माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)
मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! :) ४ जुलैचा लाँग विकेंड जवळ येऊ लागला तसे वेगवेगळे बेत शिजू लागले. फिरून फिरून गाडी सारखी योसेमिटीलाच येऊन थांबत होती. आतापर्यंत किमान ३ वेळा प्लॅन ठरून हॉटेल बुकींग न मिळाल्याने फसला होता. यावेळेसही एकदा आधीचे बुकिंग कॅन्सल होऊन दुसरीकडे मिळाले व एकदाचे आम्ही योसेमिटीला जाणार हे निश्चित झाले. आम्ही ३ ला संध्याकाळीच लॉस एंजिलीसवरून निघालो बे एरियात जायला. तिथे माझा भाऊ राहतो व सध्या तिकडे आई बाबा आहेत. त्यामुळे तिकडूनच सगळे एकत्र योसेमिटीला जाणार होतो. ३जुलैला संध्याकाळी पावणे सातला निघालो खरं पण ८ पर्यंत घरापासून ५ मैलसुद्धा गेलो नव्हतो! इतकी गर्दी!! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! बरोबर मुलं असली की किमान डायपर ब्रेक्स धरावेच लागतात. आम्ही पोचलो भावाकडे पहाटे साडेतीनला! :| माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! :) ४ तारखेला Milpitas मधील Dosa Bawarchi ला गेलो. काय अफाट सुंदर जेवण मिळाले तिथे. एकतर इतकं चकाचक व मोठं इंडीयन रेस्टॉरंट पाहूनच...