माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )

’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. senyum

बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे.. :) ) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले.. सोल्वॅंग .. ( Solvang - Danish word meaning ' sunny field' )

ठिकाण ठरलं.. भल्या पहाटे उठल्यामुळे दुपारचे १२च वाजले होते! sengihnampakgigi आवरून, ब्रेकफास्ट(!) करून निघायला २ वाजलेच असते... पटकन खाणं आटोपले आणि आवरून २.१५ ला घराबाहेर पडलो.. तसा उशीरच म्हणायचा! पण उन्हाळ्याची हीच तर मजा ना?

पण जसे वाटले तसे घडले तर ट्रीप कसली?? अंहं, काहीही अनुचित प्रकार नाही झाला! फक्त अस्मादिकांच्या अहोंनी सर्प्राईज द्यायचे ठरवले! गाडी सॅन्ता बार्बराच्या रस्त्याला, इथली लाईफलाईन असलेल्या १०१ फ्रीवेला लागल्यावर त्याने सांगितले की आपण आधी एका लेक - तळ्यापाशी जाणार आहोत ! मग काय, अजुनच खुष ! रणरणत्या उन्हात , जंगलाच्या सावलीत आणि नितळ शांत पाण्याच्या शेजारी बसायला कोणाला नाही आवडणार??

त्या लेकचे नाव, कशुमा लेक.. ( Cachuma Lake ) सॅन्ता बार्बरा स्टेट पार्क मधे वसलेले.. अर्थात इतक्या सुंदर जागी जायला तितकाच सुंदर रस्ता पाहीजेच! होता देखिल...
From Cachuma Lake, Solvang 1

From Cachuma Lake, Solvang 1

From Cachuma Lake, Solvang 1

From Cachuma Lake, Solvang 1

नुसत्या रस्त्याचेच इतके फोटो काढण्याची वेळ कधी आली नव्हती.. भरपूर इन्क्लाईन असलेला प्रचंड वळणावळणाचा, खाली त्याहून प्रचंड दरी असलेला आणि तितकाच गर्दीचा हा रस्ता! त्याचं देखणेपण वर्णायला शब्दच नाहीत..

असंच फोटो खेचत, व्हीस्टा पॉईंट्सना थांबत अधून मधून ड्राईव्हींग डिरेक्शन्सकडे लक्ष देत प्रवास अगदी मजेत चालला होता! इतकं म्हणजे इतकं फ्रेश वाटत होतं! ऊन जरी असले तरी घनदाट जंगलामुळे ते कधी फारसा जाणवलेच नाही .. उंचावर ते पण पाण्याजवळ असल्याने गार वारा सुटलेला, बरोबर अखंड गप्पा आणि गाणी !! एकंदरीत धमालच!

पण अमेरिकेत कधी होत नाही ते घडले! डिरेक्शन्स सांगत आहेत की ४.५ माईल्सवर लेकचा एक्झिट येईल, तो १४ माईल्स झाले तरी येईना! आजुबाजुला अतीव निसर्गसौंदर्य असले तरी हवे ते ठिकाण नाही मिळाले की चुटपुट लागते ना.. धड इकडे तिकडे पाहताही येईना.. कुठे गेले तळे? श्या, सापडायलाच पाहीजे.. पण तसं म्हटलं तर जंगलात आपण! जीपीएस नसताना शोधू म्हटले तरी कसं शोधणार? वगैरे विचार चालू असताना एकदाचं कडेला निळं निळं चमकलं !! senyum वळु मधल्या डुरक्या सारखे नुसतेच आधी शिंग दाखव, डोळे दाखव असं तळ्याचे निसटते दर्शन होत होते.. आणि असा सस्पेन्स असला तरी खात्री होती की इथे ’अपेक्षाभंग’ होणार नाही !

केवळ ८$ चे तिकीट काढून आत गेलो.. भरपूर झाडी, ठिकठिकाणी पाट्या.. भरपूर अमेरिकन्स होतेच!! ते कुठे आणी कधी नसतात? ( खरंच बुआ, एन्जॉय कसं करायचे हे यांच्याकडून शिकावे! )
’फन प्लेस’ लिहीलेल्या दिशेने आम्ही जाऊ लागलो.. अधून मधून छत्र्या लावून बाकडी ठेवली होती, तिथे काही लोकं जेवत होते, खेळत होते..तर काही जण RVs घेऊन निवांत क्षणाची मजा लुटत होते, तर काहींची स्वयपाकाची तयारी चालू होती.. ह्म्म, फील यायला लागला पिकनिकचा!!

तसेच रस्त्याने जात राहीलो आणि ’फिशिंग पीयर’ लागला.. तिथून थोडं पुढे गेलो फिरत फिरत.. आणि असा व्ह्यु दिसला !
From Cachuma Lake, Solvang 1


From Cachuma Lake, Solvang 1

त्याचे कितीही फोटो काढले असते तरी कमीच झाले असते.. शेवटी परत फिशिंग पियरला फिरलो.. गाडी पार्क करून छोटुस्सं टेकडुलं उतरलो..
From Cachuma Lake, Solvang 1
(हा शब्द मी शोधलाय.. इतक्या गोड प्रकाराला उतार किंवा चढ काय?? काहीतरीच! )

आणि, हा आला फिशिंग पियर ! जोर्रात गेलो खरं, पण तो प्रकार बोटीसारखाच होता ! इतका डुगडुगत आणि पाण्याच्या लहरींवर डुचमळत होता की अगदी बोटीत बसल्यासारखे वाटावे !
From Cachuma Lake, Solvang 1
तिथे जरा (म्हणजे बरीच) फोटोग्राफी केली!
From Cachuma Lake, Solvang 1
From Cachuma Lake, Solvang 1
पाण्यात हात घातला.. Santa Ynez नदीचे ते लेकमधले पाणी छान वॉर्म होते.. ( नाहीतर तो प्रशांत महासागर? नुसता बर्फ ओतलेला असतो त्यात! पाय जरी घातला तरी बधीर होऊन जाईल! )

शेवटी अतिशय नाखुषीने तिथून निघालो..पण पुढे दिसला मस्त वॉकींग ट्रेल ! लुप ट्रेल होता.. त्यामुळे लेकच्या बाजूबाजूने भरपूर फिरवून आपण त्याच भागात येतो परत.. चालायला लागलो..
From Cachuma Lake, Solvang 1

छोटी पायवाट, डावीकडे चढ, उजवीकडे उतार आणि खाली पाणी! लांबवर दिसणारे ते पाणी, ती शांतता सगळं भारून टाकणारे वातावरण !
From Cachuma Lake, Solvang 1

तिथेच मला वैशिष्ट्यपूर्ण फोटो मिळाले.. लाल पान, हिरवी पानं वगैरे..

From Cachuma Lake, Solvang 1
From Cachuma Lake, Solvang 1

एक गोड खारुटली पण सापडली! धीट होती बरीच !
From Cachuma Lake, Solvang 1
From Cachuma Lake, Solvang 1

वॉकींग ट्रेल मधून निघून बोटींग एरिआ मधे आलो.. ऍक्चुअली इथे खूप मस्त ऍक्टीविटीज करता येतात. पण आम्ही दोघंच आणि तेही आयत्यावेळेस गेल्याने काही विशेष नाही करता आले.. पण हायकींग, ट्रेकींग, कॅम्पिंग, बोटींग, फिशिंग हे तर करता येतंच.. शिवाय तिथे स्विमिंग पूल व राहण्यासाठी यूर्ट्स, केबिन्स उपलब्ध आहेत.. ज्याची किंमत ६०-७० डॉलर्स / नाईट पासून २००-३०० $ पर नाईट आहे.. बुकींग अर्थात ६-६ महीने आधी होते!! त्यामुळे करायचे झाले तर खूप काही करता येते, पण ते नसलं तरी काहीच बिघडत नाही!
From Cachuma Lake, Solvang 1

बोटींग एरीआ मधली वेळ संपत आल्याने गर्दी तुरळकच होती.. तिथे असलेली माणसं आपापल्या बोटी परत नेण्याच्या कामात गढल्यामुळे आम्हाला ते कसं करतात हे कळले ! गाडी अगदी पाण्यात पार उतरवून त्यावर बोट आणतात.. किती हौशी लोकं ही , खरंच !
From Cachuma Lake, Solvang 1

From Cachuma Lake, Solvang 1
तिथे जरा वेळ खादाडी केली... आणि प्रयाण केले पुढच्या ठिकाणी अर्थात - सोल्वॅंग !!
From Cachuma Lake, Solvang 1
क्रमश:

टिप्पण्या

Dk म्हणाले…
Hmmmm sahiich aahe he bhtkantee :) briich majja keleli distye :D
Bhagyashree म्हणाले…
yes bharpur bhatkantee zali! :)

dusarabhaag lihite lavkarch..
भानस म्हणाले…
अगं खारीला काय सही पकडलसं तू. gr8. ट्रिप जोरात ना...:)
Bhagyashree म्हणाले…
thanks sagle! :) khari la pan tiche kautuk pochavte..
अनामित म्हणाले…
hey mast ahe ga lekh..sahi lihites :)
सखी म्हणाले…
ohh,शेवटी माझं आवडतं टेम्प्लेट आलंच परत..hushh!! :)
छान आलेत फोटो आणि स्पेशली खारुताई.
Bhagyashree म्हणाले…
Anonymous thanks..
sakhi, ala parat te template! mi hi ata hussh kelay! everything is working fine now and there won't be any need to search for beautiful templates again in my life (i hope! :D )

thanks for your comment! :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!