books

टिना फे चे बॉसीपँट्स वाचून झाले. अशक्य करमणूक आहे. मी खूप दिवसांनी पुस्तक वाचताना मोठ्यांदा हसले.
पण तरी साधारण पाऊण पुस्तक झाल्यावर किंचित बोर झाले. बहुतेक पुस्तकाचा फॉर्मॅट तसा आहे. फार काही नीट चरित्रासारखा लहानपण म्ग नोकरी असा ग्राफ नाहीये. नक्की नाही माहित पण नंतर जरा अनॉय्ड झाले की काय पॉईंट आहे नक्की..
पण ते सोडल्यास प्युअर धमाल! मी फारसा टीव्ही पाहात नसल्याने मला टिना फे केवळ नावानेच माहित होती. आणि ओझरते ऐकले होते की तिने सेरा पेलिनची नक्कल असलेले स्किट केले होते वगैरे. ते सर्व भाग वाचायला, रायटर लोकांचं रूटीन कसं असतं, सॅटर्डे नाईट लाइव्ह, ३० रॉक वगैरे शोजबद्दल माहिती/गॉसिप असे वाचायला छान वाटले.
मी आता ३० रॉक बघायला सुरवात केली आहे. biggrin
दुसरे चिंगुले पुस्तक संपवले ते म्हणजे 'माय साईनफिल्ड यिअर' बाय फ्रेड स्टोलर. पुस्तकाची सुरवात अशी आहे की कोण हा फ्रेड स्टोलर. तर तो असा माणूस आहे की तुम्ही त्याला नावाने ओळखायचा नाहीत पण फोटो पाहिला तर चेहरा खूप ओळखीचा वाटेल पण तरीही तो कोण हे नक्की सांगता येणार नाही! हे वर्णन वाचून माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला आणि गुगल केले तर तो बरोबर निघाला! मी अन नवरा एलए मध्ये असताना ' बुद्धाज बेली' नावाच्या थाई रेस्टॉरंटला गेलो होतो तेव्हा हा बाबा शेजारच्या टेबलावर होता! आम्ही इतकं डोकं चालवलं त्याच्या शेजारी बसून, कि ह्याला कुठे पाहिलंय! कशात होता! पण नाहीच. मग नंतर कधीतरी कुठे फ्रेंड्स पाहताना त्यातला वेटर, साईनफेल्ड पाहताना तो डिप्रेस्ड पीट का फ्रेड वगैरे सापडले.
एनीवे.. तर पुस्तक वाचायला घेतले अन मी टोटली अवाक झाले. इतकं एकाच वेळेला सेल्फ लोदिंग डिप्रेस्ड अन अ‍ॅब्सोल्युट विटी फनी लिहीले आहे. की खरंच हसावं का रडावं कळत नाही. पण मोस्टली हसूच येते. फार वेगळा फॉर्म आहे हा! हे फार मोठं पुस्तक नाहीये. किंडल सिंगल म्हणतात तसे पुस्तिका टाईप आहे. त्यामुळे फ्रेड स्टोलरचे सगळं आयुष्य वगैरे नाहीये यात. हा फ्रेड स्टोलर जरी गेस्ट अ‍ॅपिअरन्सेस करत असला तरी तो साईफेल्डचा लेखक होता एक सीझन. आणि इतका मोठा ब्रेक मिळूनही कसं तो आहे तिथेच राहिला कायम असं पुस्तक आहे. हे खरं तर एखाद्याच्या वैगुण्यावर हसण्यासारखे आहे, पण कमालीचे एन्टरटेनिंग पुस्तक आहे. (ह्याला कारणीभूत कदाचित माझे साईनफेल्ड प्रेमही असेल..)
मजा आली मला दोन्ही शोबिझमधली पुस्तकं वाचायला. फार फार वर्षात मी इतकी लाईट पुस्तकं वाचली नव्हती!! इट वॉज नीडेड! आता स्टोरीड लाईफ ऑफ ए जे फिक्री अशा नावाचे पुस्तक मिळालेय. ते वाचून बघणार आहे. मी अमेझॉ प्राईमच्या प्रेमात आहे. त्यांनी हे प्राईम रिडींग सुरू केलंय तेव्हापासून फुकटात बरीच पुस्तकं वाचता येतायत..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives