दुसर्यांच्या आयुष्याचा, स्पेसचा व चॉईसेसचा आदर राखर नसतील. पण म्हणून आपणही असंच वागायचं का? लिव्ह & लेट लिव्ह ह्या तत्वात का अवघड आहे? १० पैकी २ व्यक्तींशी आपले आजिबातच पटत नाही तर उरलेल्या ८ व्यक्तींपैकी ६ व्यक्तींमधील काही गुण अजिबात पटत नाहीत, पण आपण गुणावदोषांसकट स्विकारतो ना आपल्या आसपासच्या व्यक्तींना?

मला एकच प्रकर्षाने जाणवते, समाजातील काही व्यक्तींना काही ठराविक गोष्टींबद्दल, मुल्यांबद्दल फार टोकाची मतं असतात. ठिके धरून चालू की ती टोकाची मतं बरोबर आहेत. काहीतरी समाजात चांगला बदल त्याने होईल असे धरूया. अमुक एका जमावाबद्दल वाटत राहते की ह्यांनी बदलायला हवे, हे असे वागणे बरे नाही, अमुक एक पूर्वग्रह, चुकीच्या परंपरा सोडायला हव्या इत्यादी. जेव्हा असे वाटते तेव्हा सामंजस्याने, शांततेने बदल करण्याबाबत प्रयत्न केले तर ते हळूहळू पण नक्की घडतात. आकांडतांडाव करून, दुसर्‍याला कमी लेखून तुम्ही लांब जाताय समाजापासून. तुम्हाला जे हवे आहे ते होण्याऐवजी नक्कीच उलटा परीणाम दिसणार. स्लो & स्टेडी विन्स द रेस. बदल घडून यायला पिढ्या लोटतात.

एकेकाळी स्त्री घराबाहेर पडू शकत नव्हती, शिक्षण घेऊ शकत नव्हती ती आज आंतराळात जाते (आंतरजालात नव्हे.) ही प्रगतीच आहे. तुम्हाला खटकणार्‍या सार्‍या गृहिणी सुद्धा स्वतःचे काहीतरी करतील. भले भाषांतर करतील! पण त्याचा आदर राखणे हे तुमचे काम आहे. त्यांनी घरात बसून तक्रार केली तरी नाही चालत तुम्हाला, स्वत:चं म्हणून भाषांतरं केली ते ही नाही चालत तुम्हाला. तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की? सरदारजीच्या जोकसारखे होत आहे हे. सरदारजी बोट लावेल तिथे त्याला दुखत होते.. नंतर कळते त्याचे स्वतःचे बोटच दुखावले होते. तसे होत आहे का आपले?? चष्मा बदला, कटकट करणार्‍या बायकांमध्ये चांगले सापडेल काहीतरी. काही नाही तर निदान त्या चकली चांगली करायच्या एव्हढं तरी म्हणा? 😀

 तटी १ : ह्या गृहिणी लेखाचा पार्ट टू आलाय आहे तो बराच बरा आहे. (हे असंच लिहायचे होते की सारवासारव आहे ह्या शंकेला खूप वाव आहे. पण जाऊद्या. ते महत्वाचे नाही. लेख चांगला आहे दुसरा)

 तटी २: फेसबुकवर बर्‍यच स्त्रिया खूपच चिडल्या आहेत कुंडलकरांवर. मी पण थोडी वैतागले असीन पण माझा कुंडलकरांना डांबले पाहिजे त्या रूटीनमध्ये मग कळेल वगैरे प्रतिक्रियांना विरोध आहे. मुद्दे पकडून विरोध करणं ठीक आहे, व्यक्तीशी वाद नको. माझा विरोध हा आहे की कुंडलकरांनी लेखात सरसकटीकरण केले आहे व भाषा अतिशय चीड आणणारी वापरली आहे. माझ्या फ्रीडम ऑफ स्पीचनुसार मी इतका विरोध करू शकतेच. 

तटी ३: नंतर विचार करता, कुंडलकरांच्या लेखावर सुकथनकरांची प्रतिक्रिया हा सारा प्रकारच मला पब्लिसिटी स्टंट वाटतो! 😁आणि मी पण त्याला बळी पडलेय! 😕😕
टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा. माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस(  ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे! माय गॉड!  मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी हा आमचा ग्रुप). …

ओपन - आंद्रे अगासी

परवा झालं वाचून माझं! (आता भयानक पोकळी जाणवत आहे!)
तीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास! पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स! आणि भरपूर सेरेन्डीपिटी!
बर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल? मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात!
____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्यावर, स्ट…