एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? :D)

बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा.. :)) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे! :)
ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड!
ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं.. :)))
तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं! मला खरंच वाटत नाही.. चक्क माझा ब्लॉग वाचतं कुणी??? माझं ना नेहेमीच कन्फ्युजन आहे हे.. म्हणजे, तसं पाहायला गेलं तर माझ्या प्रत्येक पोस्टला काय २०-३० कमेंट्स येत नाहीत. येतात २-४ त्यावर माझे रिप्लाय असं धरून ५-६ फार्फार्तर.. मग असं वाटतं , ह्यॅ: तसंही कुणी वाचत नाही.. मग लिहा काहीही! तसंही नाही करता येत.. मधूनच कुणीतरी मैत्रिण, आई बाबा, नाहीतर चक्क नवर्‍याचा चुलत भाऊ, नाहीतर काकू येऊन सांगते की छान लिहीतेस.. :| आता आली का पंचाईत! लिहायचं तर आहे.. लोकांनी वाचलं पण पाहीजे आणि खरंच वाचलं की कानकोंडं होतं! याला काय म्हणायचं ?? सगळा गोंधळ!

आज आम्ही एका कामानिमित्त १००० ओकची झाडं असलेल्या गावी गेलो होतो. तर तिथे जायचा आणि ओव्हरऑल आमचा सगळीकडे जायचा मेन रस्ता US 101 मस्त ब्लॉक झालेला.. मग त्याच्या वाटेलाच न लागता सॅन्ता रोझा नी सिमिला गेलो.. तिथून बाहेर पडून दिसोटो ऍव्ह. घेतला.. तिथून शर्मन वे शोधायला अर्धा तास.. त्या मेन ऑफीस मधे आम्हाला लाईन मधून काउंटर वर जायला पाऊण तास..पुढे आम्हाला एंटरटेन केलं २० मिनिटांनी.. आणि एव्हढं करूनही काम झालं नाहीच!! आता बोला....
१ तासाच्या कामाला आख्खा दिवस गेला, आणि काम झालच नाही.. अस्सलं डोकं सरकलं होतं ना.. आम्ही दोघांनीही अशक्य चिडचिड केली... आणि मग बसलो शांत.. करणार काय नाहीतरी!

बाकीअसा दिवस गेल्यावर अजुन काही काम कधी होतं का..!?! बरेच दिवस काही वाचावं म्हणतीय.. (म्हणजे जरा अभ्यास कसा असतो ते आठवेल या दृष्टीने..) तर शक्यच होत नाहीये.. कॉन्सन्ट्रेशन नावाची चीज कुठे मिळेल? आणि ती कशी वापरायची? हे कुणीतरी मला सांगायची फार वेळ आलीय. एक तर हे नेटवरील पेपर/साईट्स वाचनामुळे, सलग, एकसंध भरपूर वेळ वाचायची सवयच गेली आहे हे मला एव्हढ्यातच लक्षात आलंय.. ! बाकी हे नेटवरील वाचनाचंही काही खरं नाही! पेपर एकवेळ ठीक आहे हो.. पेपर मधून राजकारण येणारच! पण आजकाल जे मराठी साईट्स वरून राजकारणाचे रंग दिसायला लागलेत.. ते पाहून माझी इंटरनेटवरील मराठी विरक्ती* जवळ आलीय हे समजतंय मला.. च्यामारी या लोकांना काय उद्योग आहेत की नाहीत? गपगुमान लिहा काहीतरी, कमेंट्स टाका.. इत्यादी करायचं सोडून.. हे संकेतस्थळ असंय, ते तसंय.. हा असं बोलला वगैरेसारखी इयत्ता पहीली तुकडी ब सारखी भांड्णं करतंय पब्लीक!
इंट्रेस्टच गेला.. आता खरंच काहीतरी क्रिएटीव्ह, किंवा निदान फ्रुटफुल असं एखादं काम करावं असं वाटतं.. त्याच मूडात येऊन या ब्लॉगचे डोमेन नेम चेंज केलं.. अजुन एक ड्रुपलवर आधारीत साईट काढली.. वेल, या संकेतस्थळांच्या गर्दीत नाही येणार ती नक्कीच.. ती माझी पर्सनल साईट असेल.. तसं ’मी’ ऍज सच काही केलं नाही पण लई भारी वाटतंय.. वेब होस्टींग,ड्रुपलचे सगळे कन्ट्रोल्स, थोडंफार पीएचपी शिकले.. खूप खूप दिवसांनी माय एस्क्युएल मधे काम केलं..
सो, ह्म्म.. जर्रा बरं वाटतंय.. ’काहीतरी’ केलं! वर्षाची सुरवात चांगली झाली म्हणायची..!
अजुन खूप गोष्टी आहेत डोक्यात.. एखादं जाहीर पोस्ट लिहावं का संकल्पांवर? म्हणजे लाज वाटून पूर्ण होतील ते?? :)) नॉट अ बॅड आयडीआ! :D

असो.. पुष्कळ बाष्कळ बडबड केली.. आता कल्टी.कॉम.. पुन्हा भेटू मंड्ळी.. (आय होप मी पुढ्च्या वेळी इतकं असंबद्ध पोस्ट नाही लिहीणार! :))

-भाग्यश्री..

* त.टी : हा वाक्प्रचार हल्लीच वाचला एका साईटवर.. फुल्टू फिदा झालीय मी! म्हणून वापरलेला आहे. :)

टिप्पण्या

Raj म्हणाले…
तुलाही नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा! मूड परत येण्यासाठी शुभेच्छा! :-)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!