बटर चिकन आणि व्हेज. बिर्याणी

ह्म्म.. प्रथमच रेसीपी लिहीत आहे.. ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचं होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..)म्हणून हा बेत..

बटर चिकन

IMG_0212

ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे.पण अर्थात आम्ही करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप आवडली!)
असो.. मला जमेल तशी देतीय रेसीपी. अगदी अचूक प्रमाण नाही देता येणार कारण मी अंदाजेच घालते सगळे मसाले..


जिन्नस :
१) ५०० ते ७०० ग्रॅम हलाल चिकन.
२) एक मोठा कांदा चिरून. ( अमेरीकेतला असेल तर अर्धाच. आमचा कॉस्कोचा होता. तो जरा अतीच जास्त आहे..)
३)एक टोमॅटो.
४) खोबरं
५) आलं, लसूण.
६) ३ मिरच्या
७) थोडी कोथिंबीर.
८)चिकन मसाला..
९) थोडासा काळा मसाला..
१०) आवश्यक वाटला तर फूड कलर्.(अर्थात लाल.)
११) दही.
१२) हळद्,तिखट,तेल वगैरे.

कृती :

१. प्रथम चिकन साफ करून त्याचे तुकडे करून ठेवणे. मग दही, हळद्,आणि थोडा चिकन मसाला घालून मॅरीनेट करावे.
२. मग कुकर मधे शिजवून घ्यावे.
३. मसाल्यासाठी : चिरलेला कांदा बटर मधे किंचित परतून घ्यावा. खोबरं परतून घ्यावं(बटर शिवाय :) )
४. आलं , लसूण, मिरची,कोथिंबीर्,टोमॅटो आणि परतलेला कांदा आणि खोबरं हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेणे. पेस्ट करावी..(हवा असल्यास फूड कलर घालणे.)
५. एका मोठया कढईत किंवा पॅन मधे बटर गरम करत ठेवावे. थोडीशी हळद घालून, ही वर केलेली पेस्ट घालावी. थोडं परतलं की त्याला तेल सुटते. (वाटल्यास त्यात परत चिकन मसाला ,काळा मसाला घालावा.)
६. तेल सुटले की शिजवलेले चिकन घालून सगळं एकजिव करणे. ग्रेव्ही जरा घट्ट झाली की वरून बटर घालणे.. की झालं बटर चिकन तैयार!! :)


व्हेज. बिर्याणी :

IMG_0213

ही हमखास सुंदर होणारी, आणि लवकर होणारी रेसीपी.. अर्थात हैद्राबादच्या बिर्याणीशी तुलना करू नये. पण चव सुंदर लागते.. !

जिन्नस :

१) १.५ वाटी तांदूळ.(बासमती )
२) अर्धा फ्लॉवर ,२ मोठी गाजरं आणि मटार(फ्रोझन शक्यतो).
३)परंपरा मसाला
४) कांदा
५) काजू

कृती :

१) १.५ वाटी तांदूळ धुवून राईस कुकर मधे लावून ठेवणे. साधा कुकर सुद्धा चालेल. पण भात मोकळा आणि फडफडीत व्हायला हवा.
२) भात तयार झाला की एका परातीत काढून त्याला तूप लावून मोकळा करून घेणे. भात मोकळा पण होतो. आणि तुपाचा वास मस्त येतो.. नंतर भाताला थोडं मिठ लावून ठेवणे.
३) फ्लॉवर चे छोटे तुरे निवडून घेणे. आणि गाजराचे गोल किंवा त्रिकोणी तुकडे करून घेणे. मोठे गाजर असेल तर त्रिकोणी. आणि छोटं असेल तर साधे गोल.
४) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गाजर आणि फ्लॉवर चे तुकडे वाफवून घेणे. (फार नाही, १०-१५ मिनीट्स बास होईल..)
५) एका कढईमधे अगदी थोडंसं तेल घेऊन त्यात ह्या भाज्या व फ्रोझन मटार परतून घेणे. व लगेच परंपरा मसाला त्यात घालणे. (परंपरा चा मसाला आधी हाताने कुस्करून घेणे. त्याची ढेकळं राहीली तर भाताला नीट लागत नाही..)
६) मसाला घातल्यावर जरावेळाने तेल सुटू लागते. त्यात भात घालणे. सगळं नीट मिक्स करून घेणे.
७) १० मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ देणे.
८) व्हेज. बिर्याणी तयार!! फक्त यात तुपात तळलेले काजू अवश्य घालणे!! अतिशय सुंदर लागतात. शिवाय कांद्याच्या रिंग्स सुद्धा तळून घालता येतील. पण त्यासाठी कांदा चिरून २ दिवस उन्हात वाळवत ठेवावा. व मग तुपात परतावा. असा कुरकुरीत तळलेला कांदा , आणि तळलेले काजू या बिर्याणीवर घालून दिले तर कधी विसरणार नाही चव! :)

अशी ही बिर्याणी, बटर चिकन, गरमगरम मऊसूत पोळ्या आणि सॅलड एका छान डिश मधे सजवून द्या, आणि विकेंड एन्जॉय करा !!

IMG_0214
Signature2

टिप्पण्या

Unsui म्हणाले…
http://youtube.com/results?search_query=Sanjay+Thumma&search_type=

Or check
http://youtube.com/results?search_query=vahchef&search_type=

This guy has put up nice videos of indian recipes.

Best Wishes
Unknown म्हणाले…
hey,thanks.. nakki pahte videos..
HAREKRISHNAJI म्हणाले…
बिर्याणी पाहुन तोंडाला पाणी सुटले. चिकन ्शांतम पापम.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives