पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

GTD - Getting things Done

सध्या प्रॉडक्टीव्हिटीचा फीवर चढला आहे तर त्या एरियातले बायबल वाचायला घेतले आहे. गेटींग थिंग्ज डन - डेव्हिड अ‍ॅलन. मला खूप आवडत आहे. जीटीडी मेथडॉलॉजीशी ओळख माझी विविध टूडू अ‍ॅप्स मुळे आधीच होती. आता मूळ मेथडॉलॉजीचा जनक त्याबद्दल काय म्हणतोय मुळात ते वाचायला छान वाटतंय.  मुळात जीटीडीचा आधार आहे क्कोअर- म्हणजे कॅप्चर,क्लॅरिफाय,ओर्गनाईझ,रिफ्लेक्ट, एंगेज.   १) कॅप्चरः (collect what has your attention) डोक्यातील सर्वच्या सर्व थॉट्स ओता. ह्यासाठी जीटीडीमध्ये इनबॉक्स ही फॅसिलिटी असते. त्यात अक्षरश: दिवसभरात जेजे डोक्यात येईल ते नोंदवत राहयचे. काय आहे ती गोष्ट, टूडू आहे की इव्हेंट, की जनरल ऐकलेली इंटरेस्टींग माहिती त्याच्याशी आत्ता काही देणंघेणं नाही.   २) क्लॅरिफाय: (process what it means) म्हणजे जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा इनबॉक्स उघडून एक एक गोष्ट बघायची. ही गोष्ट्/आयटेम अ‍ॅक्शनेबल आहे की नाही? अ‍ॅक्शनेबल असेल व जर ती २ मिनिटाच्या आत करता येणार असेल तर लगेच करून टाका. दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ती त्या स्पेसिफिक कप्प्यात/ प्रोजेक्टमध्ये/ फोल्डरमध्ये ढकल...

'मेरू'

इमेज
काल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फिन'!! कोणीही मानव तिथे वरपर्यंत जाऊ शकला नव्हता. प्रयत्न खूप झाले. पण अयशस्वी. Mugs Stump ह्या नोटेड रॉक क्लाईंबर व माउंटेनिअरने प्रयत्न केले होते. हा मग्स होता Conrad Anker चा मेंटर. पुढे मग्स कुठल्यातरी मोहिमेत मरण पावला मात्र कोन्राडच्या डोक्यात हे मेरूवेड घोळतच राहिले. त्याने त्याचा बर्‍याच वर्षांचा सहकारी Jimmy Chin आणि दुसरा एक नवखा Renan Ozturk ह्या दोघांबरोबर मेरूची मोहिम आखली. रेनान तुलनेने नवखा, हिमालयाचा तेव्हाढा अनुभव नसलेला होता. जिमि मात्र एकदम प्रो. जिमी व कोन्राड बर्याचदा एव्हरेस्ट सर करून आले होते वगैरे. अशी टीम निघाली.२०,०००+ फीट उंचीचे शिखर! सरळ जवळपास जमिनीला काटकोनात असलेली कडा! त्या भिंतीवर पॅरलल, हवेत तंबू उभारून झोपायचे वगैरे. मोहिम चांगली चालू होत...