१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!
ह्म्म.. सद्ध्या माझ्याकडे अफाट रिकामा वेळ आहे, हे तुम्हाला कळतच असेल.. माझ्या मे महीन्यातल्या (टाईमपास )पोस्टच्या संख्येवरून! किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे! रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट.. टेम्प्लेट बदललं.. आधीचे फार छान होते! पण फार क्लटर्ड वाटले.. आणि मुख्य म्हणजे मला सांभाळणे मुश्किल झाले होते ते! ऍक्चुअल पोस्ट बॉडी मधे काहीच कोडींग करता येईना! Duh.. याला काय अर्थ?? मग दिले फेकून! हे क्युट, सिंपल साधं सोप्पंच बरं.. (निदान काही दिवस तरी! ) अरे हो, स्मायलीज नोटीस केल्या का कोणी? आधीच्या जरा डेंजरच वाटत होत्या.. या याहूच्याच चांगल्या! शिवाय, कमेंट्स मधेही एनेबल्ड केल्या आहेत.. हसा लेको! कमेंट फॉर्मही एम्बेडेड केला.. Save as PDF , Button मी काढून टाकले परत.. ते काही काम होईना.. आणि तसंही कोण आवर्जून सेव्ह करून ठेवणार?? RSS Feeds चा Icon बदलला.. हा हत्ती जास्त क्युट आहे! प्रत्येक पोस्टखाली रिलेटेड पोस्टचे विजेट टाकले.. वाचकांना जरा जास्त वेळ गुंतवून ठेवायला ते बरं असतं! नंबर्ड पेजिनेशन - नंबर्ड पेज नेव्हीगेशन चालू केले.. होम पेजच्या पुढच्या(की मागच्या...