books
टिना फे चे बॉसीपँट्स वाचून झाले. अशक्य करमणूक आहे. मी खूप दिवसांनी पुस्तक वाचताना मोठ्यांदा हसले. पण तरी साधारण पाऊण पुस्तक झाल्यावर किंचित बोर झाले. बहुतेक पुस्तकाचा फॉर्मॅट तसा आहे. फार काही नीट चरित्रासारखा लहानपण म्ग नोकरी असा ग्राफ नाहीये. नक्की नाही माहित पण नंतर जरा अनॉय्ड झाले की काय पॉईंट आहे नक्की.. पण ते सोडल्यास प्युअर धमाल! मी फारसा टीव्ही पाहात नसल्याने मला टिना फे केवळ नावानेच माहित होती. आणि ओझरते ऐकले होते की तिने सेरा पेलिनची नक्कल असलेले स्किट केले होते वगैरे. ते सर्व भाग वाचायला, रायटर लोकांचं रूटीन कसं असतं, सॅटर्डे नाईट लाइव्ह, ३० रॉक वगैरे शोजबद्दल माहिती/गॉसिप असे वाचायला छान वाटले. मी आता ३० रॉक बघायला सुरवात केली आहे. दुसरे चिंगुले पुस्तक संपवले ते म्हणजे 'माय साईनफिल्ड यिअर' बाय फ्रेड स्टोलर. पुस्तकाची सुरवात अशी आहे की कोण हा फ्रेड स्टोलर. तर तो असा माणूस आहे की तुम्ही त्याला नावाने ओळखायचा नाहीत पण फोटो पाहिला तर चेहरा खूप ओळखीचा वाटेल पण तरीही तो कोण हे नक्की सांगता येणार नाही! हे वर्णन वाचून माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला आणि गुगल केले तर तो...