Wish List..

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत!
  1. कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे..
  2. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे.
  3. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे..
  4. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण!
  5. एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे..
  6. आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत! merajuk
  7. केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत.
  8. घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे!
  9. हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली!
  10. गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच..
  11. भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! ..
  12. बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे..
  13. जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे..
  14. साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे! xpasti
  15. इजिप्त,हवाई आणि बाली बेटं तसेच नॉर्दर्न लाईट्स किंवा aurora borealis इत्यादी ठिकाणं पाहायची आहेत..
  16. नॉर्दर्न लाईट्स वरून आठवले, मीना प्रभूंसारखा मनसोक्त जगभर प्रवास करायचाय! नाही, मी पुस्तकं नाही लिहीणार! sengihnampakgigi
  17. आत्ताच नाही, पण काही काळाने परत आणि भरपूर शिकायचे आहे! आणि पहील्या नंबरानेच पास व्हायचेय! sengihnampakgigi
  18. कुंभार काम करायचेय.. मातीची भांडी,कप्स,बोल्स इत्यादी इत्यादी!
  19. Paragliding, Parasailing, Snorkeling आणि Bungee Jumping.. (last one seems really difficult!)
  20. ..... अजुन खूप काही!

टिप्पण्या

Yawning Dog म्हणाले…
वा अतिशय निरागस विश लिस्ट आहे आपली. आपल्याला काय काय येत नाही ते असे जाहीर सांगायला खूप धाडस लागते.
इच्छा क्रमाने लिहिल्या आहेत का? म्हणजे, क्रं ३, करण्याआधी १ व २ यायला पाहिजे नीट :)
सगळ्या विशेस पूर्ण होतील हळू हळू, लढ !
Bhagyashree म्हणाले…
जृंभणश्वान , आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार!
क्रमाने नक्कीच लिहील्या नाही आहेत! :)
लढतेच आहे! बघुया किती पूर्ण होतील!
केदार जठार म्हणाले…
I have a similar list.. I just call it a to-do list :)
Unknown म्हणाले…
yeah it can be called as to do list.. pan khara tar ya goshtinshivay maza kahi adat nahi.. so wish list.. zali tar mastach.. nahitar no problem.. :)
रोहिणी म्हणाले…
I share a similar wish list :) .... लेक झोपली असताना स्वयंपाकघरात भांडं न पाडता काम करणं सुद्धा :)
केदार जठार म्हणाले…
Ohh... I have a different philosophy... anything that I can do is on my todo list.. anything that require some luck is wish list...

eg. I wanna sing in front of all the people - todo list... they should appreciate - wish list :)

thanks for the post... I am going to revise my todo and wishlist again :)
Bhagyashree म्हणाले…
hehe kedar.. that's a nice way of thinking.. and i agree with what you have said! paTlach! ppl appreciating my song as well as me to sing a song needs great deal of luck!! :D

rohini, same pinch! :D
Deepak म्हणाले…
अरे वा! यातील ब-याच गोष्टी मलाही करायच्या आहेत.. तुमच्या लिस्टच्या खाली.. मी माझी लिस्ट देतोय.. :)
1. कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे..
> ह्म्म... बायकोला मदतीच्या नावाखाली मला ही हे शिकायलाच हवं!
2. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे.
> दिवसा ठीक आहे.. रात्री मात्र माझेही बारा बाजतात!
3. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे..
> मला हरिश्चंद्र "नळीच्या" वाटेने चढायचाय!
4. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण!
> त्यासाठी मला गाडी - चारचाकी घ्यावी लागेल!
5. एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे..
> बायकोचे रंग चोरुन कधी - कधी मीही असले उद्योग करतोच!
6. आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत!
> मी ब-याचदा प्रयत्न केला.. "पुरानी जीन्स - अली हैदर" पुर्ण पाठ केलं.. पण ब-याचदा बाथरुम मध्येच गायलो!
7. केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत.
> आ... मी ब-यापैकी चपाती - चहा - औम्लेट बनवतो!
8. घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे!
> होसेखातीर मी बरीच पुस्तकं गोळा कली.. छावा, महानायक, योगी कथामॄत, एक होता कार्व्हर, युगांत, मात्र फक्त "बलुतं" अन् "उपरा" वाचुन झालं :( सध्या तरी "ययाति" वाचतोय..
9. हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली!
> मी लिहिलयं.. बघा वाचुन, जमलंय का ते..!
10. गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच..
> मी तबला शिकण्याचा प्रयत्न केला होता... सध्या मात्र डेस्कच बडवतो!
11. भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! ..
> बुडण्यापासुन वाचण्याइतपत चांगलं स्विमिंग आहे, आपलं!
12. बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे..
> हां.. ते काही नाही जमलं कधी... मात्र खो-खो अन् बाक्सेटबौल खेळायचो.. कौजेजमध्ये!
13. जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे..
> जर्मन चा क्लास "एस.पी" मध्ये लावला होता... मात्र "गुड नाख्ट" [गुड नाइट] वरच आमचा "डंक चुस" [बाय-बाय] झालं!
14. साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे! xpasti
> आपला गणपती डान्सच बरा!
15. इजिप्त,हवाई आणि बाली बेटं तसेच नॉर्दर्न लाईट्स किंवा aurora borealis इत्यादी ठिकाणं पाहायची आहेत..
> आंदमान - निकोबार आहे आपल्या लिस्टवर!
16. नॉर्दर्न लाईट्स वरून आठवले, मीना प्रभूंसारखा मनसोक्त जगभर प्रवास करायचाय! नाही, मी पुस्तकं नाही लिहीणार!
> काही मोजकी ठीकाणं - जागतिक आश्चर्य - म्हण हवं तर.. मलाही पहायची आहेत.
17. आत्ताच नाही, पण काही काळाने परत आणि भरपूर शिकायचे आहे! आणि पहील्या नंबरानेच पास व्हायचेय!
> मास्टरर्स डीग्री चा विचार करतोय!
18. कुंभार काम करायचेय.. मातीची भांडी,कप्स,बोल्स इत्यादी इत्यादी!
> बायकोला चायना क्लेची भांडी बनवता पाहिलंय.. काधी प्रयत्नही करावा म्हणतोय!
19. Paragliding, Parasailing, Snorkeling आणि Bungee Jumping.. (last one seems really difficult!)
> हडपसर अन लोणावळ्याजवळच्या एक-दोघांशी बोलणं झालय.. बघु कधी मुहुर्त लागतोय ते..!
20. ..... अजुन खूप काही!
> हो.. नक्कीच आहेत... बघु, कधी नविन लिस्ट बनवतोय ते!

- भुंगा
Bhagyashree म्हणाले…
wow bhunga... ekdam ch same ahe list..! very good.. tujhya baykoni yatla barach kahi already kelele distay pan! :)
thanks for comment!

mi katha nakki vachin.. shodhtiy blog var tujhya..
sanket म्हणाले…
वा: वा: भाग्यश्रीताई, आवडली मला ही विश लिस्ट+टु-डू लिस्ट.
मी पण एक छोटीशी यादी तयार केलेली आहे.Some of our wishes are really same(library, salsa, northern lights).म्हणून उल्लेख टाळलाय़.पुनरुक्तीदोष हा गंभीर साहित्यदोष मानला गेलाय. check my list.
sanket म्हणाले…
btw,माझ्या यादीचे प्रेरणास्त्रोत आपणच ! मीना प्रभूचे एखादे छानसे पुस्तक सुचवा. मी एकही वाचले नाही अजून!
Unknown म्हणाले…
संकेत वाचली लिस्ट तुझी! सही आहे!

मीना प्रभूंची पुस्तके:

इजिप्तायन - इजिप्त
मेक्सिकोपर्व - मेक्सिको
तुर्कनामा,
ग्रीकांजली - ग्रीस, तुर्कस्तान का कुठलातरी देश.. :) विसरले आता नाव..
चिनीमाती - चीन
दक्षिणरंग - साउथ आफ्रिका?
माझे लंडन -लंडन

आणि आता "गाथा इराणी" येतंय असं ऐकले होते..
पर्फेक्ट आठवत नाहीये.. कारण खूप पूर्वी वाचली आहेत पुस्तके..
sanket म्हणाले…
आयला!! मेक्सिकोपर्व, तुर्कनामा!! ऎकल्यासारखं वाटतयं. देजा वू ??? इतर पुस्तकांचा जुगाड करतो लवकरात लवकर.( ’जुगाड’ भा्रतभूने जगाला दिलेला एक महान शब्द!! ) नेक काम को देरी कॆसी।
Thanx for the help.
Bhagyashree म्हणाले…
you are welcome..! my fav is egyptayan.. nakki vach..
bhaanasa म्हणाले…
तुझी लिस्ट आवडली. त्यातल्या अनेक माझ्या लिस्टवरही आहेत ग. आई-बाबा( दोघांचेही ), आम्ही दोघे व पोरगा पुन्हा एकदा एकत्र राहावे ही माझी नंबर १वर असलेली विश आहे सध्या. :)
Bhagyashree म्हणाले…
wow bhagyashree.. (tujhe/tumchahi nav tech ahe na?)
hi wish tar saglyat pahili ani most important! :)

thanks for the comment..
सखी म्हणाले…
तुला एवढं लिहिण्यासाठी छान वेळ मिळतोय, पोस्टत जा! पण मला वाचण्याएवढा वेळ मिळत नाहीये आणि मी सगळं मिस्स करत्ये. :(
ऐसी तो हमारी लिश्ट पे लिश्ट बनती जायेगी!!
:) मस्तंच!!
Bhagyashree म्हणाले…
sakhi, dhanyavad! mala far chikkar vel hota mhanun kharaDla..

ata jara kahitari bara lihin mhante.. kharaDa-khardi bas zali.. :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

'मेरू'