मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

॥ श्री ॥

पहिले पोस्ट..... !! www.marathiblogs.com वरचे ब्लॊग्स पाहून आपणही ब्लॊग लिहावा अशी बरेच दिवस मनात इच्छा होती, पण धाडस होत नव्हतं. :) सगळेच इतकं सुरेख लिहीतात की आपलॆ पोस्ट कोण वाचणार ही शंका.. तरीही काहीतरी लिहायची इच्छा झाली तर असु द्यावा म्हणून हा खटाटोप.. लवकरच इथे काही (पब्लीश करण्याजोगं) लिहीता येईल अशी आशा करते ! तोपर्यंत टाटा..

About Me?

ब्लॉग सुरू करून वर्ष उलटून गेले,तरी मला अजुन इथे काय लिहावं हे काही झेपत नाही.. ब्लॉगवर इतकी सारी बडबड करून देखील अजुन मला स्वतःबद्द्ल ४ ओळी लिहीता येत नाहीत.. माझ्यासाठी सर्वात कठीण काम.... थोडक्यात असं बघा.. हा माझा ब्लॉग, माझे विचार.. वाचून बघा.. विचार वाचून कळेलच मी कशी आहे/असेन ते.. काय?

Archives

श्री काय करतेस दिवसभर??" Rave Party & TOI.. चार्ली चॅप्लिन.. I knew I loved you, before I met you.. मागचा आठवडा.. पेन स्केच ( वैशाली ) hmm.. nostalgia.. नेनचिम! पेन स्केच ( बाप-लेक ) तारे जमिन पर! :) लायब्ररी !! आश्चर्याचा सुखद धक्का! ( लोकसत्ता मधे दखल!) माझी शेफगिरी(मांचुरिअन) कंटाळा बटर चिकन, बिर्याणी.. चिल्ड्रेन ऑफ हेवन ! पेंटींग ( वारली - मोर ) अपेक्षाभंग.. वळू काही फोटोज.. अविस्मरणीय.. आठवणी Women Of Tilonia.. The Goal..! भुकंप.! कंग पाओ टोफु... Feels like heaven..! आवडलेले काही - कवितांचा खोखो. एका इ-लग्नाची गोष्ट!! :) इडियॉक्रसी..! आली दिवाळी...! "स्वच्छतेच्या बैलाला..." च्या निमित्ताने.. एक उनाड पोस्ट... :D माझेही दोन पैसे.. सारेगमप डबा ऐसपैस माझी खाद्ययात्रा धमाल! द हॅपनिंग! माझी भटकंती - ओहाय (Ojai) माझ्या आयपॉडमधील खजिना! मी - एक करोडपती! :) आईची कवीता.. संक्रांत.. कॉलेजचे भन्नाट दिवस! दगडावर कोरलेले क्षण.. Zoo Zoo..! १,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !! Wish List.. मी टिपलेली काही फुले! रंगरंगिले छैलछबिले!! :) ...

Contact Me !