मुख्य सामग्रीवर वगळा

अविस्मरणीय !

पुण्यात वळीवाचा आणि आता मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यापासून माझी इथे चलबिचल होत होती...
पाऊस अत्यंत प्रिय.. आणि त्यातून पुण्याचा ! आणि मी पुण्यात नाही, असे पहील्यांदाच घडले.. ( खड्डे-बिड्डे नाही येत हो डोक्यात अशा वेळी!)

इथेही वेळीअवेळी पाऊस पडत असतो.. पण रिमझिम.. एकदाच मुसळधार पाऊस झाला होता, माझा वाढदिवस होता तेव्हा.. काय आनंद झाला होता मला! पाऊस आलाय आणि मी उगीचच खुष झाले नाहीय, असे एकदाही होत नाही.. असो..तर इथला पाऊस वेगळा.. पुण्याचा वेगळा.. आणि पुण्याचा पाऊस मी मेज्ज्ज्जर मिस करत होते....

परवा असच फिरायला बाहेर पडलो.. आणि एका घाट-सदृश रस्त्यावरून जाताना अचानक आम्हाला ओल्या मातीचा वास आला!! हो अगदी आपल्या भारतातल्या सारखा!! खरं तर तिथे अजिबात पाऊस पडत नव्हता, पण तरीही तो वास आला.. फक्त मलाच नव्हे,तर नवर्‍यालादेखील..

दोघंही वेडावून गेलो.. भारतात असतानाही वेड लावतोच तो वास.. पण इथे?? कसलं भारी वाटलं तो वास आल्याने मी सांगूच शकत नाही!!

तिथून परत येताना आम्ही सगळ्या खिड्क्या उघड्या ठेऊन, अगदी छातीभरभरून वास घेतला.. श्वास अडकायची वेळ आली... पण अतिशय खुष होऊन परत आलो..

पुण्याचा पाऊस नाही निदान ओल्या मातीचा वास तरी मिळाला! दुधाची तहान ताकावर, दुसरं काय !!
Signature2

टिप्पण्या

Raj म्हणाले…
Hi Bhagyashree!
Tuza urkut warcha message aatta pahila *feeling ashamed*
mi april madhe italy soDale ani francela navin job ghetala. gele don mahine Italy-India-France asa bhaTakat hoto tyamule orkut messages check kele nahit. i am very, very sorry.
could not reply to you on orkut, hence the reply here.
Raj

ps : upakram ani random thoughts cha rajendra mich :p
Sarika Kamat म्हणाले…
Chaan vatla vachun. Im crazy bout RAINS too :)
Dk म्हणाले…
Hey BK, (shorform - well phaar aalsi aahe me hya baabteet! :) )

chaan aahet photos! kuthe job krtys? IT??

Maayboli vr kaay naavane lihita/ vachtaa/vaavrtaa??

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??