मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे. आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा. माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस(   ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे! माय गॉड!   मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी ...

Into the wild (चित्रपट)

Into the wild खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव. रूतून बसले होते अगदी. इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात. नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्‍याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही. एक दुपार सापडली. सापडली म्हणजे शोधत नव्हतेच तिला. त्या दुपारच्या निवांत वेळेने मला गाठले. अन कोणत्यातरी अनामिक ओढीने मी इनटू द वाईल्ड सुरू केला. लॉर्ड बायरनचे शब्द स्क्रीनवर आले, अन अक्षरशः पॉझ करून बसले एक मिनिट. परत एकदा वाचले नीट, मोठ्यांदा उच्चारले ते शब्द.. There is a pleasure in the pathless woods, There is a rapture on the lonely shore, There is society, where none intrudes, By the deep sea, and music in its roar: I love not man the less, but Nature more. आणि सुरू झाला प्रवास, I...

काय बोलत असतील ती दोघं?

आज बाहेरची कामं आटोपून घरी येताना सिग्नलला थांबले होते. सहज बसस्टॉपकडे नजर गेली तर एक वेगळंच दृश्य दिसले. इकडे लॉस एंजिलीसमध्ये बसस्टॉपपाशी खूप होमलेस लोकं दिसतात. (आय मिन एकाच स्टॉपपाशी खूप लोकं नव्हे. जनरल पूर्वीच्या गावापेक्षा इकडे होमलेस जास्त दिसतात. एखाद्या स्टॉपवर, डिव्हायडरवर एखाद-दुसराच माणूस असतो..) जवळच एखादी बेवारशी शॉपिंग कार्ट, त्यात अठरापगड गोष्टी असतात. कोणीतरी एखादे गरम जॅकेट वा कम्फर्टर दिले असते ते घेऊन तो माणूस बसलेला असतो.. क्वचित स्त्रियाही असतात. इथे एक वेगळंच आहे. आपण भारतात असताना सरसकट रस्त्यावरच्या लोकांना भिकारी म्हणतो. इथे तसे होत नाही. इथे होमलेस म्हणतात. होमलेस लोकं पुअर, जॉबलेसही असू शकतात पण क्वचित कधी त्यांना व्यवस्थित नोकर्‍याही असू शकतात. राहायला मात्र जागा नसते. माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या जवळच्या बसस्टॉपपाशी राहणारा माणूस मी जाते त्याच ग्रोसरी स्टोअरमध्ये शॉपिंग करतो. आय मिन एखादेच काहीतरी कॅन्ड फुड वगैरे. पण तोही दिसतो मला तिथे.. एनीवे.. तर हा होमलेस माणूस, जुनेच पण एकंदरीत परिस्थितीशी फटकून असलेले सोनेरी बटणांचे क्वॉड्राय जॅकेट घालून, ड...

व्हर्चुअल की रिअल?

भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प्रतिमा तयार होते व प्रत्यक्ष भेटल्यावर काही फरक जाणवतो का? दोन्ही पद्धतींमधील तुम्हाला कोणती पद्धत जास्त भावते? माझ्याबाबतीत विचाराल तर मी व्हर्चुअल जगात जास्त मोकळेपणे वावरते. प्रत्यक्षात मला सोशल अँझायटी असावी इतपत मी शांत असते. हे माझ्या बाबांना बर्‍यापैकी डाचत आले आहे. पूर्वी मलाही असं वाटून जायचे की आपलं सगळंच ऑनलाईन असते.  एनीवे.. माझ्या आईबाबांच्या घरी झालेल्या मैफिलीत हा विषय निघाला चहाच्या वेळेस. कोणी कोणी बिनसाखरेचा चहा प्रिफर करतं, कोणी नव्याने घेत होते. पण मी मात्र बिनसाखरेचा घेणे शक्यच नव्हते! मी का अजून कोणीतरी बोलून गेले.. "हो! त्या अमुकला पण २ चमचे साखर लागते ना चहात!?"  दॅट वॉज द युरेका मोमेंट! तिथल्या मुलींपैकी  कोणीच भेटले नव्हते तिला .  पण आम्हा सर्वांना तिचा चहा कसा असतो हे माहित. मैत्र...

माझे रंगकाम -९

Quirky by Angie Grace. Medium - basic, metallic and glitter gel pens.

माझे रंगकाम - ८

माझे रंगकाम - ७

हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले. ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. ) It took forever! The detailing in this picture as well as choosing 50 shades of Green was a daunting task. I know it could have been better. My so called attempt of showing blue and purple tint to the picture is almost a failure. But anyway.. I'm just glad it's over! It took 5 days..