मुख्य सामग्रीवर वगळा

कंटाळा..

मी आत्तापर्यंत खूप वेळा दुपारी एकटी राहलीय घरात.. एस्पेशिअली दादा अमेरीकेला गेल्यावर जास्तच.. आधी आमचा धिंगाणा चालायचा दुपारी,आई-बाबा ऑफीसमधून येईपर्यंत .. नंतर मी आणि आज्जीच... मला आठवतंय तेव्हापासून, साधाराण आमच्या शाळा सुरू झाल्यापासून आज्जी दुपारी एकटीच असायची घरी.. बरीच वर्ष कान-डोळे ठीक असे पर्यंत आज्जी टीव्ही पाहायची, रेडीओ ऐकायची.. काही बाही वाचत बसायची सतत.. अभंग, भजनं वगैरे.. नाहीतर शिवणकाम असायचंच.. नंतर मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले, कानही जरा दगा द्यायला लागले तसे आज्जीनी टीव्ही,रेडीओ बंद केले.. वाचनही कमी केलं.. ह्म्म, स्वयंपाक मात्र कायम असायचाच .. अजुनही आज्जी स्वयंपाक करायच्या उत्साहात असतेच, पण आता मात्र बर्‍याच गडबडी होतात दिसत नसल्यामुळे.. असो.. तर सांगायचा मुद्दा हा, की ती सतत एकटी असते , निदान दुपारी.. तरी एकदादेखील कंटाळली नाही.. सतत काहीतरी चालू असते तिचं.. मी तिथे होते तेव्हा आमच्या गप्पा चालायच्या बर्याच.. दुपारचा चहा पिताना ती मला माहीत असलेल्या/नसलेल्या गोष्टी सांगायची.. कित्येकदा इतक्या जुन्या गोष्टी, की मला संदर्भच लागायचे नाहीत.. पण तेव्हा वेळ छान जायचा...

आता दुपारी ती तिथे एकटी असते , न मी इथे एकटी असते... पण मला खात्री आहे,की ती काहीतरी काम काढून व्यस्त राहात असेल.. मी मात्र इथे कंप्युटर समोर बसून काहीतरी कारण शोधते बिझी राहण्याचं.. पण कंटाळते.. आज्जीसारखी सतत कामात राहायची आवड नाही.. or mayb सवय नाही...(केली पाहीजे आता!)मला कमाल वाटते त्या पिढीतल्या लोकांची... माझे maternal आजोबा देखील एकटे राहात होते शेवटचे ४-५ वर्ष.. ऐकू जवळपास यायचे नाही, त्यामुळे लोकांशी गप्पा वगैरे जवळपास नाहीतच.. पण किती आनंदी,आणि बिझी असायचे.. क्रिकेट म्हणजे त्यांचा जिव की प्राण.. match असली की आजोबा जाम खूष.. मग आपण जिंकलो की मस्त पार्टी करणार... एकंदरीत समाधानात राहणार..
हे जमणं किती अवघड आहे ते कळतंय आता... मला माहीती आहे की आज ना उद्या मला काम असणारे.. खूप बिझी रुटिन होईल माझं... नवीन गोष्टी शिकायला आहेत.. स्वयंपाकघर तर प्रयोगशाळाच आहे.. कितीही प्रयोग केले तरी न पुरणारे आहेत.. कंप्युटर,एखादं छान पुस्तक वाचायला डोळे शाबूत आहेत.. मग हा कंटाळा का येतो? किंवा मी येऊ देते त्याला.. थोडतरी आज्जी-आजोबा किंवा आईबाबां सारखा होता आलं तर किती बरं होईल...!!
Signature2

टिप्पण्या

Bhagyashree म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Unknown म्हणाले…
Really nice Swapnil,I can`t believe that u r such a brillient writer!
best of luck for ur prosporous future.
प्रशांत म्हणाले…
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये खरंच खूप उत्साह असायचा. आज आपण स्वतःला प्रगत समजतो, पण लहान-सहान गोष्टींमध्येही आनंद असतो हे आपण हळूहळू विसरत चाललो आहोत व त्याचाच परिणाम म्हणजे कंटाळा.
लेख मस्त जमलाय. आणि तुमचा ब्लॉगही सुरेख आहे.
Sarika Kamat म्हणाले…
I agree.. tu khoop chaan lihites. Keep it going.
Unknown म्हणाले…
Masssta lihilay..wow !
"ata aajji dupari tikade ekti aste ani mi ithey..." hey vachun pani ala dolyat..kharach..maza pan excatly same zala hota ...
To make things worse jevha ithye dupar aste tevha tithey ratra..phone pan nahi karta yet.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??