पोस्ट्स

मार्च, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Veggie Soup

इमेज
लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: २ टोमॅटो २ गाजरं ५-७ पालकाची पानं ४-५ bok choy ची पानं ५-७ Romain व Iceberg Lettuce ची पानं २-३ Red Cabbage/ Chicory ची पानं अर्धी ढब्बू मिरची १ मध्यम कांदा ४ लसणाच्या पाकळ्या मीरपूड थोडी कोथिंबीर मीठ (असल्यास) गार्लिक बटर. [ हे न वापरल्यास ही रेस्पी व्हीगन होईल.]  क्रमवार पाककृती: छोट्या कुकरमध्ये वरील सर्व भाज्या/ग्रीन्स (कांदा वगळून) व मीठ घालून २ शिट्ट्या काढाव्यात. [ भाज्या फार गाळ करायच्या नाही आहेत. माझा कुकर छोटा आणि जरा बिघडलेला आहे, सारख्या शिट्ट्या करतो. मोठा कुकर वापरला तर कदाचित एकच शिट्टी व प्रेशर बास होईल.] तोवर कांदा जरा मोठा कापून घेणे. गॅसवर भांड्यात गार्लिक बटर घालून कांदा मोठ्या फ्लेमवर परतून घेणे व अर्धाकच्चा शिजवणे. त्यातच कोथिंबीर घालून परतणे. व कुकरमधील शिजवलेल्या भाज्या - त्यातल्या पाण्यासकट घालून गरम करणे.  व्हेजी सूप तयार!   वाढणी/प्रमाण: दोन जणांना दोन सर्वींग्ज माहितीचा स्रोत: मीच.

"Flight" - Amazing movie!

इमेज
परवा डेंझेल वॉशिंग्टनचा ’फ्लाईट’ पाहीला.आजकाल मी मुव्हीज पाहणे अगदी कमी केले आहे. मुद्दाम नाही. पण इतक्या वेळ ताटकळत बसणे अगदी बोर होते. पण नवर्‍याने हा मुव्ही लावला अन १५ मिनिटातच मी हातातला लॅपटॉप बाजूला ठेऊन मुव्ही बघितला. पूर्ण! मला मुळातच डेंझेल वॉशिंग्टन हा अभिनेता आवडतो. आवडतो म्हणजे हृथिक रोशनसारखा नाही. की सगळे झाडून त्याचे मुव्हीज बघणार म्हणजे बघणार. मला खरंतर दुसरा कुठला मुव्ही आठवत पण नाही, डेंझेल वॉशिंग्टनचा. परंतू त्याचे जे मुव्हीज पाहीले आहेत ते आवडले आहेत. खूप संयत, सुंदर ॲक्टींग करतो तो.. मी जेव्हा बघायला लागले तेव्हा एक कळले की यात त्याने काम केले ’व्हिप’ नावाच्या पायलटची. तो विमानात जातो आणि चक्क दारू पितो! नंतर फ्लाईट अटेंडंटला ॲस्पिरीनच्या गोळ्या वगैरे मागतो. आणि .. झोपून जातो. :। त्याचा कोपायलट आपला डोळे फिरवतो व विमान चालवायच्या कामाला लागतो. भरपूर पाऊस असतो, व अतिशय वाईट हवामान. प्रत्येक हॉलिवूडपटात होते तेच इथेही होते. संकट येते. अचानक विमानातील काही कंट्रोल्स काम करेनासे होतात. व क्षणार्धात विमानाला मोठा जर्क बसतो. झोपलेला व्हिप जागा होतो, आणि एका सेकं...