सूर्य-ढगांची लपाछपी
आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!
आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :(
सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :)
(हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( )
बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा!
किती उच्च कॅमेर्याने फोटो काढले की तो निसर्ग कॅमेर्यामधे आणणे आणि जसे डोळे कॅप्चर करतात तसंच फोटो मधे येणे कधी जमेल??
(Flickr Link)

टिप्पण्या
पण माझा अनुभव असा आहे की ज्या क्शणांचे मी फोटो काढले नाहीत ते माझ्या आत जास्त खोल रुजले आहेत...
कदाचित निसर्ग पाहायला मी आधी शिकले आणि फोटो काढायला फार नंतर शिकले म्हणून अस होत असाव...
?
template distay ka nit pan?
mala veg-veglya browsers ani OS var veg-vegla distay.. plz gimme a feedback, mi navin post lihit nahi mhanje.. :D
http://farm4.static.flickr.com/3409/3650583125_35a89ed27b_o.jpg