चिल्ड्रेन ऑफ हेवन...!


काल चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहीला.. खूप ऐकलं होतं, आणि खूप दिवसांपासून पाहायचा होता.. फार आवडला मुव्ही.. स्टोरी काय माहीतीच असेल सगळ्यांना, आणि मला परीक्षणं लिहीता येत नाहीत.. म्हणून फार नाही लिहीत.. पण मनात आलं ते उतरवतीय..

सारखे हॉलीवूड आणि बॉलीवूडपट पाहून डोळ्यांना त्या चकचकाटाची, हाणामारीची, गाणी, फालतू आयटेम साँग्स, कसली ना कसली तरी कटं-कारस्थानं, यांची इतकी सवय झाली होती, की हा पिक्चर पाहताना इतकं शांत आणि वेगळं वाटलं.. साधी पण सुंदर कथा.. साधं चित्रीकरण, साध्या लोकेशन्स..फार बरं वाटलं असं पाहून.. (सुरवातीला ते मीठ विकणार्या माणसाचं ओरडणं ऐकून तर भारतात पोचले मी!) .. इराण मधलं वातावरण, तिथले लोकांचे दारीद्र्य, झारा आणि अली इतके लहान असून त्यांचे घरकामात आई बाबांना मदत करणं.. झारा तर केव्हढीश्शी आहे! पण एक शाळा झाली की कुठे भांडी घास, नाहीतर लहान भावाला(बहीणीला) सांभाळ अशी कामं करत राहते..(झाराच्या डोक्यावर हिजाब पाहून तर कसंतरीच वाटलं.. कसं आयुष्य असेल ना तिथे मुलींचं??) ते बुट हरवणं,दोघांनी मग अलीचे बुट शेअर करणं,ती पळापळ, पैसे नसल्यामुळे बाबांना कळू नये म्हणूनची धडपड..तो समजुतदार पणा.. शेवटी बुटांसाठी त्या स्पर्धेत ३रा येण्याची अलीची धडपड, आणि एवढं करून तो पहीला आल्यामुळे रडवेला झालेला तो.. सगळं अंगावर आलं!!

खूप आवडला.. पण शेवट जरा उदासच वाटला.. म्हणजे झारा-अलीचे बाबा ते पांढरे बुट घेतात असं दाखवलंय.. म्हणजे बुट तर मिळतात, पण त्यासाठी अलीने केलेली धड्पड वाया गेली असं वाटतं.. तो पहीला आल्याचा आनंद तर नाहीच होत.. पण एकुणात सुंदर घेतलाय पिक्चर.. बराच आटोपशीर आहे.. गरज नसलेले सीन्स नाही आहेत.. उगीच लांबवला नाहीय, म्हणूनच जास्त परीणामकारक वाटला.. सगळ्यात आवडलं ते म्हणजे कास्ट! अली खूप इनोसंट आणि गोड घेतलाय.. त्याचे डोळे फार बोलके आहेत.. फार क्युट आहेत अली-झारा..( त्या दोघांचा आवाज पण गोड आहे!) मला अली-झारा चे बाबा पण आवडले.. दारीद्र्य, कुटुंब चालवण्यासाठी ते करत असलेले कष्ट, बायकोबद्दलचे प्रेम, सगळं इतकं छान दाखवलंय ना त्यांनी, आणि तेही कमी प्रसंगातुन.. फार आवडला तो ऍक्टर.. घरात चहासाठी साखर नसताना, मशीदीमधे चहा करत असताना त्यांना फुटलेलं रडू, आपल्या पण डोळ्यात पाणी आणतं.. गार्डनर म्हणून श्रीमंत वस्तीमधे जाऊन काम करताना त्यांच बावचळणं,काय बोलावं ते न सुचणं.. मस्तच घेतलयं!

काय काय इथे लिहून ठेवणार.. सगळाच पिक्चर लिहावा लागेल.. पण आता माजिद माजिदीचे सगळे पिक्चर पाहणं आलं.. त्याशिवाय बरंच नाही वाटणार! बरान का काहीतरी आहे ना? अजुन कोणते आहेत ते शोधायला लागावं आता...
Signature2

टिप्पण्या

केदार जठार म्हणाले…
Thanks... watching children of heaven added to my to-do list
saanasi म्हणाले…
मी हा चित्रपट बघितला आहे. तुमच्या या सुंदर लेखामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.

धन्यवाद!!
Unknown म्हणाले…
thanks kedar and deepa.. :)
अनामित म्हणाले…
you have written very good परीक्षणं.

simple and sweet ..just like a movie.

do you have its online link?
where can I see it ?
Dhananjay म्हणाले…
http://www.imdb.com/title/tt0191043/

searching for this one, not getting :(. This is also a masterpiece by majidi.
Bhitri Bhagu म्हणाले…
Khup chan lihilay parikshan.
Aata pahaylach hava Children of heaven.
Bhagyashree म्हणाले…
hi mangesh, you can watch it here..

http://video.google.com/videosearch?q=children+of+heaven&sitesearch=

this is part 1, part 2 you can get in related videos..

hey dhananjay.. i could not find the rang e khoda on google video. if i get it, ill post the link here.. thanks..
thanks bhitri bhagu! :)
Bhagyashree म्हणाले…
The Color of Paradise :

http://www.youtube.com/watch?v=iN1SDtQ3ucc
Jaswandi म्हणाले…
mastch!

baran hi chhan cinema ahe, tohi awadel tula! baran you tubewar parts madhe ahe!
यशोधरा म्हणाले…
aaj ithe aale :) kaay masta parikshan lihila aahes! aataa haa chitrapat paahen mee, tujh parikshan vaachuun :)
अनामित म्हणाले…
भाग्यश्री
मी तुजे पोस्ट अगोदरच वाचले होते आणि नंतर "Children of Heaven" baghitalaa :) .. त्यामुळे thanx. बालकलाकारांना घेउन बनाविलेला आणखी एक छान movie म्हणजे "Machuka". कथा अगदी वेगळी पण तो सुद्धा छान.
निनाद म्हणाले…
वा छान लिहिले आहे!
आता हा सिनेमा पहावाच लागेल असे दिसते
:)
-निनाद
Unknown म्हणाले…
कमेंट्स बद्दल थँक्स जास्वंदी,यशो,नाईल आणि निनाद.. :)
Amol म्हणाले…
छान परिक्षण आहे. मला ही आवडला होता हा. मला शेवट सुखांत वाटला ते बूट दाखवल्याने. त्यानंतर 'बरन' ही पाहिला. तो ही छान आहे (त्याच दिग्दर्शकाचा) - तो ही बघ जमलं तर.
Unknown म्हणाले…
बरन आणि अजुन जे मिळतील माजिद माजिदीचे ते नक्कीच पाहणारे...
अनामित म्हणाले…
bhagyashree,

Tuzya (ki tumchya?) pahilya blog likhanatali khant ki 'he mi lihilela nidan don manase tari wachtil, mi ani maazi bahin' wachali ani lihawas watle ki chala tisra mi asen. Sahaj surfing karta karta tuza blog wachala ani reply karayache tharawale. Rastyat garditun chaltana ekhada chehara ugichach 'link' zalyasarakha watato ani dusrya kshani adrushyahi houn jato. Tashach ya bheti nahi ka? Nahi tar tu tithe sata samudra paar ani mi ithe bhartat.
Thode confusion. Kadhi durchi manse jawal yetat kadhi jawalchi manse achanak dur jatat? sagalach kshanik nahi ka?
Asa wichar karat asatana watla duniya tashi chhoti ahe ani mukhya mhanje ti gol ahe. Tevha manse garditahi punha bhetu shakatat fakt mani ichha and najar shodhak hawi. Aani kay Aschharya bagh tuze pudhachech block wachatana tu lihilela 'Children of Heaven' warche likhaan wachale. Yogayog asa ki Kalach mi ya movie chya CD sathi ithli sarva dukane palthi ghatli. Pan hi CD mumbait available nahi. Mazya 3.5 warshachya lekila mi ya picturechi story sangitali. Ti hi story at: pasun iti: paryant vyawasthit sangate. Tichya sathi hi CD mi shodhatoy.

Mi suddha khup kahi kharadatoy ka?
He ase blog wachane comments lihine pahilyandach kartoy. Children of Heaven chya yogayoga mule he itka lihile. Punha ya blogwar kase yayach mahit nahi. Jamlyas mazya email id war kalaw.
datta.m@rediffmail.com
NAHICH TAR YA BLOGCHYA GARDIT HARAWUN JAU. HI 'NET' CHI DUNIYA GOL AHE KA?

datta
Unknown म्हणाले…
dhanyavad datta/anonymous.
movie nakki paha..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives