मुख्य सामग्रीवर वगळा

भुकंप .. !

लॉस एंजिलिस मधे काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान ५.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाला.. (आधी ५.८ म्हटले, नंतर ५.६,५.४ करत आता ५.४ म्हणत आहेत.. हे कसे, माहीत नाही!) जीवितहानी काही झाली नाही, तसेच काही ठीकाणी तुरळक वित्तहानी झाली.. कमीत कमी नुकसान होण्याचे श्रेय नक्कीच इथल्या ’अर्थक्वेक रेझिस्टंट’ घरांना जाते..
मिपा वर पिडाकाकांनी हा भुकंपावर लेख लिहीला.. त्याप्रमाणेच मी ही इथे माझ्या शब्दात तो अनुभव मांडते..

माझा इथलाच काय आयुष्यातला पहीला धरणीकंप.. :) भारतात व्हायचे तेव्हा अस्मादीक झोपलेले असल्यामुळे कधिही कळला नाही.. इथे आज, सकाळी मस्त उशीरा उठून मिपावर टीपी करत बसले होते तर तासाभरात धबधब्धब आवाज्,सोफा,खिडक्या,दारं,झुंबरं, दिवे सगळं काही हलतंय , उठून उभी राहीले तर माझ्यासकट खालची जमीन, आख्खं घर हलतयं हा अनुभव अतिशय स्केरी होता!! असा भुकंप मी भारतात नाही अनुभवला.. कदाचित लाकडाची घरं असल्यामुळे असेल, पण सगळं घर लोकल मधे ठेवल्यासारखं हलत होते.. मी थरथर कापत होते लिटरली..प्रचंड सैरभैर झाले.. त्यातुन वरून्,शेजारून लोकं बाहेर येण्यासाठी पळत सुटली होती, त्याचाही आवाज होत होता.. कशी बशी दारा पर्यंत आले, तर तोपर्यंत भुकंप बंद झाला होता.. मग बसले घरातच.. नवर्‍याला फोन करायचा प्रयत्न केला.. पण नेटवर्क ढपलं होतं.. अजुन १०-१५ सेकंद्स जरी चालू राहीला असता भुकंप तर मी रडायला लागले असते फॉर श्युअर.. पण नशिबाने नवरा पण ऑफीसातून लगेच घरी आला.. आणि एकदाचे हुश्श वाटले.. पुढे अर्धा तासतरी मी कापत होते.. आयुष्यात प्रथम मी इतकी घाबरले.. घर कोसळतंय की काय सुद्धा वाटलं.. पण ठीके, आता एकदा इथला भुकंप कळल्यावर नेक्स्ट टाईम नाही काही टेन्शन येणार.. पिडाकाकांसकट सगळ्या कॅलीफॉर्निया-स्थित आप्तेष्टांनी प्रेमानी हेच सांगितलं 'वेल्कम टू कॅलिफॉर्निया'.. त्यावरून हे असं होतंच राहतं असं दिसतं! :) तेव्हा पुढल्या वेळेस पहील्याप्रथम बाहेर पळीन! :)
Signature2

टिप्पण्या

निनावी म्हणाले…
1992 cha latur cha bhukampa anubhavlay mi. Amcha ghar aksharshaa halat hota. Shale madhe patients hote mhanoon shala did mahina banda hoti amhi sagle pora mothi zoli gheun galli galli madhe jevan kapde gola karat hindahycho.
Raj म्हणाले…
भूकंपाचा पहिला अनुभव कायम लक्षात राहतो. सर्वकाही ठिक आहे हे वाचून् बरे वाटले..
पुढच्या वेळेसाठी best of luck!!! :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??