लायब्ररी !!
फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम वर तर, काहीच वाचावसं सापडत नाही आजकाल! म्हणजे वाचणेबल असतं बरच काय काय.. पण बहुधा मला नेट वर वाचायचा कंटाळा आलाय.. शेवटी नवर्याला लायब्ररीमधे घेऊन जाण्याचा तगादा लावला.. ( काय ना.. ड्रायव्हींग येत नसेल तर अमेरीकेत अगदी भजं होऊन जातं तुमचं!! :( माझी स्कुटी पाहीजे होती इथे... :D)
एकदाचं लायब्ररी मधे आलो !! काय सुंदर आणि प्रचंड आहे इथली लायब्ररी.. ऐकुन होतेच पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं.. कार्ड घेण्यासाठी रांगेत उभी राहीले, तर १ मिनिटार सगळी प्रोसिजर खतम..! कार्ड हातात, आणि अन्लिमिटेड पुस्तकं , ३ आठवड्यांसाठी... wow !! घाईने पुस्तकांच्या सेक्शन मधे गेले, आणि लिटरली वेड लागलं.. आख्खा मजला भरून फक्त fiction.. त्याच्या वरच्या मजल्यावर non-fiction आणि reference books..अधे मधे बसायला टेबलं होतीच.. बाकी सगळ्या सुविधा होत्याच.. पण मला आवडलं ते पुस्तकांचे कलेक्शन आणि लायब्ररीचं इंटेरियर ! काय अफलातून होतं ते.. दिवसच्या दिवस तिथे बसून , कॉफी पीत पुस्तक वाचत बसावं...
अधाशासारखी पुस्तकं घ्यायला गेले.. पण असल्या अजस्त्र कलेक्शन मधून काय घ्याव न काय नको होत होतं.. पुस्तकांची लिस्ट असायला हवी होती बरोबर... त्यामुळे डॅन ब्राऊन चे angels and demons आणि Da vinci code ची special illustrated edition आणि अशीच आधीच वाचलेली अजून २-४ पुस्तकं घेऊन आले.. आता काही दिवस तरी वेळ कसा घालवावा हा प्रश्न नाही!! (नवर्याला तर हसूच येत होतं माझा उत्साह पाहून॥)
पण एक प्रश्न पडलाय.. चांगल्या पुस्तकांची यादी कुठे मिळेल मला? कोणी सजेस्ट करू शकाल का, कुठली पुस्तकं वाचू? इथे कमेंट्स मधे प्लिज तुमची आवडती पुस्तकं लिहा.. इंग्लिशच.. :( इथे मराठी नाही मिळत.. thanks in advance!

टिप्पण्या
की इतर चालेल?
मी मधे नाओमी चं 'नो लोगो' वाचलं अमेरिकन कॉर्पोरेटस् विषयी एक वेगळा विचार प्रवाह.
चांगलं आहे.
-निनाद
http://www.librarything.com/catalog/rajkashana
3 good books 4U...
POWERSHIFT
THIRDWAVE
FUTURESHOCK
all by Alvin Toffler.
My all time favorites
Fiction - Illusions - Richard Bach, Old Man and the Sea - Ernest Hemingway. Bird and Other Short Stories - Daphne Du Maurier.
Non Fiction(Memoirs)- Wild Grass: Three Portraits of Change in Modern China- Ian Johnson, Oracle Bones - Peter Hessler, River Town: Two Years on the Yangtze - Peter Hessler, Mr. China - Tim Clissold, Riding the Iron Rooster - Paul Theroux.
Happy Reading
2. Shantaram
3. The reluctant Funadamentalist
4. Catcher in the Rye
5. Old man and the Sea
6. The Alchemist
Hee ankhi kahi "Must reads" :)
Agadi utkrushta pustaka vachayachi asateel tar Modern Library ne 20vya shatakateel sarvotkrushta 100 pustakanchi yadi tayar keli aahe. Tee ya duvyavar pahta yeil -
http://www.randomhouse.com/modernlibrary/100bestnovels.html
Shivay rajendra ne suchavalelya Librarything.com sarakhech Shelfari.com hehi ek uttam sanketsthal aahe. Tikade hi baryach changalya pustakanchi yadi miLu shakel.
Tumachya vaachanat ekhade changale pustak aale, tar blog var tyabaddal nakki liha. Vachayala aavadel.
Books by Ayn Rand :
The fountainHead
Atlas Shrugged
Books by Richard Bach :
Illusions
Jonathan Livingsten Seagull
Book by Robert M Pirsig :
Zen & the art of motorcycle Maintenance
Sanjeev
To Kill a Mockingbird
The Alchemist
Papillon by Henri Charrière
Not without my daughter
etc...
athavalyanantar anakhi suchavil, nakki!