"काय करतेस दिवसभर??"
हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्राण्याकडे पाहावं तसेच पाहतात.. नाही तसे मी बाकीचेही उद्द्योग करते, नोकरीचे अर्ज करते, थोडा जमला तर अभ्यास करते, अधुन-मधुन कुठल्यातरी कंपनीच्या परीक्षा देऊन येते, पण माझा बराचसा वेळ हा वाचनातच जातो. प्रत्यक्ष library मधून पुस्तके आणून वाचणे यात जी मजा आहे ती बाकी कशात नसली तरी, internet मुळे अनेक इतर गोष्टींकडे लक्ष गेले, जे मी कधी स्वतःहुन वाचले नसते. उदा. मायबोली, मनोगत सारख्या साईट्स.. ज्यांच्यामुळे मी मराठी कविता वाचायला लागले. (आणि त्या कळायलाही लागल्या.. :)) माझी आई जरी कविता करत असली तरी दुर्दैवानी (आणि तुमच्या सुदैवानी) ती देणगी माझ्याकडे नाही. त्यामुळे फक्त वाचनावरच आनंद मानायचा.. मायबोली मी मुख्यतः कथा-कविता-विनोद-विडंबन ई. साठी वाचते. फारच उत्कृष्ठ दर्जाचे साहीत्य आहे तिथे. अनेक दर्जेदार कवी, कवयित्री,photographer,चित्रकार आहेत तिथे! मायबोलीचा उपयोग मी कविता लिहीण्यात जरी केला नसला तरी मी चित्रे काढू लागले.. गझल कशाशी खातात ते मला कळू लागले.. (आणि आता तर गझलेची कार्यशाळा सुरू झाल्यापसून ते आपल्या बसची बात नाही हेही कळाले!) खरच मायबोली वर जाऊन आले की असे वाटते आपण किती दरिद्री आहोत! काही म्हणून प्रतिभा नाही... हा एक ब्लॉग काढुन महीना झाला तरी काय लिहावं कळत नव्हतं.. आणि या लोकांना इतक्या चांगल्या कल्पना सुचतात कशा, आणि ते त्यांना शब्दांत बांधतात कसे, हे माझ्यासाठी कोडंच आहे! पण ठीके.. आपल्याला निदान वाचता येते याचा आनंद होतो अशावेळी. मनोगत देखील अशीच एक साईट.. पण ती आता पूर्वीसारखी नाही राहीली.. सुदैवानी मायबोली अजूनही तशीच दर्जेदार आहे. (हे माझे मत.. अनेकांना मनोगत अधिक चांगली वाटू शकते.) मराठीब्लॉग्सनी तर खजिनाच उघडला माझ्यासाठी.. इऽऽतके (मराठी) ब्लॉग्स.. आणि काही काही लोकांचे ब्लॉग्स असेच सुंदर.. कुणाकुणाचे नाव घ्यायचे! पण तरीही.. ट्युलीप च्या ब्लॉगनी मलाही ब्लॉग सुरू करावा अशी ईच्छा झाली. इतके सहज आणि सोप्पे असतं होय ब्लॉगींग.. मग काय अवघड आहे! ( पण आता कळतय सहज आणि सोप्प लिहीणेच सगळ्यात अवघड आहे!) आपल्या आयुष्यातले काही प्रसंग इथे share करणे वाटत तितकं सोप्प नाहीय. पण लिहायची इच्छा निर्माण झाली हे मात्र खरं...
या बेकारीच्या दिवसांत(जे अजून चालूच आहेत!) अक्षरशः पुस्तकांचा फडशा पाडला.. (मी वाचलेली पुस्तके, आवडलेली पुस्तके वर नंतर कधी तरी लिहीन..)
दुसरी माझी activity म्हणजे गाणी ऐकणे.. इंजिनिअरींगच्या काळात खरे म्हणजे हे वेड लागले.. अनेक सुंदर जुनी-नवी हिंदी , इंग्लीश, मराठी गाणि ऐकली.. शास्त्रीय बैठकीची ही गाणी (कधीकधी) आवडू लागली.. (इथे पण, माझी आई उत्तम गाते.. पण माझ्याकडे तो गुण नाही.. आम्ही फक्त कानसेन.. ) इतकी गाण्याची आवड असूनसुद्धा मी कधी आयडिया सारेगमप चा एकही भाग पाहू नाही शकले... कारण तो t.v. वर लागतो! .. हो मी आख्ख्या २४ तासात २४ सेकंद सुद्धा t.v. पहात नाही. पाहीलाच तर discovery, natgeo, pogo!, cartoon network (:D) etc etc.. बाकी t.v. वर पाहण्यासारखे काहीही नसते असे माझे स्पष्ट मत आहे! (पुणेकर आहे मी.. इथे-तिथे मतं नोंदवलीच पाहीजेत!! )
भाषा शिकायची आवड खरं म्हणजे मला लहानपणापासून आहे. ८वी मधे जेव्हा संस्कृत शिकले, तेव्हापासूनच मी संस्कृतच्या प्रेमात पडले. ( याला बर्वेकाकूंचा क्लासही कारणीभूत आहे.. ) पण जसे ठरवले तसे मी काही संस्कृत शिकणे चालू ठेवले नाही.. आई आणि भाऊ शिकले असल्यामुळे असेल पण japanese बद्द्ल उत्सुकता वाटतीय.. थोडं-थोडं शिकतही आहे.. मानसीमुळे जर्मन बद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झालय.. पण ती भाषा मला उगीचच (अस तीचे म्हणणे..) अवघड वाटते.. बाकी भाषांमधली spanish पण जरा शिकायला बरी वाटतीय.. बाकीच्या भाषा मला या जन्मात जमतील असॆ वाटत नाही!..
एकंदरीत माझे interests पाहता मी चुकून engg ला आले की काय असे वाटते. पण मला Computer बद्दल प्रचंड fascination आहे.. नविन टेक्नॊलॉजी,सॉफ्टवेअर्स शिकणे/शोधणे मला खूप आवडतात.. computer दुरुस्त करणे हेही मला खूप आवडते.. (ofcoz माझ्या भावाच्या-कपीलच्या मदतीने) आणि माझ्या comp. लाही माझी ही आवड कळल्यामुळे तो बर्याचदा बंद पडुन मला माझी आवड जोपासायला मदत करतो! .. :D
अर्थात जरी हे सगळे interests/hobbies असले तरी बेकार घरात बसणे अजिबात सुखावह कल्पना नाहीय.. इतके प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, ही फार छान भावना नाहीय़! आपलं काय चुकते म्हणून नोकरी मिळत नाही, आपण Loser आहोत या विचारानी frustration येतं.. आधीच फार friendly नसणारी मी या विचारांनी अजून एकटी राहायला लागते.. लोकांना face करावसं वाटत नाही.. आणि मी 'माणुसघाणी' म्हणून ओळखली जाते !.. :( पण हे तेवढ्यापुरतंच.. दुपारी मी अशी असीन तर संध्याकाळी मस्तपैकी रेडीओ मिर्ची ऐकत jogging करत असते.. afterall i knw am capricornian, and capricorn ppl hav to fight alot to achieve success! (कुणाला असा अनुभव मगरींनो ?? :D )
neways.... हे सगळं फारच 'मी-माझं-मला' झाले का?? पण शेवटी हा 'माझा' ब्लॉग असल्याने 'मी' 'माझ्याशिवाय' नाही तर अजून कुणाबद्दल लिहीणार?
पहीलंच पोस्ट असल्याने आणि काही विषय डोक्यात नसल्याने हे लिखाण बरेच random आणि abstract झाले असण्याची शक्यता आहे.. कुणी वाचलंच.. आणि त्यातून आवडलंच तर अवश्य कळवा! (म्हणजे मला पुढे लिहू की नको ते कळेल.. :) )

टिप्पण्या
bl~og
तुमचा 'ब्लॊग' छान आहे:-)
~e=ऍ र्य=r^ya ज्ञ=j~j
र्या= r^yaa .... बर्याचदा
भाग्यश्री आपण मनात येईल ते लिहा. असे लिहिण्याने कदाचित तुमच्या मागील आयुष्यात झालेल्या चुका कळतील आणि त्यावर तुम्हालाच उपायही सापडेल.
तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आवडीची नोकरी मिळो अशा शुभेच्छा!
प्रमोद देव.
(तुम्ही मला अहो जाहो नका नं करू, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा!)
@ मानसी : थॅंक्स ग !
Good start! Keep it up!!
-Ojas
http://desipundit.com/category/marathi
tuzz Lekh vaachun kahrech kahi aathavani jagya zalya!! Greate keep it up, punha asech kahi
Lihi,
Tuzi navi maitrin
Ashwini Dixit
mee pan ek maayabolikar & manogatee. tyamule swatha write karanya evajee vaachayala aanand milato.
tumhi lihilya pramane tumhi soft engg aahat, pan tumhala job nahiye. Tasech tumhala khup bolayachi echcha aseun pan jast frnds nasalyane tumhala jast communicate karata yet nahi, ase samajale.yaatun ek marg suchato. tumhi chotasa job ka nahi chalu karat? bhale hee to soft field madhala nasata, tari hee tumacha thodasa time MAANASAAn madhye jayil. Wall-mart kiva tatsam shop-chains madhye kaam karun bharpur prakarachi maanase anubhavayala milataat. tumhi te pan try karu shakataat.... arthat konatehee kaam chote kiva mothe nasate, te aapalyavar dependent asaet.
shivaay trishul cha ek famous rakhi gulzaar cha dialogue aahech: jo log kaam nahi karate, woh kamaal karate hai.......
tumacha naveen kamaal aikayala aavadel.
amit
Wow.kharach chchan lihila aahes ga?
Yatali pratyek ol khari asel tar mala ek prashan padato ki tu Computer engineering la ka alis? One thing I like is your approach towards life, very well defined , positive.
Gr8. Keep it up. I m sure u r goin to get a big success in life. Afterall Life is full of Surprises:-). So just wait and watch.
Finally "Bhag" and "Blog" both are rhyming words.
With Regards,
---Sumit
मायबोलीवरील Link साठी धन्यवाद. त्यातील काही शब्दही कोशात समाविष्ट करू आपण. :)
:D
keep it up ani lavkarach ajun ek blog post kar
Liha, please...:)
"फेव ब्लॉग्ज़" मध्ये आमच्या (बरेच दिवस बंद असलेल्या) ब्लॉगाचे नाव पाहून आनंद झाला.
मग काय करतेस दिवसभर?? :)
शशांक
tuz 'maze vichar' aatach wachal...chhan lihites!
( ref.charlin champlin)
'Hasre dukkh'Auther_B.D.kher asavet.
Kavita wachayla aawadtat tar,'Gulzar'wachayla\aikayala aawdel tula..?