निरोप आणि रंगरंगिले छैलछबिले!! :)

आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्‍या साईट्स बद्दल काही विशेष ममत्व वाटत नाही.. तेच इतरांना माझ्या ब्लॉगबद्दल नको वाटायला.. म्हणुन हा निरोप..

असो.. आजचे पोस्ट मी खरंतर केवळ निरोपसमारंभ नाही..

मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो..
तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!

पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल.. काल रात्री अर्धवट झोपेत मला या पोस्टचा विषय सुचला.. नुसताच विषय नाही! तर सगळं पोस्ट मी झोपेत फ्रेम केले.. सुरवात अशी.. मग असं लिहूया वगैरे... hah मी लिटरली (अर्धवट)झोपेतून जागी होऊन बघायला लागले.. काय होतंय नक्की?? मग मला पोस्ट सुचलं हे कळल्यावर तेव्हा उठून मी पोस्ट टाईप करणार होते.. पण जरा अतीच झाले असते ते.. मग राहीले...

आता आठवल्यावर लिहीले पाहीजे ना तसे.. पण सुरवात काही आठवत नाही आता.. इतकी छान होती ती झोपेतली सुरवात... आता जाऊदे... sedih

तर ... ते पोस्ट फार भारी नसून साध्या आपल्या रंगांवर होते.. येस्स... आठवली सुरवात! क्या बात है भाग्यश्री! त्वाडा ज्वाब न्नै.. ( वगैरे जे काय असेल ते.. मला मराठी धड येते.. बाकीच्या भाषा नाहीत! )

हां.. मी लहान असताना.. म्हणजे इयत्ता ४थी वगैरे.. तेव्हा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला (आणि आईच्या मागची भूणभूण कमी करायला ) मी आणि दादा एका नाट्य-शिबीराला जायचो.. झांबोकाका नामक माणूस ती शिबीरं घ्यायचा.. आय नो, नाव खूप कॉमेडी आहे... पण यात काहीही माझी क्रिएटीव्हीटी नाही! माझ्याकडे त्या शिबिरातून मिळालेली सर्फितिकिट्स सुद्धा आहेत! ( हो.. स-र-फि-ति-की-ट !! लहानपणचा माझा दावा असा, की फिकीट असा शब्द नसतो परंतू तिकीट असतो, तेव्हा तो वर्ड सर्फितिकीट असाच आहे!! sengihnampakgigi ) तर ते झांबोकाका मस्तपैकी नाटकं लिहायचे, बसवायचे.. ती नाटकं मग भरत नाट्य मंदिरात सादर व्हायची.. इतक्या मुलांना घेऊन नाटक करणे म्हणजे खाऊ नाहीये... आदर वाटतो मला त्यांचा.. असो..

बरीच नाटकं केली.. हिमगौरी आणि सात बुटके, जसा राजा तशी प्रजा(ही नाटकाची थीम होती.. असं नाव नव्हतं.. श्या, नाव आठवतच नाहीए.. :( ).. आणि, रंग-रंगिले छैल छबिले !!

तर हे पोस्ट रंग-रंगिले छैल-छबिले बद्दल...

एकंदरीत असा प्लॉट होता.. (आईशप्पथ.. कसलं भारी वाटतंय.. एकदम कलाकार अभिनेत्री दिग्दर्शक वगैरे झाल्यासारखे!! )
प्लॉट असा होता , की एका चित्रकाराच्या रंगपेटीतले रंग एके दिवशी बोलायला लागले.. मग सगळे आपली महती सांगायला लागले.. त्याची मस्त गाणी रचली होती... हो, झांबोकाकांनी.. अजुन एक मुलगी होती मदतीला.. तिनेही रचली असावीत , कल्पना नाही... तर सगळे रंग आपली महती सांगतायत.. बाकीचे त्याची थट्टा करतायत.. पांढर्‍याची जास्तच.. मग शेवटी चित्रकार(म्हणजे माझा दादा) येऊन सगळ्यांना लेक्चर देतो, की तुम्ही सगळेच महत्वाचे आहात.. मग देवी सरस्वती येऊन पांढर्‍याची बाजून घेऊन सगळ्यांना झापते.. प्रार्थना होते.. आणि नाटक संपते!! :)

आठवतील तशी करूनच टाकते पोस्ट.. काही दिवसांनी विसरीन.. खरं म्हणजे हेच नाटक मी परत आमच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात केले होते.. इन-फॅक्ट आत्ता तेच डोळ्यासमोर आहे.. त्याची व्हीडीओ कॅसेटही केली होती.. पण व्हीसीआर न वापरल्यामुळे कॅसेट खराब.. सो लिहून ठेवते आता...

मी निळी झाले होते.. ड्रेस नवीन आणला होता निळा.. हेबरबॅंड म्हणजे आपला हेअरबॅंड तो निळा.. पायात मोजे निळे.. इतकेच काय? गालाला निळे रूज आणि केसात निळी चमकी ओतली होती!! मी पुढे येउन गाणं म्हटलं होतं!! (किती त्रास श्रोत्यांना!! )..
"आभाळ निळे, डोंगर निळे .. निळासावळा.. कृष्णकन्हैय्या.. लालालाअलाअ.. (आठवत नाही.. ) शिवशंकर.. तो ही निळा... " (चाल: जीना यहॉं, मरना यहॉं.. इसके सीवा जाना कहा! म्हणून पहा! )
मग सगळ्या बाकीच्या कलर्सनी मला चिडवायचे.. for example , नीळू बाई नीळू नको आता पिळू! वगैरे...

मग लाल.. तो गजू होता.. त्याने तर काय कॉमेडी ड्रेस घातला होता.. त्याचा लाल टीशर्ट, माझीच लाल स्लॅक्स, वर लाल टोकाची टोपी , हातात लाल छ्डी आणि हो..गालाला लाल चमकी! :)) ..
गाणं होतं : "लाल टांगा घेऊन आला लाल टांगेवाला.. ऐसा लाला गाणे गातो, लल्लाल्ललालल्ला.. घोडा लालेलाल, त्याची शेपूट लालेलाल (आमचा कोरस : हेहॉ!" ) वगैरे... त्याला तांबड फुटलंवरून चिडवलं सगळ्यांनी! gelakguling

पिवळा चिंटू.. त्याला गळ्यात सोनेरी कागदाचा केलेला हार.. बाय डिफॉल्ट येणारी त्या रंगाची चमकी.. आणि खाली चक्क काकूंची पिवळी जरतारी साडी, धोतर म्हणून ! तसा तो नाचत होता..
"पिवळा पितांबर नेसुनी लालालाला.. गरुडावर बैसोनी माझ्या कैवारी आला" वगैरे... काय होतं देव जाणे.. आरती टाईप होतं..

हिरवा ओंकार.. त्यालाही हिरवी टोपी, हिरवा टीशर्ट, हिरवी चमकी आणि gelakguling माझा हिरवा स्कर्ट! त्यावरून हिरवी अशोकाची पाने... हाता-पायावर हिरव्या रंगाने चट्टेपट्टे.. !
गाणं : "हिरवे हिरवे गार गालिचे.. हरिततृणांच्या मखमालिचे .. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती!" याला काय चिडवलं आठवत नाहीये!

जांभळा : नचिकेत दादा.. त्याने कुठून तरी जांभळा पठाणी ड्रेस पैदा केला होता.. वर कोणाची तरी जांभळी ओढणी डोक्याला बांधली होती! गाणं अर्थातच ,
"जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजतो..हो हो हो ढोल..वाजतो, कोणाचा वाजतो!!"
त्याने जांभळ्याची महती सांगताना जांभूळ, करवंदं इत्याआडि टेस्टी प्रकार सांगितले होते ! आणि इतकी मस्त खायची ऍक्टींग करत.. sengihnampakgigi

काळा: आदित्य.. कॉस्चुम डिझाईनिंगला सगळ्यात सोप्पा रोल ! काळा टीशर्ट, काळी जिन्स.. संपलं! हो, ती चमकी आहेच...
"हम काले है तो क्या हुवा , दिलवाले है! (आमचा कोरस: अय्यो अय्यो!")
काळा रंग काय महत्वाचा आहेच! काळी माती, काळा फळा, विठोबा काळा वगैरे !
पण त्याला काय रिडिक्युल केलं आम्ही(नाटकात म्हणजे!) .. तू काळा आहेस.. तू बाजूला हो..वगैरे ! हेहे..

स्नेहल पांढरी.. ती आपली इतकी बिच्चारी दाखवली होती.. तिच्याकडे काही बोलायला पण नव्हतं.. गाणं तिनेही म्हटले पण ती इतकी दुर्लक्षित की मला आता आठवत नाही! तिलाही नाटकात इतका त्रास दिला! तुला काही रंगच नाही.. कॅन्व्हासवर आम्ही सगळे कसे छान उठून दिसतो.. तूझा काय उपयोग वगैरे...

मग ती रडायला लागते.. मग सर/चित्रकार येऊन सगळ्यांना ओरडतो.. समजावतो..
मग सगळे रंग सरस्वती देवीची प्रार्थना करतात.. ती प्रसन्न होते.. थोडं लेक्चर देते.. त्या कॅन्व्हास वर प्रत्येक रंगाला उडी मारायला सांगते.. कॅन्व्हास सगळा खराब होतो... मग ती म्हणते तुमच्या सर्वांमुळे हा खराब झाला! तो परत पूर्वीसारखा करून द्या आता?? सगळे मान खाली घालतात! पण पांढरा खुष असतो.. मग सरस्वती म्हणते, तुम्ही खराब केलेला कॅन्व्हास हा पांढराच पूर्ववत करू शकतो! मग त्याने तसे केल्यावर सर्व रंगांना आपली चूक उमगते.. ते पांढार्‍याला आपल्यात घेतात, आणि गातात.. "रंग-रंगिले छैल-छबिले" !!

खरंतर शेवटीही गाणं होतं एक.. ते ही विसरले.. :)

फार बालिश आहे हे.. पण माझं बालपण फार मस्त केलं या आणि अशा गोष्टींनी.. कॉलनीच्या गणेशोत्सवासाठी आईने बसवले होते हे नाटक.. तिला ते लिहीण्यासाठी मदत मी केली होती.. तेव्हा सगळी गाणी आठवत होती! त्यामुळे अगदी निर्मितीपासून भाग घेतलेले हे नाटक माझ्यासाठी फार आवडीचे !

टिप्पण्या

HAREKRISHNAJI म्हणाले…
How could you do that ? Well it happens with me also.
भानस म्हणाले…
हेहे...x(. आता न पाहिलेल्या तुला मी ह्या सगळ्या रंगात पाहू लागलेय.
Unknown म्हणाले…
thanks harekrishnaji.. it was difficult decision! :D

bhagyashree, thanks! :)
Siddhesh Kabe म्हणाले…
sundar blog liila ahes...khud pulanchi kivva damanchi kadha vachlyasarkha khala...suundar...

Cheers,

SiD

http://sidoscope.blogspot.com

P.s. Marathit lihilya mule, vishesh namud karave vatate kii majhya ingrazi blog chi sadya laaz vatate ani ek marathi blog suru karnyachi kalpana dilyabaddal dhanyawad.
Yawning Dog म्हणाले…
Ekun ase disoon ale ke, ya natakala majjor arthasahayya tumchya gharoon hote.
Apale kapade sagalyana, swatahala naveen kapade :)

"सर्फितिकीट" afalatoonch !
सखी म्हणाले…
एक नंबरी X(
Maithili म्हणाले…
khoop cute aani niragas....
Unknown म्हणाले…
sakhi, maithili, raj thanks heaps! :)
veerendra म्हणाले…
are wa .. he template tar mastach ahe .. ekdum simple ani fast. i liked background pattern & comment section too..
are you web designer ?
Unknown म्हणाले…
hey veerendra thanks for your comment..
I have not designed this template also I am not a web designer(though would love to be..) saddhya chi hushari evdhich ki mi tasantas templates shodhte so bari miltat.. :) I loved this very much.. purvi hech hota.. pan there was some problem with comment section so had get rid of it.. now back to this lovely beauty!

thanks again!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

'मेरू'