डबा ऐसपैस !!
आज एक मजाच सापडली!!! पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. ! हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy .. म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :) चला बर्याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :) ( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :))