Into the wild (चित्रपट)
Into the wild खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव. रूतून बसले होते अगदी. इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात. नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही. एक दुपार सापडली. सापडली म्हणजे शोधत नव्हतेच तिला. त्या दुपारच्या निवांत वेळेने मला गाठले. अन कोणत्यातरी अनामिक ओढीने मी इनटू द वाईल्ड सुरू केला. लॉर्ड बायरनचे शब्द स्क्रीनवर आले, अन अक्षरशः पॉझ करून बसले एक मिनिट. परत एकदा वाचले नीट, मोठ्यांदा उच्चारले ते शब्द.. There is a pleasure in the pathless woods, There is a rapture on the lonely shore, There is society, where none intrudes, By the deep sea, and music in its roar: I love not man the less, but Nature more. आणि सुरू झाला प्रवास, I...