पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हर्चुअल की रिअल?

इमेज
भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प्रतिमा तयार होते व प्रत्यक्ष भेटल्यावर काही फरक जाणवतो का? दोन्ही पद्धतींमधील तुम्हाला कोणती पद्धत जास्त भावते? माझ्याबाबतीत विचाराल तर मी व्हर्चुअल जगात जास्त मोकळेपणे वावरते. प्रत्यक्षात मला सोशल अँझायटी असावी इतपत मी शांत असते. हे माझ्या बाबांना बर्‍यापैकी डाचत आले आहे. पूर्वी मलाही असं वाटून जायचे की आपलं सगळंच ऑनलाईन असते.  एनीवे.. माझ्या आईबाबांच्या घरी झालेल्या मैफिलीत हा विषय निघाला चहाच्या वेळेस. कोणी कोणी बिनसाखरेचा चहा प्रिफर करतं, कोणी नव्याने घेत होते. पण मी मात्र बिनसाखरेचा घेणे शक्यच नव्हते! मी का अजून कोणीतरी बोलून गेले.. "हो! त्या अमुकला पण २ चमचे साखर लागते ना चहात!?"  दॅट वॉज द युरेका मोमेंट! तिथल्या मुलींपैकी  कोणीच भेटले नव्हते तिला .  पण आम्हा सर्वांना तिचा चहा कसा असतो हे माहित. मैत्र...