पोस्ट्स

एप्रिल, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी भटकंती - ओहाय ( Ojai )

इमेज
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही! तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही.. खरं म्हणजे हे जास्त करून माझ्या आठवणींचा शोध, स्मरण आणि त्या त्या ठीकाणाबाबत मला जी काही माहीती मिळेल ती मी संकलित करून ठेवत आहे.. (काही माहीती ही विकीच्या माहीतीवरून भाषांतरीत केलेलीही असेल..) वाचकांना कितपत आवडेल कल्पना नाही पण माझा स्वतःचा आनंद नक्कीच असेल त्यात... मी इथे लॉस एंजिलीस मधे राहते. म्हणजे अर्थातच माझ्या भ्रमंती मधे डिस्नेलॅंड आलं, युनिव्हर्सल स्टुडीओज आलं, सॅन दिएगो मधलं सीवर्ल्ड आलं.. अजुन हजार ठीकाणं.. पण मी सुरवात तरी करतीय त्यामानाने माहीत नसलेल्या ठीकाणापासून. तिथे मी रिसेंटलीच जाऊन आले त्यामुळे थोड्या आठवणी ताज्या! आणि कितीही छान असल्या तरी त्याच त्याच फेमस जागांब...