मैत्रीणवर (www.maitrin.com) जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले( थँक्स लोला!), तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते! तुम्ही विचार करत असाल, अरे बापरे, ही रोज चित्रं रंगवणार व इथे चिकटवणार की काय.. तर कदाचित हो. झालंय असं. मला हातात चिक्कार वेळ मिळतो. परंतू अलिकडे माझ्या लक्षात आले होते की मी बराच वेळ वायाच घालवत आहे. http://maitrin.com/node/288 हा लेख ह्या सगळ्यावरूनच सुचला होता. भरपूर वेळ, भरपूर रिसोर्सेस हाताशी आहेत, पण काहीच भरीव होत नाहीये आयुष्यात असं चित्र दिसू लागले होते. ( म्हणून चित्रांमध्ये रंग भरू लागले! ) मी किती संकल्प ठरवून एकदाही पाळले नाहीयेत गेल्या वर्षभरात, हे आठवले की चिंताग्रस्त होत होत. (अजु...