"स्वच्छतेच्या बैलाला.. " च्या निमित्ताने...

तसा हा प्रचंड दुर्लक्षित विषय.. स्वच्छता, आरोग्य याच्याशी निगडीत असल्याने खरंतर भरपूर लक्ष घातलं पाहीजे.. आपल्या भारतात नसलेल्या (किंवा अती अस्वच्छ असलेल्या) स्त्रियांच्या स्वच्छतागृहांचा हा प्रश्न..

मायबोलीच्या दिवाळी अंकात अज्जुकाचा "स्वच्छतेच्या बैलाला...." हा लेख वाचला, आणि सगळं पटत गेलं..

कधी ना कधी , कुठे ना कुठे हा प्रश्न भेडसावतच असतो.. रादर, भारतात कुठेही जाताना हा प्रश्न समोर उभा ठाकतोच.. बाहेर पड्ल्यावर कुठे टॉयलेटला जावं लागू नये म्हणून कमी पाणी पिणं हा सगळ्यात सोप्पा आणि तेव्हढाच चुकीचा उपाय.. पण जवळ्पास सगळ्या मुलींनी आणि स्त्रियांनी हाच उपाय अवलांबला असेल..

सरकार किंवा ज्यांच्या अधिकारात येतात या गोष्टी ते काही करत नाहीत.. हे तर झालंच.. पण आपण काहीतरी करू शकतो ना??? आपल्या परीने प्रयत्न.. स्वच्छतेच्या बैलाला वाचून अनेक लोकांना ते पट्लं.. आणि आता ती सर्व लोकं एकत्र येऊन या अडचणीवर काहीतरी उपाय शोधत आहेत.. उदा: एखादी शॉर्ट फिल्म तयार करून ती सगळीकडे वितरीत करणे.. लोकांच्या मनावर हॅमर करणे.. संबंधित लोकांपर्यंत हे पोचवणे, लोकल वृत्तपत्रांमधून छापणे, शाळांमधून मुलांना ट्रेन करणे, इत्यादी इत्यादी... नाहीतर, ही समस्या आहे हे लोकांना समजणारच नाही! स्त्रियाच केवळ दुर्लक्ष करतात तिथे बाकीच्यांची काय कथा..

याच कारणामुळे ज्यांना खरंच तळमळीने या प्रश्नाचा निकाल लावावासा वाटतो, ते एकत्र जमून करता येण्यासारखे उपाय करत आहेत,शोधत आहेत.... इथे ही सर्व चर्चा वाचता येईल..

सद्ध्या तरी माझ्या हातात ब्लॉगवर लिहून जमेल तितक्या लोकांपर्यंत पोचवणे इतकेच आहे.. त्यामुळे ही पोस्ट..
सर्व बायका याला रिलेट करू शकतीलच.. पुरूषांनीही अज्जुकाचा लेख वाचून पाहावा.. सर्वात बेसिक असलेली ही गरज.. पण किती वानवा आहे याबाबतीत.. फक्त भारतातच असे नाही तर इतर ठीकाणीही स्वच्छतागृहे स्वच्छ नसतात.. त्यासाठी नुस्तं सरकारने रेस्टरुम्स बांधून काही होणार नाहीए, तर तळागाळातल्या लोकांपर्यंत तो अवेअरनेस पोचला पाहीजे.. म्हणून ही सगळी धडपड..

ज्यांना खरंच हा प्रश्न सुटावा असं वाटते त्यांनी त्या चर्चेमधे सहभाग घ्यावा. निदान त्या लेखाची, चर्चेची लिंक आपल्या ब्लॉगमधे द्यावी.. जेणेकरून सर्व लोकांपर्यंत हे पोचावं..

तेव्हढं नक्कीच करता येण्याजोगं आहे...
Signature2

टिप्पण्या

Raj म्हणाले…
सहमत आहे. जेव्हा भारतात सार्वजनिक स्वच्छता येईल तो खरोखर सुदिन ठरेल. आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे इतके वावडे का या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही.
Unknown म्हणाले…
ह्म्म,खरंच वावडे आहे! घरं चकचकीत असतील, पण घराबाहेर कचरा करायला काही पाहात नाहीत लोकं! :(
बाहेरही घरच्यासारखं वागलं, स्वच्छता पाळ्ली तरच हा प्रश्न जरा तरी सुटेल..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives