पोस्ट्स

2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? :D) बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा.. :)) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे! :) ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड! ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं.. :))) तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं...

लॉंग ड्राईव्ह.. !

इमेज
काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!! असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला.. लॉंग ड्राईव्ह.. ! आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रकार! तशी मला फिरायची आवड आहेच. पण नवर्‍याला फिरायचे वेड आहे! आणि त्यासाठी लागणारे कष्ट उपसायची तयारी! कुठल्याही वेडयावाकड्या रस्त्यातून, कुठल्याही अडनिड्या वेळी तासन तास ड्राईव्हींग करायची त्याची तयारी असते, म्हणूनच आम्ही इतके फिरू शकतो.. कारण माझ्या हातात जर व्हील असते, तर मी कधीच अशा रस्त्यांना लागले नसते! काहीही कारण नसताना, विकेंड नसताना, केवळ हुक्की आली म्हणून ड्राईव्हला बाहेर पडणे आणि २-३ तासांनी परत येणे हे नेहेमीचेच.. नशीबाने राहतोय सुद्धा सुंदर जागी.. जिथून समुद्र १० मिनिटांवर, डोंगररांगा १५ मिन्टांवर...

ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

इमेज
"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:.. "अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा "हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :(" "ह्म्म.." "ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...." "असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) " "हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त द...
गेले काही महीने मस्त गेले.. नवर्‍याने बरीच पुस्तकं आणली भारतातून.. ती वाचण्यात मस्त वेळ गेला. मुक्काम-गौरी देशपांडे, इजिप्तायन,मेक्सिकोपर्व - डॉ. मीना प्रभु, माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग, हसरे दुख्ख - भा.द. खेर (मागे एकदा चार्ली चॅप्लिनचे पुस्तक वाचल्यावर पोस्ट लिहीली होती, तेव्हा खूप जणांनी याचे नाव घेतले होते.. आवडले..पण बेस्ट नाही वाटले! अनुवाद आहे कळते,काही भाग इतका विनोदी पद्धतीने उरकला आहे! असो..) त्यानंतर वाचले वपुंचे एक पुस्तक-नाही आवडले विशेष, मला त्यांचे महोत्सव आवडलंय तितकं बाकीचे नाही आवडणार बहुतेक.. पुलंची ऑल टाईम फेव पुस्तकं वाचून झाली, आता गाडी वळाली पानिपत !  ऐतिहासिक पुस्तकं/कादंबर्‍या वाचण्याविषयी माझं जरा त्रांगडं झालंय ! मी सिरीअसली वाचायची सुरवात केली ’श्रीमान योगी’ पासून.. अज्जुन आठवतंय मला! बाबा तेव्हा सोलापुरला होते. त्यांच्या ऑफीसच्या गेस्टहाऊस मधे आम्ही राहायचो जेव्हा जायचो तेव्हा.. मला माहीतीय जागांची वर्णनं असं लिखीत स्वरूपात वाचणे फार त्रासदायक आहे! पण मी लिहीणार ! :) मी ते कधीही विसरणार नाही, तरी मला ते परत परत सांगायला, लिहायला आवडते.. :...

माझी भटकंती - सोल्वॅंग - California's Little Denmark !

इमेज
कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स.. जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields ! From Cachuma Lake, Solvang 1 लगेचच कोपेनहेगन ड्राईव्ह आला. आणि एक वेगळीच सिटी सामोरी आली ! From Cachuma Lake, Solvang 1 From Cachuma Lake, Solvang 1 १९११ साली काही डॅनिश शिक्षक मंडळी या गावात आली व त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केली. (ती काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती.. तिथे १९१४ साली Atterdag College सुरू झाले, जे आता अस्तित्वात नाही.. ) या डॅनिश मंडळींबरोबर त्यांची संस्कृतीही आलीच.. ती त्यांनी जोपासली.. १९३६ साली , सोल्वॅंगच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, डॅनिश डेज या त्यांच्या सणा दरम्यान भावी डॅनिश राजा-राणी भेट देऊन गेले.. पण त्याला खरे व्यावसायिक रूप आले जेव्हा Saturday Evening Postने त्याच्यावर एक पोस्ट लिहीले.. त्यानंतर प्रवासी आले, तो भाग अजुन जास्त डॅनिश बनवला गेला, इमारतींना डॅनिश मुलामा दिला.. डॅनिश व्यापारी येऊन आपले चीझ, वाईन्स, कॉफी विकू लागले.. अप्रतिम बेकर...

Gone too soon..

Like a comet Blazing 'cross the evening sky Gone too soon Like a rainbow Fading in the twinkling of an eye Gone too soon Shiny and sparkly And splendidly bright Here one day Gone one night Like the loss of sunlight On a cloudy afternoon Gone too soon Like a castle Built upon a sandy beach Gone too soon Like a perfect flower That is just beyond your reach Gone too soon Born to amuse, to inspire, to delight Here one day Gone one night Like a sunset Dying with the rising of the moon Gone too soon Gone too soon -Michael Jackson

माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )

इमेज
’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे.. :) ) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले.. सोल्वॅंग .. ( Solvang - Danish word meaning ' sunny field' ) ठिकाण ठरलं.. भल्या पहाटे उठल्यामुळे दुपारचे १२च वाजले होते! आवरून, ब्रेकफास्ट(!) करून निघायला २ वाजलेच असते... पटकन खाणं आटोपले आणि आवरून २.१५ ला घराबाहेर पडलो.. तसा उशीरच म्हणायचा! पण उन्हाळ्याची हीच तर मजा ना? पण जसे वाटले तसे घडले तर ट्रीप कसली?? अंहं, काहीही अनुचित प्रकार नाही झाला! फक्त अस्मादिकांच्या अहोंनी सर्प्राईज द्यायचे ठरवले! गाडी सॅन्ता बार्बराच्या रस्त्याला, इथली लाईफलाईन असलेल्या १०१ फ्रीवेला लागल्यावर त्याने सांगितले की आपण आधी एका लेक - तळ्यापाशी जाणार आहोत ! मग काय,...

सूर्य-ढगांची लपाछपी

इमेज
आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला! आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :( सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :) (हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( ) बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा! किती उच्च कॅमेर्‍याने फोटो काढले की तो...