Coming clean - Kimberly Rae Miller
मी फार महिने हे पुस्तक वाचत होते. एकावेळेस जास्त वाचू शकत नव्हते म्हणून इतका वेळ लागला. कमिंग क्लीन बाय किंबर्ली रे मिलर. होर्डर आईबाबांची मुलगी. अत्यंत हॉरीबल बालपण गेले हिचे. होर्डींगची कदाचित सगळ्यात वाईट स्टेज असेल हिचे पालक म्हणजे. ह्या पुस्तकातली वर्णनं अंगावर येतात. (नुसत्याच साठलेल्या वस्तूच नव्हेत, पण कुजलेले अन्नपदार्थ, फ्लीज, बग्ज, प्लंबिंग चालत नसल्याने बाथरूम्स नॉन फंक्शनल, ह्या सर्व परिस्थितीमुळे येणारे हाऊस अरेस्ट फिलिंग, केऑस फिलिंग - कॅन्ट हॅव एनिबडी ओवर सिंड्रोम. आणि व्हॉट नॉट!) पण ती मुलगी ते अॅक्चुअली अनुभवत होती ह्या विचाराने अत्यंत वाईट वाटत होते. फार मुश्किलीने वाचले हे पुस्तक. पण मला उत्सुकता होती की तिचे आई बाबा सुधारतात का किंवा ती मुलगी हे सर्व कसं कोप करते इत्यादी. खूप एगेजिंग आहे पुस्तक, पण फार त्रास होतो वाचायला. किंबर्ली मोठी झाल्यावर, स्वतंत्र राहू लागल्यावरचे भाग फार नीटच तिची ओढाताण दाखवतात. चांगले आहे पुस्तक. अनमॅनेज्ड मेंटल डीसॉर्डर्स किती थराला जाऊ शकतात हे वाचून थरकाप झाला.
मी आयुष्यात परत स्वतःला होर्डर म्हणून घेणार नाही. मला तशी फार सवय होती. पण ते खरोखर ट्रिविअलाईज करणे आहे. नो वन कॅन इमॅजिन व्हॉट गोज इ द माईंड ऑफ अ होर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सन. पण पुस्तकाचा शेवट काईंड ऑफ गोड नोटवर आहे. हे त्यातल्या त्यात बरे.
टिप्पण्या