माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)
मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :)
४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले.
आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :)
४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच बरं वाटलं! त्यात तो भला मोठा लंच बफे! प्रचंड जेवलो.. डोशाबरोबर चिकन टिक्का मसाला काय भारी लागतो? अ-मे-झिं-ग!!
नंतर मग जेवण जिरवायला जरा आयकियामध्ये फिरून आलो! संध्याकाळी आईच्या हातचे बटाटेवडे! yumm !! खूपच धमाल आली. किती दिवसांनी असं रिलॅक्स्ड वाटत होते.
५ तारखेला नेहेमीची पटेल ब्रदर्सकडे चक्कर मारून आलो. अजुन ही लोकं लॉस एंजलिसमध्ये का येत नाहीत देव जाणे. आर्टेशियात आहे बहुधा दुकान. पण बे एरियाचे पटेल खरंच छान आहे. केप्रची भाजणी, मसाले, सकसची पीठं घेतली साठवणीची. आता ३-४ महिने तरी हे पुरवून पुरवून वापरायचे! :)
मग milpitasच्या great mall ला चक्कर. मस्त मनासारखी शॉपिंग केली व संध्याकाळी On The Borderमध्ये मायबोलीचा ग्रुप भेटला. भरपूर गप्पाटप्पा मारून आलो. मायबोलीची गटगं नेहमीच रिफ्रेश करून सोडतात! :)
६जुलैला सकाळी ८ ला घर सोडायचा प्लॅन होता. त्याचे ९ वाजले पण नॉट बॅड. भरपूर प्रवास (४-५ तास) करत एकदाचे योसेमिटीत आलो. आणि मग सुरू झाला स्वर्गीय प्रदेश. माझ्यामते आता मी बडबड बंद करावी, व फोटोंनाच बोलू द्यावे. प्रत्येकाला विनंती : जमल्यास नक्की जाऊन या ठिकाणी! you will thank me later! :)
टिप्पण्या