माझे विचार...
विचारांना शब्दांत बांधायच्या प्रयत्न..
March 15, 2012
ajun ek punaragaman.. :)
| टिप्पण्या : |
नीलरंगी रंगले…
नीलरंगी रंगले…
वॉव !! किती दिवस झाले म्हणे ब्लॉग अपडेट करून?? दिवस कशाला मोजू? साधं माझ्या ब्लॉगला मला लॉगिन करता येईना, यावरूनच समजतंय! शेवटी गुगलला शरण गेले नेहेमीप्रमाणे..की बाबारे वर्डप्रेसच्या अॅडमिन पॅनेलची वाट दे शोधून.. अन त्याचा हात धरून आले.. ![]()
असो !
एक न्युज तुम्हा वाचकांबरोबर वाटायची आहे..
मी आई झाले.. :O
कसलं भारदस्त वाटतंय असं लिहायला!
स्वत:लाच पिल्लू समजणार्या मला, आता आई म्हणणारे एक पिल्लू आले आहे! ’नील’ त्याचे नाव.
ते साखरेचे पोते अलिकडेच २ महिन्याचे झाले. व मला थोडासा वेळ मिळू लागला. म्हटले काही नाही तर ब्लॉगवर पुनश्च हरि ओम, पुन्हा एकदा करावे..
मी आत्ताच्या घडीला तरी नीलरंगी रंगले आहे. गंमती जमती होत असतात रोज!
उदा: पूर्वी नील रशियन परिकथेत गोष्ट आहे तसा एकच डोळा बंद करून झोपायचा! हाहा..
किंवा नीलला कपाळाला आठी , डोळे मोठे व चेहर्यावर हसू असा धमाल चेहरा करतो येतो! करून बघा! आठी व डोळे मोठे जमतच नाहीत. हसू तर लांबची गोष्ट!
शीशी करताना तर स्वारी अफाट खुष असते! त्यामुळे बाळ व्हायच्या आधी ज्या गोष्टीचे जरा टेन्शनच होते ती एकदम मस्त होऊन गेलीय! हीही.. मी तर आता त्या मोमेंटची वाट पाहात असते…
नील अगदी लहान असल्यापासून जोर्रात ’अगं…” असं म्हणतो.. मेजर क्युट प्रकार आहे तो..
एकंदरीत धमाल आहे! रोजचा दिवस नवीन उजाडतो.. पूर्वी किती प्रचंड वेळ मिळायचा हे आता तो मिळत नसल्यामुळे जाणवू लागले आहे..
तरीही जमेल तसा, तेव्हा ब्लॉग लिहावा असं मनात आहे. बघू काय होतंय! ![]()
| टिप्पण्या : |
थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Thai Veggie Stir Fry & Chicken Linguine Noodles]
थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स
लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भाज्या :
गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित )
थोडेसे भाजलेले दाणे (नवर्याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी मध्ये नव्हते)
५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून
वाळलेली लाल मिरची कुटून
कुकींग वाईन (असल्यास.) (माझ्याकडे नव्हती. मी थोडे व्हिनेगर+लिंबूरस घातले)
सॉस :
(तिखट) चिली सॉस,
सोया सॉस ( मी कमी सॉल्ट असलेला आणि अगदी थोडाच वापरला)
थाई स्वीट चिली सॉस
१/३ कप व्हेजिटेबल अथवा चिकन स्टॉक.
अर्ध्या लिंबाचा रस
चमचाभर मध ( गोड हवं असल्यास अजुन जास्त घेता येईल)
२ टीस्पून कॉर्न स्टार्च ४ टेबलस्पून पाण्यात मिसळून. (कॉर्न स्टार्च नसल्यास ४ टीस्पून मैदा घ्यावा)
क्रमवार पाककृती:
स्टर फ्राय सॉसः
सर्वप्रथम कढईमध्ये व्हेज /चिकन स्टॉक , चिली सॉस, सॉय सॉस, थाई चिली सॉस, लिंबाचा रस घालून गरम करत ठेवणे. रेसीपीमध्ये मधही यातच घेण्यास सांगितला होता. परंतू तो गरम करू नये असे वाचले असल्याने मी तो शेवटीच मिक्स केला.
या वरील मिश्रणाला थोडी उकळी आली की ठेचलेला लसूण व पाण्यात मिक्स केलेले कॉर्न स्टार्च घालणे.
कॉर्न स्टार्चमुळे सॉस थोडा घट्ट झाला की हे मिश्रण बाजूला ठेवून देणे.
स्टर फ्राय भाज्या :
थोडेसेच तेल घेऊन त्यावर सिमला मिरची, दाणे घालणे. दाणे थोडे परतले गेले की बाकी सर्व भाज्या अॅड करणे.
थोडासा चिली सॉस, सॉय सॉस, कुकींग वाईन / व्हिनेगर + लिंबूरस घालणे.
तसेच थोडी वाळलेल्या मिरचीची पूड घालून झाकण ठेवून शिजवणे.
हे झाल्यावर वर तयार केलेला स्टर फ्राय सॉस या भाज्यांमध्ये मिसळून एकजीव करून त्याची वाफ काढणे.
झाले तयार थाई व्हेजी स्टर फ्राय ! स्मित
चव : लिंबामुळे आंबट, सॉय सॉस मुळे खारट, चिली सॉस व स्वीट चिली सॉस मुळे गोड-तिखट व मधामुळे गोड अशी एकत्र अफलातून लागते! स्मित
या बरोबर मी चिकन लिंग्विनी पास्ता/नुडल्स केला होता. त्याची रेसीपी छोटीच असल्याने इथेच देते.
गव्हाचे लिंग्वीनी नुडल्स मीठ असलेल्या पाण्यात शिजवून घेतले.
नुडल्स साठी रोस्टेड चिकनचे पीसेस(फ्रोझन आणले) कॉर्न स्टार्च व सॉय सॉसच्या मिश्रणात मॅरिनेट केले.
व्हेज हवे असणार्यांनी ही स्टेप गाळली तरी चालेल.
पॅनमध्ये थोडे तेल गरम करून सिमला मिरची, पातीचा कांदा, थोडा साधा कांदा परतून घ्यावा.
मॅरिनेट केलेले चिकन (स्टार्चसकट टाकले तरी चालेल) व थोडास्सा चिली सॉस घालून एक वाफ काढावी.
व शिजवलेले लिंग्विनी नुडल्स मिसळून एक वाफ काढली. (सॉय सॉस असल्याने मीठ टाकायची गरज पडत नाही)
thai stir fry with chicken liguine
वाढणी/प्रमाण:
२ जणांनी भरपेट एव्हढेच खाल्ले तर एकावेळेस पुरेल. ![]()
अधिक टिपा:
पटकन करा व मटकवा ! स्मित
माहितीचा स्रोत:
स्टर फ्राय अबाऊट.कॉमवरून व लिंग्विनी स्वप्रयोग.
| टिप्पण्या : |
एक भन्नाट दुपार !
एक भन्नाट दुपार !
शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ.
जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं! बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला! सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा! ही काय नाहीतर ती काय..
१०१ वर प्रचंड ऊन व झळा बसत होत्या. वाटलं हे अवघड होणार आहे. इतक्या उन्हाचे बाहेर पडणे आजकाल नकोच वाटते. असं मनात म्हणतीय तोवर गाडीने व्हेन्च्युरा मागे टाकले व त्याच वेळेस ढगांनी सूर्याला ! जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला.
अरे पण हे काय ! असे दृश्य मी खरंच कधी पाहीले नाही.
नावाला जागणारा संथ प्रशांत महासागर, ढगा दाटून आल्याने सूर्यदेव व उजेड तात्पुरत्या ब्रेक वर गेलेले, जितके ढग आभाळात त्याहून जास्त खाली समुद्रावर उतरलेले. व त्या सर्व वातावरण निर्मितीमुळे समुद्र चक्क उभा दिसत होता. म्हणजे कळलं ना? समुद्र म्हटल्यावर कशी दूरवर एक क्षितीजाची ओळ दिसते, तसली काहीच भानगड नाही. समुद्राचे पाणी व आकाशातले ढग सगळे मिसळून गेलेले. त्यामुळे ही जमिन आहे की आकाश आहे? समुद्राचे पाणी आहे की ढग आहे काही कळेनासे झालेले..
हळूहळू आमच्या आवडत्या ‘एमा वुड स्टेट बीच’ पाशी गाडी जावू लागली तशी नेहेमीची RVची गर्दी दिसू लागली. आम्हीही मग आमचा खाऊचा डबा काढला व बीचवर एका खडकावर बसून वातावरणाचा आस्वाद घेऊ लागलो. इतकी सुंदर हवा होती ! अगदी ५-७ मिनिटांपूर्वीच उन्हाच्या झळांनी मी वैतागले होते हे खरे सुद्धा वाटणार नाही, अशी!
आमच्या पाठीमागेच मोठ्ठाल्ला डोंगर ढगांची दुलई पांघरून बसलेला.
मग मी ही थोडंफार फोटोसेशन करायचा प्रयत्न करू लागले. पण मला अजुनही ढगाळ हवेत छान क्लिअर फोटो काढता येत नाहीत. मग ते पिकासावर कॉन्ट्रॅस्ट सांभाळा वगैरे करावे लागते. पण तरी काढले.
तेव्हढ्यात निनाद ओरडला, ” ए तिकडे बघ समोर, पाण्यात !! ”
“काय आहे??”
“अगं मासे दिसतायत.. ”
“नाहीरे, ही सर्फिंग करणारी लोकं असले कपडे घालतात की ते मासेच वाटतात.. सोड.. ”
“बघशील का जरा??”
“ओके.. बघुया.. ”
आणि मला चक्क पाण्यातून एक त्रिकोण वर आलेला दिसला.. शार्क?? :अओ: इतक्या जवळ?? आणि ही लोकं काय आरामात पोहत आहेत!!
थोडं नीट पाहील्यावर (आणि अर्थातच थोडा कॉमन सेन्स लावल्यावर ) कळले की ते डॉल्फिन्स होते !! ![]()
ऐकले होते, पाहीलेही होते, पण डॉल्फिन्स इतके माणसाळलेले किंवा फ्रेंडली असतील याची काहीच कल्पना नव्हती! इतके मस्त पोहत होते.. लाट आली मोठी, की तिच्यावर सवार होऊन धिंगाणा करत होते !
ही बाई दिसतीय ना? तिच्या समोरच जवळपास ६-७ डॉल्फिन्सचा मित्रगण एकत्र पोहत होता. इतकी धमाल करत होते ना ते, की नुसते बघत राहावेसे वाटत होते. सगळे एकामागून एक डुबकी मारायचे पाण्यात.. आणि मग मोठी लाट आली की परत तिच्याबरोबर पोहायचा खेळ! फार हेवा वाटला त्यांचा! त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने पोहाणार्या या लोकांचाही! आम्ही काही पोहाण्याच्या इराद्याने आलो नव्हतो, नाहीतर आम्हालाही धमाल करता आली असती..
हळूहळू सगळे डॉल्फिन्स पोहत पोहत आमच्या डाव्या हाताला लांबवर गेले. मग काय आमचा तिथला इंटरेस्टच संपला! नेहेमी त्या जागेवर पिक्चरचा हिरो असतो समुद्र, डोंगर .. मात्र आज हिरो होते डॉल्फिन्स! ते निघून गेल्यावर बाकीचे साईडी हिरोज, अन डिरेक्टर्स कशाला पाहायचे! (तसंही ते हज्जारदा पाहीलेय.. इव्हन लोकांनाही ही जागा माहित झाली असेल एव्हाना.. :फिदी: )
तिथून निघालो, तर विनोदाच्या बीबीवर शोभेलशी पाटी दिसली. लगेच फोटो काढला! (काय हे मायबोली व्यसन!)
मग रस्त्याला लागतोय न लागतोय तेव्हढ्यात ही हिरॉईन आली! झुकझुकगाडी !!
अॅमट्रॅकची ही सर्फलाईनर मस्तपैकी समुद्रकिनार्याशेजारून , डोंगराच्या पायथ्यापासून झुक झुक करत जाते. अगदी रमत गमत .. जणू काही आतल्या प्रवाशांना अभिमानाने तिच्या आसपासचा परिसर दाखवत , त्यांना त्या जागेचा पूर्णपणे मझा लूटता येईल अशी जाते..
गंमत म्हणजे आमच्या गाडीत तेव्हाच ते ‘रब ने बनादि जोडी’ मधले ‘फिर मिलेंगे चलते चलते’ गाणं लागलं!! :फिदी: आणि निनादला तर अगदी राजेश खन्ना झाल्यासारखेच वाटू लागले !! मग त्याला ‘तेरे सपनोंकी रानी’ इथ्थेच गाडीमध्ये आहे हे सांगून जरा (ट्रेनमधून) जमिनीवर आणले.. :फिदी:
अशा सुपर्ब हवेचा आनंद घेत , फोटो काढत आम्ही निघालो सॅन्ता बार्बराच्या दिशेने..
लँड ऑफ ब्युटी !! दुसरा शब्दच नाही ..
नेहेमीसारखे बीचवर न जाता आम्ही गेलो ‘स्टेट स्ट्रीट’ला. अमेरिकेतील सर्वात सुंदर डाऊनटाऊन समजल्या जाणार्या ठिकाणी. या रस्त्यावर येऊन कॅमेरा काढायची सुद्धा शुद्ध कधीच न राहील्याने इथले फोटोज माझ्याकडे नाहीतच.
(हा एक नेटवरचा फोटो बघा या जागेचा.. )
आणि हे माझे पूर्वीचे सॅन्टा बार्बराचे फोटो.
स्टेट स्ट्रिटवर मनसोक्त फिरलो ! शॉपिंगचे खूप पर्याय आहेतच इथे. पण यावेळेस तर मला खूप इंडियन वस्तू,कपडे,नक्षीदार दागिने,स्कार्व्हज, साड्या विकणारी दुकानं दिसली.. रस्त्यावर आर्टिस्ट आपली कला सादर करत होते. एक माणूस तर ड्रमवर इतके अफाट सुंदर अफ्रिकन बीट असलेले म्युझिक वाजवत होता की सगळी लोकं तिथेच रेंगाळत होती! एक आजोबा व्हायोलिनवर अतिशय आर्त म्युझिक वाजवत होते..
असा माहौल बनतो ना इथे! पाय निघतच नाही.. असं सगळं भरपूर हुंदडल्यावर अर्थातच भूक लागली. तेथील गलंगा थाई रेस्टॉरंट मध्ये आयुष्यातील सुंदर थाई फुड खाऊन तृप्त मनाने व पोटाने घराच्या दिशेने निघालो..
डॉल्फिन्स, ही हवा, स्टेट स्ट्रिट.. सगळ्याची धुंदी चढली होती अगदी !
अज्जिबात विसरणार नाही मी, अशी ही एक दुपार-संध्याकाळ !
| टिप्पण्या : |
Writing..Ramblings..Writing..
Writing..Ramblings..Writing..
This is absolutely the most aimless post of my blog. I know. Because I neither have any subject in my mind, nor I have any inspirational incident happened in my life so that I can pen it down before it rubs out of my memory. NO ! absolutely nothing..
Its not like there is nothing happening in my life. There are so many interesting things happening, I have read many interesting book in past few days. But I just do not have slightest piece of enthusiasm to write anything about it. I wonder why is it so? Can I not write down whatever thought come and go in my mind? nope that’s not true. I have always written whenever and whatever thought crosses my mind. I could not stop that ‘urge’ to write them down in past. Then why is it not the case now a days? Have I not remained that sensitive person like I was before? I don’t think so. I still get ‘ganga-yamuna’ in my eyes watching dumbest senti scene in movies or even reality shows just like before. I get same offended when I make silly mistakes while talking, cooking, studying etc. Yes I am just the same craziest sensitive person like I was, before this so called writer’s block hit me hard.. Then what the hell is stopping me to write any bull**** I want?
I dunno ! I think this monologue is helping me to at least de-clutter the thoughts and clean up some of the memory drawers in my brain. yeah.. I always feel there are numerous drawers in our brain. Each of them have files or documents related to one thing. When any one of the thing gets triggered in our mind (may be due to some situations, incidents ) , the other files, documents related to that scenario in that drawer gets pulled up and you get big time nostalgia-quake. Yup, memorable (in bad or good way) incidences fall from upper racks to your mind like the things from compartments in our house fall when a biiiig earthquake hits. Wow, what an Idea !! ![]()
I used to discover such an ideas when I was a student.Oh, every person is always a student. But what I mean here, is when I was(read: my parents were) actually paying for that study. I used to write down those ideas in just couple of lines in my diary. Very abstract.. If someone happened to read those lines, would never tell what those lines were about. Well, that person can be even me after 15 days !
But that was fun !
Actually looking in the past reminds me that I was never a diary-writer. I always got awesome marks and remarks on my Essays in schools. I could write anything of any length on any topic. But when my friend , Manasi, told me to write a diary, I was sure that I will not be able to write that. May be that has got something to do with my nature. Sadly, I am not a retrospective person. [ hmm that's not a good thing. Can't help. I always get fascinated by the things that "might" happen in future. Or I will get sad/happy for the things in past. But I will never sit down and think about whatever mistakes I did in past to rectify them in Present ! That's so weird.. And still, everything happened the best way I wanted, as if I had worked hard to achieve them.. ! funny..
] Okay so back to writing. What I was saying is I was never a ‘present-person’. Always thinking about either past or future. How could I write a diary which basically means you have to write about things happening in current life !
I always wrote what I am gonna do in future, or what I did/did not in past. That’s so strange. No wonder I write more nostalgic stuff ! I think this is what is happening. I guess there are no more nostalgic things remained now so that I can pen them down , publically. I will either have to move to fiction or, finally in current, present state of mind.
Having been writing for almost 3 years , I think, has made me think seriously about writing. For first time in my life I am getting really serious about something. uh, don’t get me wrong here. I am not self-appreciating or boasting here. What I mean by serious about writing is that, I know now for sure I have that ‘urge’ for writing. I have not written anything on my blog since March mid. Not even in my personal diary. But all this time, I could not deny that urge for writing in me. Since this blog started , I always wrote anything that comes in my mind. ( ‘ektaaki likhan’ in marathi) But I guess its not very good thing to always write like that. To begin writing this technique is good. But to develop writing, nope! I have been reading some awesome writers past few years. And I definitely would love if I can achieve 0.1% of their writing skills! So I now need to develop the skills to write more seriously. I think I can at least try. I know I am not very good writer. But I can try to be one. And that’s why, I would not like now to write anything, everything that comes in my mind.
hmm.. I guessing I am making things lil tough for me by writing this. Because I cannot write my best in just one day. I have raised my expectations in this post but it is probable that I will write very ordinary and even again nostalgic in next post!
I will need some time, some rough work to be done, and then probably, one day, I will write neat. Let’s see.
At least, this rambling did something good.
So, was this an aimless post for me? Guess not..
| टिप्पण्या : |
ल्हानपण देगा देवा !
ल्हानपण देगा देवा !
आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल.
आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे!) असो.
मला किती लहानपणचे आठवतंय असा खेळ करून पाहायची इच्छा झाली एकदम. बहुतेक बालवाडी. अभिनव शाळेत मी होते. तो मरूनीश लाल युनिफॉर्म, फुग्याच्या बाह्या, पांढरे मोजे, लाल वेल्क्रोचे शूज, भरपूर पावडर लावलेली चब्बी चब्बी गालांची मी व डोक्यावर पांढरा हेअरबॅंड व मोगर्याचा गजरा, हातात लालच प्लॅस्टीकची जाळीजाळीची डब्याची (स्टीलचा, डबलडेकर डब्बा!
) व वॉटरबॉटलची पिशवी.. हे तयार होणे, तो सगळा युनिफॉर्म, तो घ्यायला गेलो होतो ते डेक्कनवरचे पूर्ण पोषाख, शाळेत शूज घ्यायला गेलो असताना माझ्या अवाढव्य पायाचा साईझ पाहून पहिलीतल्या मुलाचे शूज मला देणे. सर्व आठवतंय!! कसलं क्युट! तेव्हा आमचा गृप फोटो काढलेला देखील आठवतोय. तो तर महा गोड आहे. इथे द्यायचा मोह होतोय. ![]()
सगळ्यात उजवीकडची खालच्या रोमधली मी.
[टॅग करणार्याने फारच चित्रकला केलीय त्याबद्दल सॉरी! पण माझ्याकडचा फोटो सापडणे फार मुष्कील आहे.. ]
असो.. तेव्हाच्या प्रगतीपुस्तकावरचे शेरे मला अजुन आठवतात. आठवतात म्हणजे मी वाचते ते. अजुनही जपुन ठेवलंय ते. वेल, त्याला प्रगतीपुस्तक म्हणणे फारच रखरखीत आहे. इतकं गोड पुस्तक आहे ते. मी मोगरा ग्रुपमध्येच होते वाट्टं. बाईंनी लिहीले होते की ही फार मिक्स होत नाही, एकटीच खेळत असते. सर्व वार, आकडे, रंग ओळखू येतात.
सगळ्यांसमोर येऊन गाणी म्हणणे आवडत नाही. बुजते फार. थोडक्यात मोकळी होत नाही पटकन. तेव्हढं पाहा असं पालकांना सांगितले होते.
मला कमाल याची वाटते, की त्या बाईंनी माझा स्वभाव किती परफेक्ट ओळखावा? मी अश्शीच आहे! तेव्हाही मी मुलांच्यात जाऊन खेळण्यापेक्षा एकटंच चित्र रंगवणे, नाहीतर चिकटकाम करणे अशा गोष्टीत इंटरेस्ट घ्यायचे. पुढेही जरा तसेच. अभिनव मध्ये मी ६ वी पर्यंत होते. माझे मित्र-मैत्रिणी म्हणजे – माझ्या शेजारीच बसायच्या म्हणून दिप्ती,बेला मैत्रिणी व एकाच कॉलनीत राहयचो म्हणून आया एकत्र शाळेत पाठवायच्या त्यामुळे झालेले मित्र – ओंकार किशोर. बस्स..
बाकी सर्वांशी बोलत बिलत असीन मी. पण तेव्हा मला मैत्र यांच्याशीच वाटायचे. तसे आजूबाजूला बसणारे देखील माझे फ्रेंड्स होते. माझा मैत्रीचा पल्ला कधीच एक-दोन बेंचेसच्या पलिकडे का गेला नाही हे मला उमगत नाहीये! पण तसं आठवायला गेलं तर मागच्या बेंचवर बसणारा स्कॉलर जंगम(जंगम तू हे वाचत असशील बहुतेक!
) त्याच्या शेजारी कोण बसायचे आठवत नाही. पण आम्ही एका तासाला जोक्सचे पुस्तक वाचत बसलेलो आठवतंय. किंवा हात फ्रॅक्चर झालेला राजे. अभिनव व पुढे गरवारेला देखील सेम वर्गात , मागच्याच बेंचवर बसाणारा आल्हाद, जबरी लंगडी खेळणारी स्नेहा, प्राची व दिप्ती नावाच्या असंख्य मुली, एकाच रिक्षेतली माझ्यासारखेच कुरळे केस असणारी पुजा, देविका, सायली दिप्ती या जिवाभावाच्या मैत्रिणी, चब्बी गालांची स्वाती, एक(की दोन) ट्विन्सही होत्या नाव विसरले.. .. कितीतरी.. [ अजुनही मला अभिनवचे क्लासमेट्स दिसले की वाटतं मला ओळखत तरी असतील का ते? पण ओळखतात हे ऐकून अजुन मजा वाटते!] हा फोटो पाहून हे सगळे आठवले.. अवघडे ब्वॉ..
अभिनवचे दिवस फार सही होते. आमच्या कॉलनीतले सगळेच अभिनवला जायचे. त्यामुळे धमाल होती. सकाळी सगळे एकाच फाटक बाईंकडे इंग्लिशच्या क्लासला जायचो. मी,ओंकार,किशोर,बॅडमिंटन चॅम्प विशाखा , माझी बर्थ डेट शेअर करणरा सुरजित, आणि गरवारेची सावनी.. सकाळचा क्लास झाला की घरी येऊन जेवून दुपारी १२ ला शाळेला निघायचे. मी ओंकार किशोर चालत जायचो. ते दोघं अगदी जिवश्च कंठश्च मित्र. कदाचित मला मधेच आईने त्यांच्या बरोबर पाठवण्याने वैतागलेही असतील! पण २-३ वर्षं गेलो एकत्र आम्ही. रस्त्याने गप्पा मारत, उड्या मारत शाळेला जायचे. थोडं मोठं झाल्यावर तर मला आठवतंय
शाळेपाशी आल्यावर आम्ही रस्ते वेगळे करायचो. बाकीची मुलं हसू नयेत म्हणून.. लोल काहीही वागायचो तेव्हा! ..
नंतर शाळा बदलली. व गरवारेला आले. इथे कॉलनीतलीच ती सावनी मैत्रिण झाली. दोघी सायकलवरून जाऊ-येऊ लागलो. शाळेच्या आधी संस्कृतचा क्लास. सावनीला संस्कृतचा तिरस्कार म्हणता येईल इतपत राग. मला आवडायचे पण टाईमपास जास्त प्रिय! मी रितसर क्लासची फी भरून वगैरे तो बुडवून तिच्या घरी टाईमपास करत बसायचे. :O नंतर अर्थातच समजले आईला. जबरी ओरडा बसला. व एकदाची जाऊ लागले रेग्युलर. [ आणि अर्थातच संस्कृत अजुन आवडू लागले! ती सुभाषितांची वही आत्ता इंडीया ट्रिपला मुद्दाम शोधून घेऊन आले.. ]
नववीच्या दरम्यान माझ्या शालेय मैत्र जीवनात एक पोकळी आली. सावनीला दुसरी मैत्रिण सापडली. व मी एकटी. केवळ एकच मैत्रीण जीवाभावाची करण्याची सवय महागात पडते हे तेव्हा समजायला हवे होते. पण समजले तर काय ना! चुका कशा होणार! प्रचंड एकटी पडले होते मी. [यात सावनीचा दोष अर्थात नाही. तो माझाच. ] पण मग नववी हे वर्ष फार विचित्र गेले. थोड्या काइंड ऑफ टवाळ बॅक-बेंचर्स मुलींशी मैत्री करून मी अभ्यासाचे खोबरे केले. ते मला किती महागात पडले हे केवळ मलाच माहीत ! पण झाले खरे तसे. पण नशीबाने नववी संपता संपता मानसी मैत्रीण झाली [म्हणजे तीने स्वत:हून ओळख करून घेतली म्हणूनच. नाहीतर मी तेव्हढीच बुजरी तेव्हाही होते.. ] मानसी मैत्रिण झाली ती झालीच.. अजुनही आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत!
थोडा अभ्यास हळूहळू ट्रॅकवर येऊ लागला. व दहावीत अगदीच फजितवाडा होण्यापासून वाचले.
ही मानसी मला कशी भेटली बहुतेक मी मागे लिहीले होते. आमची मैत्री मायकेल जॅक्सनमुळे झाली! दोघींना (व बहुतेक आम्हा दोघींनाच) तो आवडायचा. व त्याच गाणी/कॅसेट्स/अल्बम्सची देवाण घेवाण करताना आमची मैत्री वाढली. केवळ जॅक्सन आवडतो या कारणामुळे तीनी मला भेटल्याच्या दुसर्याच दिवशी डेंजरस या अल्बमची ओरिजिनल कॅसेट आणून दिली होती! वॉव! हे म्हणजे सर्वात प्रेशस गोष्ट.. कशी काय माहीत नाही पण आमची मैत्री खूप टिकली. अजुनही.. किती वेगळ्या आहोत आम्ही. एकही विचार सारखे नाहीत म्हटले तरी चालेल! ती बरीच बंडखोर, खूपशी मॅच्युअर्ड, प्रॅक्टीकल तर मी बर्यापैकी कॉन्झर्व्हेटीव्ह, कंप्लिटली चाईल्डीश, इम्प्रॅक्टीकल व अती इमोशनल. धमाल होती.. रोज भांडायचो ! रोज ते मिटायचे. एकदा तर फालतू कारणावरून भांडल्यावर नंतर ती सॉरी म्हणायला आली -ते पण शाळेच्या ग्राऊंड समोरच्या प्लॅटफॉर्मवर आणि मी तीला माफ करायला तिला हसत हसत थोबाडीत मारली होती! शाळेतल्या सर्व मुला-मुलींसमोर.. अजुनही ती तो अपमान विसरली नसेल..
))
हे आजचे असंबद्ध लिखाण शेवटी मानसी पुराणावरच येऊन थांबतंय असं दिसतंय. पण विचार केला तर ते तसंच आहे. ती माझी खरी पहीली जिवाभावाची मैत्रीण. शाळा – मैत्रीणी म्हटलं की तीच आठवते मला काय करू मी!
मला वाईट वाटते की मी पहिलीपासून गरवारे मध्ये नव्हते किंवा ती अभिनव मध्ये नव्हती. शाळेतला काळ सही असतो. तो नेमका आम्हाला १-१.५ वर्षंच मिळाला.. पुढे १०वीला आम्ही एकाच क्लासात नाव टाकलं. सिरियस्ली अभ्यास कसा करयचा हे बरचसं तिच्यामुळे कळ्लं. नाहीतर अस्मादिक जरा ’लक’ या गोष्टीवरच अवलंबून. एकदा वाचायचे व सोडून द्यायचे. परिक्षेत आठवेल ते आठवेल! तिच्यामुळे थोडा सिरीयस्ली अभ्यास केला. वेल थोडाच! त्याउलट मीच तिला अभ्यास सोडून फोनवर गप्पा मारायची सवय लावली !
अव्याहत गप्पा – बाबांनी फार पेशंस दाखवला त्या काळात! दर महिन्याचे फोनचे बिल पाहून नुसती मान हलवायचे !! त्या आमच्या गप्पा नंतरही चालू राहील्या पुढे १०-१२ वर्षं!! व नंतर मी लग्न करून USAला आले. किती रडली ती.. ![]()
ओह गॉड.. इम्पॉसिबल आहे हे.. का अशी स्थित्यंतरं होतात माहीत नाही.. आत्ताच्या ट्रिपला मी २ महिने भारतात होते. पण आम्ही दोघी केवळ २ वेळाच भेटू शकलो.
दोघींची लग्न.. सासर.. जबाबदार्या.. uh.. या सगळ्या प्रकरणांमधून मैत्री तशीच ठेवणं किती अवघड आहे! अर्थात मैत्री राहतेच हो.. पण ते रेग्युलर बोलणं, गप्पा, बरोबर टवाळक्या करत फिरणे ! कसं शक्य होणार काय माहीत..
असूदे.. म्हातार्या झाल्यावर फिरू एफ्सी रोडवर.. त्यात काय एव्हढं!
| टिप्पण्या : |
आह.. साझ !
आह.. साझ !
Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! 
गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!
किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक! खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता.
- तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे.
- शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये.
- झाकीर हुसेनचे संगीत !!!!
- झाकीर हुसेन ऍक्टर म्हणून!
एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता.
व नंतर अगणित वेळा पाहिला.
कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व्यसनाने वाट लागलेली. लोकांकडे पैसे मागून मागून दारू पिणे इथपर्यंत व्यसन गेले. एका श्रोत्याने दारूसाठी भिक काय मागतोस म्हटल्यावर त्याने चिंब पावसात दारूच्याच नशेत पण त्वेषात म्हटलेले ”बादल घुमड बढ आये’ हे सुरेश वाडकरांच्या आवाजातले मेघमल्हारातले गाणे. अक्षरश: काटे येतात ते पाहताना. (मी ९८ साली हार्डली १५-१६ वर्षांची असेन. संगीतातले काहीही न कळता इतकं कळलं .. संगीत अफाट आहे या पिक्चरचे.) हातासारशी गाणे ऐकाच!
मुली लहान असताना मोठीने दिदिगिरी करून पुढे पुढे केल्याचे प्रसंग आहेतच. पण मोठं झाल्यावर सुद्धा मान्सी बन्सीचे घाईघाईने लग्न लावून देते. तिला गाणं म्हणू देत नाही तसं बन्सीबरोबरच आपल्यालाही संताप येतो. बन्सी शेवटी लग्न मोडून गाण्यात करिअर करायला येते. आणि सुरू होते दोघींची स्पर्धा. रायव्हल्री. मान्सीचा इतका राग येतो ना. (अरूणा इराणी फार्र फिट्ट आहे या रोल मध्ये. अजुनही तिचा चेहरा आठवून राग येतोय मला. मस्त काम!)
शेवटी ती वेळ येतेच. जेव्हा बन्सीला मिळालेले गाणं मान्सी चोरते. (म्हणजे तिच्याऐवजी गाते) . [ असं म्हणतात ते प्रत्यक्षातले गाणं म्हणजे : ए मेरे वतन के लोगो.] तेव्हा मात्र बन्सीच्याही सहनशक्तीचा कडेलोट होतो. व एक नाते नाहीसे होते.
पुढे बन्सी संगीतकाराच्या प्रेमात पडते. [ हा आपला आर्डी असावा. ] या दोघांचे एक गाणे मला अतिशयच आवडते!! हेच ते क्या तुमने है केहे दिया.
पण इथे अजुन एक नात्यांची वीण येते. बन्सीची मुलगी कुहू(आयेशा धारकर) ही झाकीर हुसेनच्याच प्रेमात पडलेली असते. हे जेव्हा बन्सीला समजते तेव्हा ती स्वत:हून ब्रेक अप करते नाते. परंतू हा धक्का सहन न होऊन झाकीर हुसेनचा अपघात होतो. (की आत्महत्या. आठवत नाही. ) या धक्क्यातून बन्सी गाणं सोडते.
पुढे बरेच वळणं आहेत. मला नीट्शी आठवत नाहीत. पिक्चरची सीडी पण दिसली नव्हती कुठे. टॉरंट्सवर सुद्धा नाही! ![]()
मला काही फार कळत नाही. किंवा मी पिक्चर पाहीला तेव्हा तर काहीच कळत नव्हतं. पण असा काही सुंदर घेतलाय ना हा पिक्चर. साधा सुधा, पण तितकाच वेगळा. मला अजुनही शबानाचे सर्व कपडे देखील आठवतात.
जाऊदे.. सद्ध्या तरी ही काही गाणी ऐका अजुन.
हे श्रेय घोषालच्या आवाजतले सापडले आहे. पण देवकी पंडीतचे अर्थात सुंदर आहे!
असे हे साझ पुराण. काय बोलू अजुन. मी फार खुष आहे आज ! नुसती हीच गाणी वाजणार आता. याहू !!!!!!
अपडेट : बिगफ़्लिक्स वर आहे हा मुव्ही !! धान्ताडान.. http://broadband.bigflix.com/home/Movie/1357/Saaz
| टिप्पण्या : |
