खेळ आणि मी
लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा.

माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस(
ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे! माय गॉड!
मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी हा आमचा ग्रुप). गजूचिंटू हे जुळे जे माझ्याहून २ वर्षांनी मोठे होते. आदित्य व स्नेहल १,१ वर्षांनी. शिकले इतर खेळ हळूहळू.
पकडापकडीचे प्रमोशन होऊन लंगडी खेळली जाऊ लागली. तर कधी लपाछपी, विषामृत, शिरापुरी(?) जा पुढच्या घरी, दगड का माती, लोखंडपाणी, अगदीच गेलाबाजार दोरीच्या उड्या असे अफाट गेम्स आम्ही खेळायचो.. टिपी टिपी टीप टॉप, व्हिच कलर डु यु वाँट? हा ही एक खेळ आठवतोय. लपाछपी अन डबाऐसपैसला गजू-चिंटू हे ट्विन्स कायम चकवायचे आम्हाला. लपल्यावर सरळ शर्टची अदलाबदल करायचे की ओळखणारा हमखास चुकणारच! शिवाय ती दोघं अफाट दंगेखोर्/धाडसी असल्याने त्यांच्या लपायच्या जागादेखील कैच्याकैच! चिंटू एकदा मागच्या अंगणातल्या झाडाच्या अगदी शेंड्यावर जाऊन लपला होता. किती वेळ शोधत होतो आम्ही त्याला? सापडला नाहीच, पण तिथेखूप वेळ बसून बॅलन्सिंग करताना पडला तो थेट तारेच्या कुंपणावर. तळपाय अगदी चिरलाच गेला असेल. त्या दोघांसाठी रक्त ही फार मामुली गोष्ट असली तरी तो लंगडत, रक्त ठिबकत दुसर्या मजल्यावर जातोय हे दृश्य कितीतरी दिवस राहिले डोक्यात.
![biggrin biggrin](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/biggrin.gif)
![heehee heehee](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/heehee.gif)

खेळणे हा प्रकार अर्थातच सीझननुसार बदलायचा. हिवाळ्यात दिवस लहान त्यामुळे संध्याकाळी लवकरच खेळ संपवायला अगदी नक्को व्हायचे! पण सगळ्याच्यां आयांच्या हाका ऐकू यायच्याच. आमच्या आईच्या तर नक्कीच!![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
पावसाळ्यात तर वेगळीच मजा! तेव्हाच्या काळी भरपूर पाऊस पडायचा! वळवाचा पाऊस आला की त्यात भिजणे हा ही खेळच! क्वचित गारा पडल्या तर त्या वेचणे (अन मुख्य म्हणजे दुसर्याला मारणे).. डबक्यात फतॅक फतॅक उड्या मारणे.. होड्या सोडणे. ह्याचबरोबर, भरपूर पावसाने समोरचे व मागचेही अंगण जाऊन तिथे तलाव आले की आमची रवानगी व्हायची ती गच्चीवर! मग हेच खेळ पावसात गच्चीवर खेळायचे. पावसात फुटबॉल खेळणे ह्यासारखी दुसरी मजा नाही! ह्याशिवाय अजुन एक क्रुर खेळ आम्ही खेळायचो. गच्चीच्याही उंच असे एक झाड होते उजव्या हाताला. त्याची फळं म्हणजे मिनिस्कुल वाळलेला अननस म्हणता येईल. आम्ही त्याला बहुतेक चिमणीचे घड्याळ म्हणायचो. का कोणास ठाऊक! तर ती फळं/घड्याळं/मिनिस्कुल अननस पावसात रपारप मारायचो एकमेकांना! जबरा लागायचे जोरात. असाच अजुन एक खेळ. आप्पारप्पी. टेनिसचा बॉल घेऊन चिखलातून तो एकमेकांच्या अंगावर मारण्याचा खेळ! मला एकदा इतका जोरात कानावर बसला होता बॉल.. काजवेच चमकले होते. असले खेळ म्हणजे भरपूर भांडणं, भरपूर हसाहशी.. जोडीला पाऊस!![daydreaming daydreaming](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/daydreaming.gif)
![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
पावसाळ्यात तर वेगळीच मजा! तेव्हाच्या काळी भरपूर पाऊस पडायचा! वळवाचा पाऊस आला की त्यात भिजणे हा ही खेळच! क्वचित गारा पडल्या तर त्या वेचणे (अन मुख्य म्हणजे दुसर्याला मारणे).. डबक्यात फतॅक फतॅक उड्या मारणे.. होड्या सोडणे. ह्याचबरोबर, भरपूर पावसाने समोरचे व मागचेही अंगण जाऊन तिथे तलाव आले की आमची रवानगी व्हायची ती गच्चीवर! मग हेच खेळ पावसात गच्चीवर खेळायचे. पावसात फुटबॉल खेळणे ह्यासारखी दुसरी मजा नाही! ह्याशिवाय अजुन एक क्रुर खेळ आम्ही खेळायचो. गच्चीच्याही उंच असे एक झाड होते उजव्या हाताला. त्याची फळं म्हणजे मिनिस्कुल वाळलेला अननस म्हणता येईल. आम्ही त्याला बहुतेक चिमणीचे घड्याळ म्हणायचो. का कोणास ठाऊक! तर ती फळं/घड्याळं/मिनिस्कुल अननस पावसात रपारप मारायचो एकमेकांना! जबरा लागायचे जोरात. असाच अजुन एक खेळ. आप्पारप्पी. टेनिसचा बॉल घेऊन चिखलातून तो एकमेकांच्या अंगावर मारण्याचा खेळ! मला एकदा इतका जोरात कानावर बसला होता बॉल.. काजवेच चमकले होते. असले खेळ म्हणजे भरपूर भांडणं, भरपूर हसाहशी.. जोडीला पाऊस!
![daydreaming daydreaming](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/daydreaming.gif)
सगळ्यात धमाल यायची ती अर्थातच उन्हाळ्याच्या सुट्टीत! ![party party](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/party.gif)
मी ४थीत असताना आम्ही लक्षद्वीपला गेलो होतो. अफाट सुंदर जागा! आतासारखे कसलेही कमर्शिअलायझेशन नाही. निरव शांतता, सुंदर निसर्ग.. निळंशार पाणी! पण सगळे लांबूनच पाहायचे! कारण मला पोहोताच येत नव्हते! मग आमच्या ग्रुपमधील एका आजोबांनी मला पोहायला शिकवायचे ठरवले. फ्लोटींग वगैरे कसे शिकवले मला आठवतही नाही! पण त्यांनी शिकवला बॅकस्ट्रोक. पाठीवर पडून नुसते हात पाय मारायला काय लागतेय? नजरेच्या टप्प्यात कोठेतरी एका टोकावर आजोबा आहेत हे कळत होते. पण अॅपरंटली ते मागे मागे चालत जात होते, व मी फायनली जेव्हा त्यांच्यापाशी पोहोचले तेव्हा, किनार्यावरची माझी आई दिसेनाशी झाली होती!!
भिती वाटण्याऐवजी आपण इतकं पोहू शकलो ह्याचे मला इतके अप्रुप वाटले होते तेव्हा. इतकी एक्साईटमेंट! परत पोहत जाऊन कधी एकदा आईला सांगते असं झाले होते. त्या ट्रीपमध्ये मी भरपूरच सराव केला पोहोण्याचा!
![party party](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/party.gif)
मी ४थीत असताना आम्ही लक्षद्वीपला गेलो होतो. अफाट सुंदर जागा! आतासारखे कसलेही कमर्शिअलायझेशन नाही. निरव शांतता, सुंदर निसर्ग.. निळंशार पाणी! पण सगळे लांबूनच पाहायचे! कारण मला पोहोताच येत नव्हते! मग आमच्या ग्रुपमधील एका आजोबांनी मला पोहायला शिकवायचे ठरवले. फ्लोटींग वगैरे कसे शिकवले मला आठवतही नाही! पण त्यांनी शिकवला बॅकस्ट्रोक. पाठीवर पडून नुसते हात पाय मारायला काय लागतेय? नजरेच्या टप्प्यात कोठेतरी एका टोकावर आजोबा आहेत हे कळत होते. पण अॅपरंटली ते मागे मागे चालत जात होते, व मी फायनली जेव्हा त्यांच्यापाशी पोहोचले तेव्हा, किनार्यावरची माझी आई दिसेनाशी झाली होती!!
![surprise surprise](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/surprise.gif)
तर सांगायचा मुद्दा हा, की त्या ४थी नंतरच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला जाणे हा माझा कार्यक्रम होऊन बसला! भल्या पहाटे ६:३० ला उठून ७च्या बॅचला चॉइस हेल्थ क्लबला जायचे. बाबा किनार्यावर बसायचे अन मी दणकून पोहायचे तासभर. ८ला घरी परत आले की आमचा पत्ता: हॉलची गॅलरी, झोपाळा, हातात ठकठक्,चंपक इत्यादी. ब्रेड ऑम्लेट्चा नाश्ता व वरतून बाबांनी सकाळीच करून ठेवलेला, फ्रीजमधे असलेला गारेगार मँगो मिल्क्शेक! प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीतला दिवस माझा असा उगवायचा! कितीतरी सुट्ट्या मी पोहायला जायचे. खूपच प्राविण्य मिळवले होते. पण आमचे सर आईबाबांना म्हणाले ही चांगली पोहतीय कुठ्ल्यातरी लेव्हलच्या शर्यतीत नाव घालू तेव्हापासून माझ्ह्या पोहण्यातला रस संपला.
तेव्हा संपला असेल, पण आताही मला पोहायला फार आवडते असे लक्षात आले आहे.
एनीवे, पोहून आल्यावर मग थोड्या वेळ दोस्तमंडंळींबरोबर बाहेर खेळून आले, की जेवण झाल्यावर मात्र संध्याकाळपर्यंत बाहेर खेळायला बंदी. मग आमची उचलबांगडी व्हायची कोणाच्या तरी घरी कॅरम खेळायला. किंवा मागच्या अंगणात असलेल्या डेरेदार झाडाच्या सावलीत पत्ते खेळायला. रमी, भिकारसावकार, बदाम सात, ३०४, ५-३-२, चॅलेंज, नॉटॅठोम(
) इत्यादी खेळ खेळत आरामार दुपारचे २-३ तास निघून जायचे. ह्याचाही कंटाळा आला तर कधी मोनोपॉली, व्यापार.. यंग आर्किटेक्ट, किंवा इतर काही (कोणानाकोणाच्या नातेवाईकांनी आणलेले) इम्पोर्टेड बॅटरीवर वगैरे चालणारे गेम्स, किंवा रेसिंग ट्रॅक... फारच कंटाळा आला अस्लयास कानगोष्टी वगैरे टाईपही खेळ खेळायचो, इतर बिल्डिंगमधील मुलांबरोबर. जितकी जास्त मुलं तितकं शेवटचे वाक्य मजेदार!
दुपारचा वेळ संपला की कसंबसं संध्याकाळचे दूध प्यायला व स्नॅक्स खायला घरी गेलो की परत संध्याकाळी खेळायला टीम हजर अंगणात. ![biggrin biggrin](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/biggrin.gif)
![sad sad](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/sad.gif)
एनीवे, पोहून आल्यावर मग थोड्या वेळ दोस्तमंडंळींबरोबर बाहेर खेळून आले, की जेवण झाल्यावर मात्र संध्याकाळपर्यंत बाहेर खेळायला बंदी. मग आमची उचलबांगडी व्हायची कोणाच्या तरी घरी कॅरम खेळायला. किंवा मागच्या अंगणात असलेल्या डेरेदार झाडाच्या सावलीत पत्ते खेळायला. रमी, भिकारसावकार, बदाम सात, ३०४, ५-३-२, चॅलेंज, नॉटॅठोम(
![rofl rofl](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/rofl.gif)
![heehee heehee](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/heehee.gif)
![biggrin biggrin](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/biggrin.gif)
मोठे होऊ लागलो तसे बाकीचे खेळ बंद पडत गेले. विषामृत वगैरे काय खेळायचे. ते तर लहान्मुलांचे गेम्स. आम्ही प्रचंड प्रमाणात बॅडमिंटन खेळलो. त्यानंतर फुटबॉल व क्रिकेट. मला जास्त रस बॅडमिंटनमध्येच असायचा. कितीतरी तास खेळायचो आम्ही बॅडमिंटन. तशी आमची कॉलनी बॅडमिंटनप्रेमात चायनाशी बरोबरी करेल!
प्रत्येक सोसायटीतून मुलं बॅडी खेळत असायचे. त्या त्या सोसायटीचा एक भार्री प्लेयर असे. त्याच्याशी खेळताना ईर्ष्या की काय जोरात असे!
![heehee heehee](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/heehee.gif)
वर्षभर बरेचसे खेळ हे आपले आपले बिल्डिंगमधील मित्रमैत्रिणींबरोबरच खेळायचो. वर्षातून एकदा मात्र आख्खी कॉलनी एकत्र खेळायची. ते म्हणाजे गणेशोत्सवातील खेळ! आमच्या कॉलनीचा गणेशोत्सव हाच मुळी एक नॉस्टॅल्जिक प्रकार आहे. पण ५ दिवस गणपती बसायचे त्यातील एक दुपार मैदानी खेळांसठी असायची. त्यात अगदी चमचालिंबू, उलटे चालणे, तीन पायांची शर्यत पासून पत्ते, कॅरम्,बुद्धीबळच्या मॅचेस तसेच क्रिकेट व बॅडमिंटनच्याही मॅचेस व्हायच्या! पूर्ण कॉलनीतील मुलंच नव्हे तर मोठेही ह्यात भाग घ्यायचे. मी देखील. कॅरम वगळता, मी फायनल जिंकले आहे हे प्रसंग कमी आहेत. पण प्रत्येक वर्षी, प्रत्येक खेळात सहभाग मात्र असायचाच!!
बॅडमिंटनचा जरा विशेष उल्लेख करावा लागेल. मी वर म्हटले तसे बॅडमिंटन खेळण्यात आख्खी कॉलनीच पुढे होती आमची! कॉलनीच्या शेजारच्या गल्लीत एक कोर्ट होते, ते केवळ आमच्यामुळेच चालले असावे. एक ग्रुप माझ्या बाबांच्या वयाचा, एक गृप आईच्या वयाचा, एक ग्रुप दादाच्या वयाचा तर एक गृप माझा. कित्येक रवीवार आम्ही चौघही सकाळी बॅडमिंटन खेळायला बाहेर पडायचो! मला ते दिवस अत्यंत आवडतात!
पुढे आईचे बॅडमिंटन बंद झाले व दादा कॉलेजात वगैरे बिझी झाला. बाबांचा तेव्हाचा बॅडमिंटनचा गृप अजुनही दर रवीवारी भेटतात. आता गेल्या ५-१० वर्षात एक एक करत सगळ्यांनी गुढघेदुखीच्या कारणाने बॅडमिंटन खेळणे बंद केले,तरी त्यांचा ग्रुप आता ब्रेकफास्टला का होईना अजुनही भेटतातच. व त्याला नावही बॅडमिंटन ग्रुप असेच आहे! ![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
मी ४-५वीपासून बॅडमिंटनच्या क्लासला जाऊ लागले. तसं येत सगळंच होते, पण नुसते कोर्ट घेण्यापेक्षा एखाद्या क्लासात नाव नोंदवले की सोपे जायचे. सुरवातीला जरा लिंबूटिंबूच क्लास होता, म्हणजे जमून थोडासा वॉर्मअप मग मॅचेस खेळायच्या. पण नंतर पीवायसी जिमखान्यात जाऊ लागले. तेव्हा म्हणजे शनीवार रवीवार पडीक असायचे तिथे. गेल्यावर वॉर्मअपचे व्यायाम, मग जिमखान्याच्या मैदानाला ४-५ राउंड्स. एव्हढं झाल्यावर मग अॅक्चुअल बॅडमिंटनची रॅकेट हातात यायची. या काळात माझा खेळ अफाट सुधारला होता. मी हरायचेच नाही. इतर कोणी चांगले खेळले तर त्याला/तिला माझ्याबरोबर मॅच खेळायला मिळायची. पीवायसीला एकच वुडन कोर्ट होते तेव्हा. तिथेही सहसा खेळायला मिळायचे नाही. पण मला मिळाले. फार अफलातून काळ होता हा. इतकं जग्गात-भारी फिलिंग तसे मला कमीच वेळेला मिळाले आहे.![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
मी ४-५वीपासून बॅडमिंटनच्या क्लासला जाऊ लागले. तसं येत सगळंच होते, पण नुसते कोर्ट घेण्यापेक्षा एखाद्या क्लासात नाव नोंदवले की सोपे जायचे. सुरवातीला जरा लिंबूटिंबूच क्लास होता, म्हणजे जमून थोडासा वॉर्मअप मग मॅचेस खेळायच्या. पण नंतर पीवायसी जिमखान्यात जाऊ लागले. तेव्हा म्हणजे शनीवार रवीवार पडीक असायचे तिथे. गेल्यावर वॉर्मअपचे व्यायाम, मग जिमखान्याच्या मैदानाला ४-५ राउंड्स. एव्हढं झाल्यावर मग अॅक्चुअल बॅडमिंटनची रॅकेट हातात यायची. या काळात माझा खेळ अफाट सुधारला होता. मी हरायचेच नाही. इतर कोणी चांगले खेळले तर त्याला/तिला माझ्याबरोबर मॅच खेळायला मिळायची. पीवायसीला एकच वुडन कोर्ट होते तेव्हा. तिथेही सहसा खेळायला मिळायचे नाही. पण मला मिळाले. फार अफलातून काळ होता हा. इतकं जग्गात-भारी फिलिंग तसे मला कमीच वेळेला मिळाले आहे.
![smile smile](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/1.gif)
हे सगळं घरच्या फ्रंटवर होत असताना, शाळेत वगैरे मी फारशी पुढे नव्हते स्पोर्ट्सबाबतीत. कदाचित मला केवळ खेळाचा आनंद लुटायला आवडले. त्या शर्यती, आणि जिंकणे-हरणे हे कधीच आवडले नाही. विशेषतः हरणे. ![heehee heehee](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/heehee.gif)
नाही म्हणायला स्पोर्ट्सडेला भाग घ्यायचे मी. पळणे, उड्या मारणे, डॉजबॉल इत्यादी. पण ७वी पर्यंत कधीच विशेष चमक दाखवली नाही.
![heehee heehee](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/heehee.gif)
नाही म्हणायला स्पोर्ट्सडेला भाग घ्यायचे मी. पळणे, उड्या मारणे, डॉजबॉल इत्यादी. पण ७वी पर्यंत कधीच विशेष चमक दाखवली नाही.
७वीत मात्र धमालच झाली! मी जस्ट शाळा बदलून आले होते. (अभिनवमधून गरवारेमध्ये). फारसे कोणी ओळखत नव्हते मला. कुठून तरी व्हॉलीबॉल की थ्रोबॉलची टीम बनवायचे ठरले व कसे काय कोण जाणे माझे नाव गेले त्यात. बहुधा मी उंच होते वयाच्या मानाने. नेमाने प्रॅक्टीस सुरू झाली. मला तो खेळ आवडू लागला. खूपच मजा येऊ लागली. माझी विशेषत: सर्व्हीस फार सुंदर होत होती. रप्पाकन बॉल जायचा, तो समोरचा पकडूच शकायचा नाही. प्रॅक्टीस झाली.. त्यावर्षीचा स्पोर्ट्सडे आला. आणि आमची टिम, आमचा वर्ग जिंकत गेला. आणि आम्ही चक्क फायनलला पोचलो! आमच्या विरूद्ध टीममध्ये एक शाळेतील सर्वात अॅथलिट, कराटे चॅम्पियन वगैरे मुलगी होती. आणि चक्क मी तिला फाईट दिली!
माझ्या सर्व्हिसेस कोणाला कॅच करता येईनात. आख्खा वर्ग माझ्या नावाने ओरडत आहे, चीअर अप करत आहे. चुकून चूक झाली तर 'होतं असं कधी कधी चुकून चुकून' वगैरे गात आहे. हे सगळं भयंकरच नवीन होते मला. अॅड्रेनलिन रश म्हणजे काय विचारले तर मी ही मॅच सांगेन. आम्ही ती मॅच हरलोच. पण प्रचंड फाईट देऊन हरलो. हे असं पूर्वी कधीच झाले नव्हते. तो समोरचा वर्ग, दुसरी टीम कायम विनासायास जिंकत आली होती ती आज जिंकण्यासाठी तडफडत होती. त्यावर्षी प्रथमच सातवीमध्ये आमच्या वर्गाला रनर अपचे का होईना पण बक्षिस मिळाले. ते स्विकारताना जे वाटले ते सांगणे शब्दातीत आहे. ![daydreaming daydreaming](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/daydreaming.gif)
![surprise surprise](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/surprise.gif)
![daydreaming daydreaming](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/daydreaming.gif)
कदाचित, माझ्या इतर बर्याच बाबतीत होते तसेच इथेही झाले. एकदा एखाद्या बाबतीत जरा प्राविण्य मिळवले आहे म्हटले की मी ती गोष्ट करणेच बंद करून टाकते. ७वीतल्या त्या मॅचनंतर मी फारसा कधी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला नाही. अधूनमधून बॅडमिंटन चालूच राहिले, पण इंजिनिअरिंगनंतर तेही बंद झाले. अलिकडेच मी अन नवर्याने इंडीयावारीतून बॅडमिंटनच्या रॅकेट्स व शटल्स आणून ठेवली आहेत. नवरा पण चॅम्पियन. त्यामुळे अधूनमधून खेळतो आम्ही. पण लहानपणची मजा और असते.
Well, तेव्हा खेळताना मजा आलीच, पण आत्ताही त्याबद्दल लिहीण्याच्या निमित्ताने आठवणींच्या प्रदेशात सैर करून आले! गतकाळाच्या ह्या आठवणी माझ्यासाठी आता विशेष महत्वाच्या आहेत. कारण गेल्यावर्षात आमची बिल्डींग पाडून रिडेव्हलपमेंट सुरू झाले. त्यात मागचे पुढचे अंगण तर गेलेच आहे, ह्या आठवणीही पुसून जायची शक्यता आहे. सृजनाच्या वाटाच्या निमित्ताने ह्या सर्व खेळांच्या फार सुंदर आठवणी मनात आल्या.. Feeling awesome.. feeling recharged!! ![party party](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/party.gif)
![party party](https://www.maitrin.com/sites/all/modules/smiley/packs/Roving/party.gif)
टिप्पण्या