माझी भटकंती - सोल्वॅंग - California's Little Denmark !
कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स.. जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields ! From Cachuma Lake, Solvang 1 लगेचच कोपेनहेगन ड्राईव्ह आला. आणि एक वेगळीच सिटी सामोरी आली ! From Cachuma Lake, Solvang 1 From Cachuma Lake, Solvang 1 १९११ साली काही डॅनिश शिक्षक मंडळी या गावात आली व त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केली. (ती काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती.. तिथे १९१४ साली Atterdag College सुरू झाले, जे आता अस्तित्वात नाही.. ) या डॅनिश मंडळींबरोबर त्यांची संस्कृतीही आलीच.. ती त्यांनी जोपासली.. १९३६ साली , सोल्वॅंगच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, डॅनिश डेज या त्यांच्या सणा दरम्यान भावी डॅनिश राजा-राणी भेट देऊन गेले.. पण त्याला खरे व्यावसायिक रूप आले जेव्हा Saturday Evening Postने त्याच्यावर एक पोस्ट लिहीले.. त्यानंतर प्रवासी आले, तो भाग अजुन जास्त डॅनिश बनवला गेला, इमारतींना डॅनिश मुलामा दिला.. डॅनिश व्यापारी येऊन आपले चीझ, वाईन्स, कॉफी विकू लागले.. अप्रतिम बेकर...