द हॅपनिंग...
मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता.. परवा रात्री पाहीला.. काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला.... SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल.. काहीएक माहीत नसताना हा पिक्चर बघण्यात कदाचित जास्त मजा(भिती?) आहे !) सुरवात सेंट्रल पार्क न्युयॉर्क.. रोजचीच सकाळ, लोकांचे नेहेमीचे रूटीन.. कोणी फिरायला आलेय, कोणी वाचत बसलेय.. पण अचानक लोकं डिसओरिएंटेड होतात.. पहील्यांदा असंबद्ध बडबड, कुठेतरी हरवलेली नजर.. मग पूर्णपणे सगळं जनजीवन ठप्प होऊन थांबते.. सगळे स्तब्ध.. आणि मग सिरिज ऑफ सुसायडल इव्हेंट्स.. सगळी लोकं, त्यांना जो जवळचा मरायचा मार्ग असेल तो स्विकारून मरतात... म्हणजे... पिक्चरमधे दाखवलेली क्लेअर.. केसांची पीन मा...