कंटाळा
भयानक कंटाळा आलाय राव.. का...ही केलं नाही आपण मोलाचे.. आयुष्य नुसतंच वाया चाललंय असं वाटावं ![](file:///C:/Users/bhag41/AppData/Local/Temp/moz-screenshot-8.jpg)
![](file:///C:/Users/bhag41/AppData/Local/Temp/moz-screenshot-8.jpg)
![](http://1.bp.blogspot.com/-r5oEvgwr3uw/Uc5k93G7xSI/AAAAAAAAMHg/ctLCiDvVC04/s320/bored+smily+egg.jpg)
इतका तो कंटाळा...सतत करणार तरी काय म्हणा? पिक्चर्स बघ, टीव्ही बघ, पुस्तके वाच, झाडून सर्व मराठी साईट्स वाच, नवीन पदार्थ कर, घर आवर,अभ्यास कर.. काहीही कर.. पण हा कंटाळा आहेच?? किती तो हटवादीपणा??
काहीतरी उच्च, दैदिप्यमान काम केलं पाहीजे.. सगळं जग, बरं जरा जास्तच झाले.. निदान तुम्ही राहता ती कॉलनी तरी तुम्हाला ओळखेल असं काहीतरी... इथे काय? शेजारची दोन घरंही मला ओळखत नाहीत.. मी ही त्यांना ओळखत नाही म्हणा..
पण असं काय केलं म्हणजे जरा बरं वाटेल स्वत:बद्दल?
:|
टिप्पण्या