ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:..
"अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा
"हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :("
"ह्म्म.."
"ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...."
"असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) "
"हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त दिवस होते.. पण ते भारतात परतल्यापासून जास्तच वाटतंय मला असं.. :( "

"ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !! मला आत्ताच्या क्षणाला काहीही आवडत नाहीये इथलं.. एकतर आपल्या गावात आपली लोकं कमी.. त्यातून अमेरिकन्स जास्त.. त्यान्ना हाय हॅलो सोडून काही बोलता येतं की नाही कोण जाणे! मला ना असं कोणीतरी पाहीजे.. अपॉइन्टमेन्ट, फॉर्मॅलिटी सगळं सोडून फोन न करता छान पैकी आरामात घरी येऊन कॉफी पीत गप्पा हाणणारी मैत्रीण हवीय़! श्या किती आम्ही मारायचो गप्पा अशा.. मिथु,मनी.. sigh.. ... इथे आहेत ना लोकं, मैत्रीणी.. पण किती ते अंतर? अमेरिकेच्या एका टोकावरून दुसरीकडे जायचे म्हटले तरी विमानाने ८-१० तास लागतात!! सगळंच अवघड! साधी कोथिंबीर आणायला गाडी काढून १५-२० मैल तरी गाडी हाकावीच लागते!! "
" घरं पण कसली पुठ्ठ्याची! मला इथल्या भिंती पण आवडत नाहीत.. पांढरे पुठ्ठे सगळे! रात्री अंगावर येतात अंधारात! सुरवातीला आठवते ना कसे झाले.. २-३ आठवडे नुसती वाईट स्वप्नं मला! म्हणजे आधीच तो वाईट्ट जेटलॅग लागला होता.. वेड्यासारखी कधीही झोपायचे.. रात्री टक्क जागी.. कधीतरी झोप लागली तर वाईट स्वप्नांची रांग.. कधी मी पडतीय, कधी कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कधी कोणी मारतंय.. अर्रे काय्ये हे ?? :(( "
"अगं नवीन जागा.. त्यातून तू कधी पुणे सोडून राहीली नाहीयेस.. येणारच ना त्या अशा (भितीदायक) जुन्या आठवणी..!! " (माझा नवरा पुण्याचा नाही, त्यामुळे तो पुण्यावरून टॉन्ट्स मारणे सोडत नाही!! )

"गप हा.. पुण्याला नावं नकोयेत.. मी आधीच इतकी मिस करतीय.. आणी तू असं बोलतोस.. काही वाटतं का तुला?? तुझी गरीब बिचारी बायको इतकी वैतागलीय.. आणि तुला जोक्स सुचतायत.. व्हेरी फन्नि!!! :(( ते काही नाही.. तू काहीतरी कर.. कळलं का? मला पुण्याला जायचेय..सगळ्या मैत्रिणींना भेटायचेय.. पुण्याला भेटायचेय माझ्या! आई बाबांबरोबर राहायचंय.. आईला स्वयपाक करून तिच्या आवडीचे खायला करून द्यायचंय(एकदातरी!! :D ), त्यांच्याबरोबर कॅरम,रमी खेळायचीय! खूप काही! तेही आत्ताच्या आत्ता !!?? "
"आय नो, आय नो... डोन्ट वरी.. जाशील तू लवकरच.. ओके? नॉऊ चिअर अप! काय कंटाळा कंटाळा करतीयस.. विकेंडला कुठे जायचे ते कर बरं प्लॅन.. मी काही पाहणार नाही.. लोकेशन, रस्ते, हॉटेल्स सगळं ठरव.. जाईल वेळ जरा.. तसंही तू काही सोडणार नाहीस प्लॅनिंग नीट करायला.. नंतर ऑर्कुटवर फोटो टाकून शायनिंग मारायचे असते ना! हेहे"
"हो म्हणजे काय! :)) अरे ते शायनिंग मारणे नसते रे ! मी काय करतीय सद्ध्या, कुठे भटकंती, किती खादाडी केली ते सगळं एका क्लीक मधे कळतं ना माझ्या मित्र-मैत्रिणी,घरच्यांना.. ते सगळं शेअर करणं हा उदात्त(!) हेतू असतो बरका! लोल.. :) "
"ह्म्म नशीब हसलीस.. आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर! "
"ह्म्म, आला मूळपदावर! सा.खि. काय अरे.. जमेल का अशी इन्स्टंट! करते काहीतरी !! मलाही भूक लागली वैताग करून!"
-------------------------------------------------------------------------------------------
नेहेमीचे डायलॉग्स हे..
( घरची मंडळी : घाबरू नका! टेन्शन घेऊ नका! मी एकदम मजेत आहे! :) )

सगळे तोंडावर आले नसतील संवाद.. पण मनात सतत वाजत असतात..
किती मिस करते मी इंडिया, पुणे, सगळंच,सारखंच..
वरचा संवाद वाचून असे वाटेल की मी अगदीच दिवसभर फ्रस्ट्रेट होऊन बसलेली असीन.. तसं काही नाही! मस्त आराम फर्मावतीय़.. भरपूर हिंडतीय.. खूप नवीन पदार्थ करायला शिकतीय, ते खात सुद्धा आहे! इथेही मैत्रिणींशी फोनवर का होईना गप्पा हाणतीय.. चॅट तर काय असतंच.. इथेही मंडळाचे कार्यक्रम असतात, भरपूर मराठी पब्लिक साधारण ४०-५० मैलांवर असतेच! बरेच नातेवाईक राहतात जवळच..

सगळं बेस्ट आहे हो! पण म्हणून इंडीयाची आठवण येणारच रोज! नाही जाऊ शकत मी हवं तेव्हा, मनात येइल तेव्हा.. अंतर,नोकरीतून सुट्ट्या,व्हीजाच्या कटकटी असतातच, त्या सगळ्या जंजाळातून जाणे म्हणजे कुठे सोप्पंय!

आत्ता लिहीता लिहीता अजुन एक जाणवलं.. भारताबद्दल आपल्या मायभूबद्दल इतकं, इतकं आतून वाटत असतं सारखं.. जीव तीळ तीळ तुटतो कधी कधी! आई कधीतरी सांगते शक्य तितक्या नॉर्मल आवाजात, की चिऊड्या आत्ताच तुझी इतकी आठवण आली, असला सही पाऊस पडातोय़!.... अशा परिस्थितीत धड उठून जाताही येत नाही.. समजूत काढूनही उपयोग नसतो, आणि काय काढणार? कसंनुसं हसून विषय बदलायचा अन काय!
असं आणि इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. आजकाल नेटने जग फार जवळ आलंय.. लिखित मिडिअम असल्यामुळे कोणी काहीही बोलले तरी फारसा फरक नाहीच पड्त! पडून घेऊ नये! पण मग असं पदोपदी दिसत असेल तर आपण नक्की काय करावं?(अगदी कॉमन उदाहरण घ्या, इसकाळमधे येणारे वाचकांच्या कमेंट्स!! ) आमची काही आकांक्षा आहे, एक ठराविक ध्येय आहे आयुष्यात, काही नवीन गोष्टी साध्य करायच्या, नवनवे प्रदेश पाहायला मिळ्तात, काही शिकायचे असते.. हे सर्वं चूकच का?? आपलं, आपल्या आई बाबांचे, कुटुंबाचे आयुष्य जमेल तितके सोपे करायचे.. या विचाराने आम्ही इथे येतो.. त्यांच्याबद्दल प्रेम जाऊदे, पण द्वेष का वाटावा इतका? इतका.. की त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? :( इट हर्ट्स.. पण जाऊदे.. जशी परदेशात आहे म्हणून बळंचच भारावून जाणारी लोकं असतात तस्साच पण उलटा प्रकार!

आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो, छ. शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून स्फुरण चढते, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जमेल तसे कार्यक्रम होतात इथे, कार्यक्रमापेक्षाही ती देशभक्तीची भावना आमच्याही मनात तेव्हढीच असते, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझ्याच काळजाची जखम असल्यासारखे सैरभैर झाले होते मन... अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!! आम्ही भारतीयच आहोत शेवटी... जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी! आणि मायभूला स्वत:च्या ’माय’ इतकंच मिस करत राहणार.. म्हणून तर हे सगळं मराठी साईट्स शोधणे, मराठीतून ब्लॉग लिहीणे, पुस्तकं शोधणे वगैरे करत असतो आपण.. जमेल तसं भारतीय,महाराष्ट्रीय लोकं शोधून गणगोत जमवतोच ना आपण? इंडियन रेस्टॉरंट दिसलं की पावलं वळतातच ना तिथे? शेवटी आयुष्याची कमीत कमी २४-२५ वर्षं जिथे काढली ती पुसून थोडीच जाणारेत?? कसं शक्य आहे..!
------------------------------------------------------------------------------------------------
हे अन असं सारखं येतच असतं डोक्यात.. बर्‍याच दिवसांपासून काहीतरी लिहायचे होते असे.. अर्थात मनातले विचार परफेक्ट नक्कीच उतरले नाहीयेत.. नाहीतर मी प्रथितयश लेखिका नसते का झाले! :) नेहेमीप्रमाणेच मनात आले तसे उतरवले..
आवडले तर नक्की कळवा.. नाही आवडले तरी कळवा चालेल! :)

टिप्पण्या

Deepak Parulekar म्हणाले…
या चिमण्यांनो परत फिरा रे ......

खरं सांगू, तुझे शब्द वार्‍यासारखे भिरभिरत येतात आणि आधिच भरकटलेल्या मनाला कुठेतरी दूर घेउन जातात. पण हो हे भरकटणही फार छान असतं.

दिपक परुळेकर
मुंबई
Unknown म्हणाले…
bahinabai...dolyaun pani kadhales akasharshya!!!farach sunder lihile ahes
shirshakach etake sahi ahe ...& tyanusarach lekh hi!!
mast "all the best"
Ashwini
Deepak म्हणाले…
वा! छान लिहिलंय... मनाला भिडणारं - पटणारं !
मंदार काळेंची 'सह्याद्रिला विसरु नको' ही कविता मनात एक वादळ निर्माण करते! - तुम्हाला हर्ट करण्याचा हेतु अजिबात नाही .. फार मोठी कविता आहे - आणि कमेंटसच्या शब्दांना लिमिट आहे.. त्यामुळे:

................
...................

पोटासाठी मित्रा दाहिदिशांना जायला हवं
दिशा देण्या प्रवाहाला, प्रवाहापुढे जायलाच हवं
कासवासारखं विश्वासने एक एक पाउल टाकायला हवं
अरे आठव्या घरच्या प्याद्यासारखं वजीर म्हणुन जगायल हवं
एक् स्वप्न देशासठी आपणही पाहायला हवं
व्यावसयिकतेच्या दुनियेत भावनांनाही जपायला हवं
नमस्कार सांग लिबर्टिला पणं माय भवनील विसरू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको

स्वर्ग सुखं सगळी मित्रा हात जोडून उभी असतील
भुरळ पाडतील तुला आणि मर्यादेला हसत बसतील
जिम असेल क्लब असतील मैदानेही भरत असतील
मंद मंद उजेडात पार्ट्यासुध्दा होत असतील
राँक अँन्ड रोल वर बेभान हो पन तान लताची विसरू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको

पंखात शक्ती आल्यावर पाखरं दुर उडुन जातात
आई वडिलांच्या घरट्यात मग आठवणींची भुतं राहतात
अरे आठवणींची भुतं आईला रोज अश्रूंची भेट देत राहतात
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोपसुध्दा पळवून नेतात
आईच्या चरणी ये स्वर्गात सुध्दा रमू नकोस
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको

वाट पाहत मित्र तुझी कट्ट्यजवळ बसला असेल
टुझ्या वटणीचा ग्लास कुठे पार्टित तसाच उरला असेल
बँट घेवुन् पिट्ट्या एकटाच मैदनात उतरला असेल
तुझ्याविना संघ मित्रा फायनल मँच हरला असेल
भेटिसाठी टुझ्या इथे प्रत्येक जण आतुरला असेल
अरे आठवणींनी गावच्या कधी उर तुझाही भरला असेल
भरारी मार उंच आकाशी, पण मातीचं नातं तोडू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको

वाटत असेल तुलाही मित्रा सह्याद्रीत परतं यावं
कामधंदे सोडुन सगळे दऱ्याखोऱ्यात भटकतं राहावं
निशाचरासारखं गुपचुप रोज रात्री बाहेर पडावं
मग ढाब्यावरती मित्रांबरोबर तासंतास बसुन राहावं
क्रिकेट खेळाव डोंगरावर्ती दमून भागुन घरी यावं
कोपऱ्यावरची भेळ खावी कृष्णामाईच पाणी प्यावं
अरे अँक्वाफिनाचं पाणी पी, पण कृष्णामाईल विसरू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको

परवाच पहिलं मित्रा आपला सह्याद्री रडत बसला होता
त्याचा हिरा म्हणे कोणी पश्चिमेला पळवून नेला होता
भवितव्याची स्वप्ने दाखवून् राणीच्या मुकुटात ठेवला होता
प्रकाशाला त्याच्या आता सह्याद्रीच पारखा झाला होता
सह्याद्रीच्या बुरुजा असा आयत्या वेळी ढळू नको
बिझिनेस वाँरच्या योध्द्या असा मैदान सोडुन पळू नको
मग नुसता आवंढा गिळु नको, नुसत्या मुठी वळवू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको


सह्याद्रीच्या कुशीत मित्रा मोठी रत्नं होवून गेली
देशासाठी नरदुर्गांनी सर्वस्वाची होळी केली
अरे आपल्याला ही ज्या सह्यद्रीनं विश्वास दिला, प्रेरणा दिली
त्यचीच मांडी आज क रे फुटक्या काचांनी भरून गेली
असेल देश गरीब आपला, पण कचरा म्हणुन हिणवू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको

वडिल रागवणार नहित हवं तर........ तु फक्त परत ये
आई सुचना करनार नाही ........... तु फक्त परत ये
मित्र भांडणार नाहीत ........... तु फक्त परत ये
शेजरी चुगल्या करणार नाहीत ......... तु फक्त परत ये
मँच अर्धी राहीली मित्रा ............. तु फक्त परत ये
बरं ! तुझी बँटिंग पहिली मित्रा ............. तु फक्त परत ये

अरे अटलींचे शब्द आठव ............. तु फक्त परत ये
टाटा - बिर्लांची जिद्द आठव ............. तु फक्त परत ये
सावरकरांचा त्याग आठव ............. तु फक्त परत ये
मग ओसाड गावचा भग आठव ............. तु फक्त परत ये
गावचा गोवर्धन उचलू ............. तु फक्त परत ये
अरे अख्ख जगही हलवू ............. तु फक्त परत ये

इच्छा श्रींची सोडु नको,शपथ शिवची मोडु नको
हुतत्म्यांची स्वप्नं अशी डाँलरसाठी विकू नको
सह्याद्रीच्या सुर्या असा पश्चिमेला मावळू नको
सिलिकॉन व्हँलीत जा ...... पण सह्याद्रीला विसरू नको
Deepak म्हणाले…
पुर्ण कविता या ठीकाणी सापडली...!

http://talekarbt.blogspot.com/2007/04/blog-post_21.html
अनामित म्हणाले…
मी स्वतः कधी अजुन परदेशात राहिलो नाहीये. पण पुढे जर कधी तशी वेळ आलीच तर काय करायचं याचं मी एक साधं, सोप्पं सोल्युशन शोधुन ठेवलंय. मी इथुन एक झाडाची कुंडी (शक्यतो तुळशीची किंवा गुलाबाची) सोबत घेऊन जाणार.. आपल्या देशाची आठवण यायला लागली, की त्या मातीचा, कुंडीतल्या झाडाचा सुगंध नाकात.. मनात भरुन घ्यायचा! निराशा लगेचच पळ काढेल एवढं नक्की. अम्म.. पण.. झाडाची कुंडी नेऊ देतात ना सोबत??
Nandan म्हणाले…
Post vaachoon bha. po. zala agadi. Aavadala lekh.
Yawning Dog म्हणाले…
ho same...bha po. zala. Changala ahe !
ghara kharach putthyachee ahet, amhee ek bhint fodlee already :)
अनामित म्हणाले…
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
Photographer Pappu!!! म्हणाले…
हो खरडलेल नक्कीच आवडले. थोड्याफार फरकाने भारतापासून दूर राहणार्‍या प्रत्येकाची थोड्याफार फरकाने हीच अवस्था असते. मलाही परतायचाय, पण कधी परत्ायला भेटेल याची काही शाश्वती नाहीय. कंपनी म्हणतेय तिथेच राहा अजुन काही वर्षे. बहुतेक एखाद्या प्रॉजेक्ट ची वाट लावल्याशिवाय ते परत बोलावनार नाहीत :)
सर्किट म्हणाले…
ekdum bha.po. barr ka!

amachya kade pan ha dwayalog chalu asato dar ek diD mahinyanni.

ata matr bayko la lavkar indya la trip sathi pathavalach pahije, itaka gaLyashi alaye ticha homesickness!

bhinti putthyachya! - kharaye! :)

YD, bhinta phoDalis? tu mahan ahes! ata dusaryanchya blog var pan tula saa.na. ghalat java lagel ki kay? :-p
Dk म्हणाले…
Hmmm awadly!! I miss indya :D :P hahaha bhags, baaki Rkutawar je photu taaketes na te jyaam sahiiCH astaat bar ka :)

***
Asmadik hi mubaikar te>> punekar asa prawas karnaareT! Job saathee!! lihin mhnto anubhav PUNEREE maansaanche!
Sweety म्हणाले…
hey,thats called DEshprem!!!!!! mastch,Come soon!!!! Miss u!!!!!
अनामित म्हणाले…
स्वतः बोलताहात असं वाटलं लेख वाचल्यावर. जास्त काय लिहु? हृदयस्पर्शी झालाय लेख...
Unknown म्हणाले…
khup vaitagleli disates. pan thik aahe,tyasathi thoda vel javach laganar aahe

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..