सूर्य-ढगांची लपाछपी

आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!
sun1

sun2

आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :(

सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :)
sun3

(हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( )

बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा!
sunclouds1

sunclouds2

sunclouds3

किती उच्च कॅमेर्‍याने फोटो काढले की तो निसर्ग कॅमेर्‍यामधे आणणे आणि जसे डोळे कॅप्चर करतात तसंच फोटो मधे येणे कधी जमेल??
(Flickr Link)

टिप्पण्या

aativas म्हणाले…
फोटो छानच आहेत...
पण माझा अनुभव असा आहे की ज्या क्शणांचे मी फोटो काढले नाहीत ते माझ्या आत जास्त खोल रुजले आहेत...
कदाचित निसर्ग पाहायला मी आधी शिकले आणि फोटो काढायला फार नंतर शिकले म्हणून अस होत असाव...
Unknown म्हणाले…
hey thanks for your comment..
Yawning Dog म्हणाले…
parat template badalanyache kaam suru ka :D
?
भानस म्हणाले…
भाग्यश्री, फोटो छान आलेत गं.:)
अनामित म्हणाले…
भाग्यश्री ताई, तुमचा ब्लॉग उघडल्यावर आज कुठले नविन छानसे विचार वाचायला मिळणार याचबरोबर कुठले नविन भन्नाट टेंप्लेट बघायला मिळणार याचिही उत्सुकता असते :) बाकी फोटो मस्तच आहेत.
Unknown म्हणाले…
thanks saglyanna !! :)

template distay ka nit pan?
mala veg-veglya browsers ani OS var veg-vegla distay.. plz gimme a feedback, mi navin post lihit nahi mhanje.. :D
अनामित म्हणाले…
टेंप्लेट अजिबात रिडेबल वाटत नाही :(. I had to select the text to read it. m using google chrome browser.
Unknown म्हणाले…
yup anonymous, i am doing some changes.. some of the images are not loading... it will be better soon.. ! :)
Unknown म्हणाले…
okay, i suppose the template works fine now.. please tell me if you can see my blog like this --- >

http://farm4.static.flickr.com/3409/3650583125_35a89ed27b_o.jpg
bheeshoom म्हणाले…
हाहा!! काय कमाल आहे!! आज मुंबई मध्ये सुध्दा हाच प्रकार चालु आहे!!! आणि हेच मी ब्लॉगवर पण टाकणार होतो!! पण आता तुम्ही हे सगळं फोटो सहीत लिहिल्यावर मी काय लिहू!!?? बाकी फोटो रॉकींग आहेत!!
Unknown म्हणाले…
भीशूम, टाक की फोटोज! तुझे केव्हाही बेस्ट असतील फोटोज! नक्की टाक! :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

'मेरू'