आठवणी ... !!
सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!! सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते.. वास म्हटलं की मला आठवते ते माझं पर्फ्युम्सचं कलेक्शन.. सगळ्यात पहील्यांदा माझं असं पर्फ्युम मला मिळालं १०वी च्या रिझल्ट नंतर.. आत्याने अमेरीकेमधून आणलेलं.. ते मी ११-१२वी मधे वापरलं.. आणि जेव्हा संपत आलं तेव्हा ती बाटली बाजूला ठेऊन दिली.. तेव्हापासून मला हा छंद लागला.. आवडतं सेंट पूर्ण संपवायचे नाही.. अजुनही ती बाटली उघडली की माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ समोर येऊन ठाकतो! ११-१२वी ! शाळा संपवून नुकतीच कॉलेज नावाच्या विश्वात पाऊल टाकलेलं.. फारसा अभ्यास करायची पद्धतच नाही.. त्यामुळे बारावीला देखील डोक्याला चिंता नव्हत्या! इझिली , लकीली मार्क्स पडत होते.. खूप नाही, पण वाईटही नाहीत.. त्यामुळे मी ते दिवस सगळ्यात एन्जॉय केले.. तिथेच मला माझे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी भेटले.. २-२ वे...